Sagar Patidar | शेतकऱ्याच्या मुलाची उत्तुंग भरारी; प्रतिकूल परिस्थितीवर मात करत स्वतःचे स्टार्टअप

सागर पाटीदार हा लहानपणापासूनच हुशार विद्यार्थी होता. तो स्वतःच्या गावातील सरकारी शाळेत इयत्ता 5 वी पर्यंत शिकला. इयत्ता 6 वीसाठी त्याने जवाहर नवोदय विद्यालय (JNV) मध्ये प्रवेश घेण्यासाठी प्रवेश परीक्षा दिली. ही परीक्षा उत्तीर्ण होऊन त्याने ग्रामीण भागातील हुशार विद्यार्थ्यांसाठी असलेल्या केंद्रीय शाळेत प्रवेश मिळवून दाखवला होता.

Sagar Patidar | शेतकऱ्याच्या मुलाची उत्तुंग भरारी; प्रतिकूल परिस्थितीवर मात करत स्वतःचे स्टार्टअप
सागर पाटिदार
Follow us
| Updated on: Feb 14, 2022 | 3:06 PM

मुंबई : तीव्र इच्छाशक्ती, प्रबळ आत्मविश्वास आणि कठोर परिश्रम घेण्याची तयारी असेल तर आयुष्यात काहीही अशक्य नाही. भले कितीही संकटे येवोत, वादळे येवोत, तशा प्रतिकूल परिस्थितीतही इच्छाशक्तीच्या जोरावर न डगमगता उभे राहता येते. मध्य प्रदेशातील मंदसौर गावातील पाटीदार शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या सागर पाटीदार (Sagar Patidar) याची अशीच आदर्शवत यशोगाथा आहे. सागर शेतकरी कुटुंबातील अर्थात पिढ्यानपिढ्या मातीशी नाते जपणाऱ्या कुटुंबातील. मात्र त्याने उत्तुंग ध्येयासक्ती ठेवल्यामुळे त्याच्या यशाने आकाशाला गवसणी घातली आहे. पदवीच्या चौथ्या वर्षी दिल्ली आयआयटीमधून (Delhi IIT) बाहेर पडण्याचा निर्णय घेतलेल्या सागरने स्टार्टअप लाँच करून आदर्श निर्माण केला. चला तर मग याठिकाणी त्याने खडतर परिस्थितीतून घेतलेल्या गरुड भरारीवर एक दृष्टिक्षेप टाकूया.

लहानपणापासूनच सागरच्या हुशारीची चमक दिसली होती

सागर पाटीदार हा लहानपणापासूनच हुशार विद्यार्थी होता. तो स्वतःच्या गावातील सरकारी शाळेत इयत्ता 5 वी पर्यंत शिकला. इयत्ता 6 वीसाठी त्याने जवाहर नवोदय विद्यालय (JNV) मध्ये प्रवेश घेण्यासाठी प्रवेश परीक्षा दिली. ही परीक्षा उत्तीर्ण होऊन त्याने ग्रामीण भागातील हुशार विद्यार्थ्यांसाठी असलेल्या केंद्रीय शाळेत प्रवेश मिळवून दाखवला होता. त्याचवेळी त्याच्यातील गुणवत्तेची सर्वांना प्रचिती आली होती. येथूनच त्याच्या शैक्षणिक जीवनाला खऱ्या अर्थाने कलाटणी मिळाली. सागरने स्वतःच हा दावा केला आहे. “JNV मध्ये प्रवेश मिळवणे माझ्या आयुष्यातील एक ‘टर्निंग पॉईंट’ होता. माझे समवयस्क अर्थात मित्रमंडळी, वरिष्ठ तसेच शिक्षकांनी मला जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर मार्गदर्शन केले आणि आवश्यक त्या ठिकाणी मदत केली. माझ्या शिक्षकांनी माझ्यातील प्रतिभा समजून घेतली आणि मला अभियांत्रिकीमध्ये करिअर करण्यासाठी वेळोवेळी प्रोत्साहन दिले. त्यांनी माझ्या क्षमतेवर विश्वास ठेवला आणि मला JEE ची तयारी करण्यासाठी 10वी नंतर कोटा येथे जाण्याचा सल्ला दिला, असे सागरने एका मुलाखतीत सांगितले आहे.

