Petrol Diesel Price Today : कच्चे तेल झाले स्वस्त! पेट्रोल-डिझेलची दरवाढ विसरा आता

Petrol Diesel Price Today : एकीकडे सोन्याला महागाईची इंगळी डसली आहे. तर दुसरीकडे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाचा तोरा उतरला आहे. यावर्षात गेल्या अडीच महिन्यात कच्चा तेलाने जोरात उसळी घेतली नाही. भावात घसरणच सुरु आहे. त्यामुळे तेल विपणन कंपन्यांना हे वर्ष लक्की ठरलं आहे!

Petrol Diesel Price Today : कच्चे तेल झाले स्वस्त! पेट्रोल-डिझेलची दरवाढ विसरा आता
आजचा भाव तर जाणून घ्या
Follow us
| Updated on: Mar 19, 2023 | 8:31 AM

नवी दिल्ली : एकीकडे सोन्याला (Gold) महागाईची इंगळी डसली आहे. तर दुसरीकडे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाचा तोरा उतरला आहे. यावर्षात गेल्या अडीच महिन्यात कच्चा तेलाने जोरात उसळी घेतली नाही. भावात घसरणच सुरु आहे. त्यामुळे तेल विपणन कंपन्यांना हे वर्ष लक्की ठरलं आहे! 19 मार्च रोजी डब्ल्यूटीआई क्रूड ऑईलमध्ये (WTI Crude Oil) 2.36 टक्के घसरुन 66.74 डॉलर प्रति बॅरलवर पोहचले. तर ब्रेंट क्रूड ऑईलची (Brent Crude Oil) किंमत 2.32 टक्के घटली. आज हा भाव 72.97 डॉलर प्रति बॅरल आहे. या किंमतींच्या आधारे भारतीय तेल कंपन्या दररोज पेट्रोल-डिझेलचा दर (Petrol-Diesel Price) जाहीर करतात. कच्चे तेल फारसे न वधारल्याने पेट्रोल-डिझेलची कपात तर माहिती नाही पण दरवाढ मात्र होणार नाही, हे नक्की.

कोणत्या देशाकडून होतो पुरवठा

  • सध्या रशियाकडून भारताला रोज 16 लाख बॅरल्स कच्चा तेलाचा पुरवठा करण्यात येत आहे
  • तर इराककडून 9.4 लाख बॅरल, सौदी अरबकडून 6.5 लाख बॅरल कच्चे तेल आयात होते
  • संयुक्त अरब अमिरातकडून 4 लाख बॅरल, अमेरिकेकडून 2.5 लाख बॅरल प्रत्येक दिवशी पुरवठा होत आहे
  • 2006-07 मध्ये भारत 27 देशांकडून इंधन आयात करत होता. 2021-22 मध्ये ही संख्या 39 इतकी झाली आहे
  • वर्षभरात भारतीय तेल कंपन्यांना इतर पुरवठादारांपेक्षा रशियकडून 2 डॉलर प्रति बॅरलचा फायदा होत आहे.
हे सुद्धा वाचा

राज्यातील प्रमुख शहरातील इंधनाचे दर

  1. मुंबईमध्ये पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेलचा दर 94.27 रुपये प्रति लिटर आहे
  2. अहमदनगर पेट्रोल 106.85 तर डिझेल 93.33 रुपये प्रति लिटर
  3. अकोल्यात पेट्रोल 106.14 रुपये आणि डिझेल 92.69 रुपये प्रति लिटर
  4. अमरावतीत पेट्रोल 107.14 तर डिझेल 93.65 रुपये प्रति लिटर
  5. औरंगाबाद 107.02 पेट्रोल आणि डिझेल 93.50 रुपये प्रति लिटर
  6. जळगावमध्ये पेट्रोल 106.42 आणि डिझेल 92.94 रुपये प्रति लिटर
  7. कोल्हापूरमध्ये पेट्रोल 107.43 आणि डिझेल 93.93 रुपये प्रति लिटर
  8. लातूरमध्ये पेट्रोल 107.25 तर डिझेल 93.74 रुपये प्रति लिटर
  9. नागपूरमध्ये पेट्रोल 106.04 तर डिझेल 92.59 रुपये प्रति लिटर
  10. नांदेडमध्ये पेट्रोल 108.50 तर डिझेल 94.96 रुपये प्रति लिटर
  11. नाशिकमध्ये पेट्रोल 106.83 रुपये आणि डिझेल 93.33 रुपये प्रति लिटर
  12. पुण्यात पेट्रोलचा भाव 105.85 आणि डिझेल 92.37 रुपये प्रति लिटर
  13. सोलापूरमध्ये पेट्रोलचा दर 106.77 रुपये तर डिझेल 93.29 रुपये प्रति लिटर

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.