Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Russia ruble | रशियाची चाल जगावर भारी, निर्बंध असताना ही महागाई सोडाच व्याजदर ही घसरले, रुबल ही झाला स्ट्राँग

Russia ruble Strong | केंद्रीय बँकेनुसार, जून महिन्यात महागाई दर 15.9 टक्क्यांवर आला आहे. मे महिन्यात हा दर 17टक्क्यांपेक्षा ही जास्त होता. मागणी घटल्याने आणि रुबल मजबूत झाल्याने महागाई दर घसरल्याचा दावा बँकेने केला आहे.

Russia ruble | रशियाची चाल जगावर भारी, निर्बंध असताना ही महागाई सोडाच व्याजदर ही घसरले, रुबल ही झाला स्ट्राँग
रुबल स्ट्रॉंगImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Jul 23, 2022 | 4:14 PM

Russia ruble Strong News | जगभरातील अर्थव्यवस्था (World Economy) गेल्या महिन्यांपासून महागाईने (Inflation) त्रस्त झाल्या आहेत. महागाई कमी करण्यासाठीच्या सर्व उपाय योजना नापास झाल्याने या देशातील जनता सरकारवर प्रचंड नाराज आहे. श्रीलंकेसारख्या देशात तर अर्थव्यवस्थेचे तीन तेरा वाजेल आहेत. एवढ्या नकारात्मक परिस्थितीतही रशियाने मात्र जग विरोधात असतानाही चमकदार कामगिरी करुन दाखवली आहे. रशियातील (Russia) महागाईच घटली नाही तर बँकांची व्याजदर (Interest Rate) ही कमी झाले आहेत आणि रशियाचे चलन रुबल (currency Ruble) सध्या मजबूत स्थितीत आहे. रशियन अर्थव्यवस्थेचे (Russian Economy) हे रुप पाहुन अमेरिकेसह मित्रराष्ट्रांचे रंग उडाले आहेत. एकीकडे अमेरिकेसारखी जागतिक अर्थव्यवस्था महागाई कमी करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करत असताना रशियात मात्र त्यासाठी नागरिकांवर कुठला कराचा भार टाकण्यात आलेला नाही वा व्याजदरे वाढवण्यात आले नाही. उलट व्याजदरात कपात करण्यात आली आहे. परिस्थिती विन विन (Win Win) दिसत असली तरी रशियातील उद्योगांवर निर्बंधांचा विपरीत परिणाम बघायला मिळत आहे. म्हणजे सगळंच काही आलबेल नाही. परंतू रशियातील महागाई सध्या तरी आटोक्यात आलेली आहे.

जगापेक्षा काय वेगळ्या उपाययोजना

रशियाच्या मध्यवर्ती बँकेने व्याजदरात 1.5 टक्क्यांची कपात केली आहे. आता व्याजदर 8 टक्क्यांवर आली आहेत. एवढेच नाहीत तर रशियाचा महागाई दर ही घसरला आहे. केंद्रीय बँकेनुसार, जून महिन्यात महागाई दर 15.9 टक्क्यांवर आला आहे. मे महिन्यात हा दर 17टक्क्यांपेक्षा ही जास्त होता. मागणी घटल्याने आणि रुबल मजबूत झाल्याने महागाई दर घसरल्याचा दावा बँकेने केला आहे. रुबल सध्या जगातील अशा चलनात सहभागी आहे जे, डॉलरच्या तुलनेत मजबूत स्थितीत आहे.