प्रतिकूल परिस्थितीतून वाटचाल, आर्थिक अडचणींवर मात

सागरने उत्तुंग यश मिळवताना अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून वाटचाल केली. एकीकडे आर्थिक अडचणी, त्याचवेळी आत्मविश्वासाचा असलेला अभाव आणि अभियांत्रिकीबद्दल फारच कमी ज्ञान. अशा विविध बाबींमुळे मला कोटा येथे सर्व प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागला. मात्र, परीक्षा उत्तीर्ण करून आयआयटीमध्ये प्रवेश मिळवणे हेच ध्येय मी डोळ्यासमोर ठेवले होते. माझ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी उच्च पगाराची नोकरी मिळवण्याचे माझे उद्दिष्ट होते. त्याच ध्येयपूर्तीच्या दिशेने मी पुढील दोन वर्षांत वाटचाल करीत राहिलो, असे सागर सांगतो. जेईईसाठी पात्र झाल्यानंतरही सागरला पुढे कोणत्या शाखेची निवड करावी हा प्रश्न सतावत होता. जेईई उत्तीर्ण करण्याच्या धडपडीत मला कोणत्या स्ट्रीममध्ये रस आहे हे कधीच माझ्या लक्षात आले नाही. निकालानंतरच मला हा खरा प्रश्न कळला. खूप संशोधनानंतर मी संगणकशास्त्र हा विषय निवडण्याचा निर्णय घेतला, असे सागरने म्हटले आहे.

सुट्टीत विविध स्टार्ट-अप्ससोबत इंटर्न म्हणून काम

सागर हा 2011 मध्ये आयआयटी-दिल्लीमध्ये कॉम्प्युटर सायन्स अर्थात संगणकशास्त्रमध्ये बीटेक करण्यासाठी दाखल झाला. यासाठी पैसे हवे होते. स्वतःची आर्थिक गरज पूर्ण करण्यासाठी त्याने उन्हाळ्यात आणि हिवाळ्याच्या सुट्टीत विविध स्टार्ट-अप्ससोबत इंटर्न म्हणून काम करायला सुरुवात केली होती. येथूनच सागरची सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटमध्ये आवड निर्माण झाली होती. माझा रूममेट आणि मी विविध स्टार्टअप्समध्ये इंटर्न केले. याचदरम्यान आम्ही आमच्या पहिल्या पेमेंट अॅपवर काम करीत होतो. सॉफ्टवेअरवर काम करत असताना आम्हा दोघांनाही आमची तांत्रिक उद्योजकतेमधील आवड लक्षात आली आणि बीटेक सोडून आमचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पूर्णवेळ देण्याचा निर्णय आम्ही घेतला, असा अनुभव सागर पाटीदारने यावेळी शेअर केला.

नंतर पदवीच्या चौथ्या वर्षी सागरने आयआयटी सोडण्याचा निर्णय घेतला. त्याच्या या निर्णयाला कुटुंबाने पाठिंबा दिला होता. परंतु त्याच्या नियोजित स्टार्ट-अपमध्ये आर्थिक गुंतवणूक करण्यास त्यांचा नकार होता. पेमेंट अॅप लाँच करण्यासाठी सागरने कॉलेज सोडले होते. मात्र रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI) विविध नियमांमुळे त्याचा अर्ज अपयशी ठरला होता. उद्योजकतेमध्ये उडी मारण्यापूर्वी हा आमच्यासाठी एक मोठा धक्का होता. मात्र उत्पादनाची बाजारपेठ समजून घेण्यासाठी धडादेखील होता. त्यामुळे मार्केटची रचना समजून घेण्यासाठी मी सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट कंपनीसोबत दोन वर्षे काम करण्याचा निर्णय घेतला, असे सागरने सांगितले. सागरने त्याच्या कॉर्पोरेट नोकरीमध्ये दोन वर्षांहून अधिक काळ काम केले. त्यानंतर 2018 मध्ये स्वतःची Primathon कस्टम सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट सेवा लाँच करण्यासाठी नोकरी सोडली. “माझा ‘10,000 तासांच्या नियमावर’ विश्वास आहे. कोणत्याही व्यक्तीने आपल्या आयुष्यात 10,000 तास कठोर परिश्रम केले तर ती व्यक्ती कोणताही टप्पा गाठू शकते. मी जेईईची तयारी करताना, नंतर नोकरीच्या काळात माझी आवड समजून घेण्यासाठी आणि स्वतःचा स्टार्टअप सुरू केल्यानंतरही हा नियम पाळला. कठोर परिश्रम नेहमीच फलदायी ठरतात, यश मिळवण्याचा हाच एकमेव मार्ग आहे, असे सागर अभिमानाने सांगतो.

संबंधित बातम्या :

मराठी पोरं ह्या गुजराती पोराचा आदर्श घेतील का? चहा विकता विकता कोट्याधीश झालेल्या तरुणाला ऐकाच !

शेअरचॅटचा ‘टकाटक’ टेकओव्हर; MX TakaTak खिश्यात, 600 मिलियन डॉलरला खरेदी

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.