Today Gold-silver prices : अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सोन्या-चांदीच्या दरात घसरण; सोने खरेदीसाठी शुभकाळ

आज पुन्हा एकदा सोन्या-चांदीच्या दरात घसरण पहायला मिळत असून, सोने तोळ्या मागे 620 तर चांदी किलो मागे 802 रुपयांनी स्वस्त झाली आहे.

Today Gold-silver prices : अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सोन्या-चांदीच्या दरात घसरण; सोने खरेदीसाठी शुभकाळ
आजचे सोन्याचे दर
Follow us
| Updated on: May 02, 2022 | 2:35 PM

अक्षय तृतीया (Akshaya Tritiya 2022) अवघ्या एका दिवसावर येऊन ठेपली आहे. अक्षय तृतीयाला सोने खरेदी करणं शुभ मानले जाते. साधारणपणे जसजशी अक्षय तृतीया जवळ येते, तसतशी सोन्याच्या मागणीमध्ये वाढ होते. मागणी वाढल्यास सोन्याच्या दरात तेजी येते. दरवर्षी अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर सोन्याच्या दरात तेजी पहायला मिळत असते. मात्र यंदा सोन्याच्या दरात घसरण पहायला मिळत आहे. अक्षय तृतीयेच्या एक दिवस आधी सोन्याच्या दरात (Gold Price Today) घसरण झाली आहे. जागतिक बाजारत सोन्या-चांदीच्या दरात चढ -उतार पहायला मिळत असून, त्याचा फटका हा भारतीय सराफा बाजाराला देखील बसला आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX)नुसार सोन्याच्या दरात प्रति तोळ्यामागे 1.20 टक्क्यांची घसरण झाली आहे. तर दुसरीकडे चांदीच्या दरात देखील 1.26 टक्क्यांची घसरण झाली आहे. सोमवारी 24 कॅरट सोन्याच्या दर 620 रुपयांच्या घसरणीसह प्रति तोळा 51,134 रुपयांवर पोहोचला तर चांदीचा दर 802 रुपयांच्या घसरणीसह 62,754 रुपयांवर पोहोचला आहे.

राज्याच्या प्रमुख शहरातील दर

आज सोन्याच्या दरात घसरण दिसत असून, मुंबईमध्ये 22 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 48 हजार 390 रुपये इतका आहे. पुण्यात 22 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 48 हजार 470 रुपये आहे. राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरमध्ये 22 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 48 हजार 470 रुपये इतका आहे. तर दुसरीकडे चांदीच्या दरात आज किलोमागे 802 रुपयांची घसरण झाली असून, चांदीचा दर प्रति किलो 62,754 रुपयांवर पोहोचला आहे. अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर सोने-चांदीचे दर स्वस्त झाल्याने खरेदीदारांमध्ये समाधान दिसून येत आहे.

सोन्याच्या मागणीमध्ये वाढीची शक्यता

उद्या अक्षय तृतीया आहे. अक्षय तृतीयाच्या एक दिवस आधीच सोन्याच्या दरात मोठी घसरण पहायला मिळत असून, सोने- चांदी स्वस्त झाल्याने यंदा सोने खरेदीचे प्रमाण अधिक राहण्याची शक्यता आहे. सोन्याची विक्रमी खरेदी होऊ शकते. गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीचे दर सातत्याने घसरत असल्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये मात्र चिंतेचे वातावरण पहायला मिळत आहे. अनेकांनी आपल्या सोन्यामधील गुंतवणूक इतर ठिकाणी गुंतवण्यास सुरुवात केली आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.