हे सुद्धा वाचा

ही चालच वेगळी राजेहो

युक्रेनवर हल्ला करण्याचे पूर्वीपासूनच रशियाने सुक्ष्म नियोजन केले होते. हल्ला केल्यानंतर जागतिक प्रतिबंध लागू होतील आणि त्याचा काय परिणाम होईल याचा अगोदरच अभ्यास करण्यात आला. युद्ध लांबले तर काय उपाय योजना करण्यात याव्यात याची ही उजळणी करण्यात आली होती. रशियाने पूर्वीच निर्यात ही रुबल मध्ये करण्याची उपाय योजना राबवली. त्यामुळे व्यापाऱ्यांना त्यांचे चलन डॉलर ऐवजी रुबलमध्ये बदलावे लागले. युक्रेन युद्धाच्या काळात डॉलरच्या तुलनेत रुबल 78.8 प्रति डॉलर पडला होता. आज रुबल 58 प्रति डॉलर आहे. त्यामुळे गेल्या तीन चार महिन्यांतच रशियाने चलन व्यवस्था आणि अर्थव्यवस्था सुधारली आहे. सध्या रशिया, चीन, भारत आणि इराण सोबतच त्यांच्या चलनात व्यापार करत आहे, त्याचा ही चांगला परिणाम दिसून येत आहे. जगातील अनेक देशांना वाढत्या इंधन दरामुळे महागाईचा सामना करावा लागत आहे. तर रशिया याबाबतीत बऱ्याच प्रमाणात स्वावलंबी आहे. तसेच इंधन निर्यातीवर निर्बंध आल्यापासून रशियात इंधनाचे दर ही स्थिर आहेत. तसेच डॉलरला समांतर इतर चलनात रशिया रुबल द्वारे व्यापार करत असल्याने रशियाची स्थिती मजबूत आहे.

हींजवडी टेम्पो ट्रॅव्हल आग प्रकरण अपघात नाही घातपात
हींजवडी टेम्पो ट्रॅव्हल आग प्रकरण अपघात नाही घातपात.
नागपूर हिंसाचाराच्या आधी काय प्लॅनिंग झालं? सीसीटीव्ही फुटेज आलं समोर
नागपूर हिंसाचाराच्या आधी काय प्लॅनिंग झालं? सीसीटीव्ही फुटेज आलं समोर.
2 भागातली संचारबंदी काढली, 3 ठिकाणी शिथिलता; काय आहे नागपूरची स्थिती?
2 भागातली संचारबंदी काढली, 3 ठिकाणी शिथिलता; काय आहे नागपूरची स्थिती?.
लाडक्या बहिणींच्या पैशांवर अजित पवार स्पष्टच बोलेले
लाडक्या बहिणींच्या पैशांवर अजित पवार स्पष्टच बोलेले.
'सरड्यालाही लाज वाटेल इतका वेगानं रंग बदलला', परबांचा कायंदेंवर निशाणा
'सरड्यालाही लाज वाटेल इतका वेगानं रंग बदलला', परबांचा कायंदेंवर निशाणा.
'.. तर मग मात्र पंचाईत होईल'; सालियान प्रकरणावर उद्धव ठाकरेंचं विधान
'.. तर मग मात्र पंचाईत होईल'; सालियान प्रकरणावर उद्धव ठाकरेंचं विधान.
राज्यातील सरकारी शाळांना CBSE पॅटर्न लागू,शिक्षणमंत्र्यांची मोठी घोषणा
राज्यातील सरकारी शाळांना CBSE पॅटर्न लागू,शिक्षणमंत्र्यांची मोठी घोषणा.
औरंगजेबाच्या कबरीखाली आपणही मरावं... बच्चू कडू यांची सरकारवर नाराजी
औरंगजेबाच्या कबरीखाली आपणही मरावं... बच्चू कडू यांची सरकारवर नाराजी.
नागपूर राड्यात आणखी एक नाव समोर; कोण आहे सय्यद अली?
नागपूर राड्यात आणखी एक नाव समोर; कोण आहे सय्यद अली?.
8 जूनच्या रात्री कुठे अन् लोकेशन काय? राणेंचा आदित्य ठाकरेंना एकच सवाल
8 जूनच्या रात्री कुठे अन् लोकेशन काय? राणेंचा आदित्य ठाकरेंना एकच सवाल.