शेतकऱ्याच्या मुलाची संपत्ती तब्बल 33,113 कोटी, पी.पी. रेड्डी कसे झाले भारताचे 43 वे श्रीमंत व्यक्ती

| Updated on: Sep 30, 2023 | 5:09 PM

शेतकऱ्याच्या मुलाने पायाभूत प्रकल्पाची उभारणी करीत देशाची सेवाकरीत स्वत: सोबत कंपनीच्या कर्मचाऱ्यांची प्रगती साधली आहे. अवघ्या दोन कामगारांसोबत सुरु केलेल्या व्यवसायाचा आज वटवृक्ष झाला आहे.

शेतकऱ्याच्या मुलाची संपत्ती तब्बल 33,113 कोटी, पी.पी. रेड्डी कसे झाले भारताचे 43 वे श्रीमंत व्यक्ती
megha
Image Credit source: socialmedia
Follow us on

नवी दिल्ली | 30 सप्टेंबर 2023 : एका शेतकऱ्याचा घरी जन्म झालेल्या पी.पी. रेड्डी यांनी जिद्दीच्या जोरावर पायाभूत प्रकल्प क्षेत्रात उतरुन सिंचन प्रकल्प, धरणे आणि रस्ते बांधणीतून यश मिळविले. इन्फास्ट्रक्चर जायंट कंपनी मेघा इंजिनिअरींग एण्ड इन्फास्ट्रक्चर लि.ची ( MEIL ) एकूण संपत्ती 33,000 कोटी रुपये आहे. तर पी.पी. रेड्डी टॉप श्रीमंतांच्या यादीत 43 वे स्थान पटकावले आहे. एका शेतकऱ्याचा मुलगा आपल्या कष्टाच्या बळावर इतकी उंची गाठू शकतो याचे हे दुर्मिळ उदाहरण आहे.

पी.पी. रेड्डी यांनी मेघा इंजिनिअरींग एन्टरप्राईझेसची 1989 रोजी स्थापना करीत छोट्या शहरासाठी पाईप्सची निर्मिती केली. त्यानंतर त्यांनी मोठे पायाभूत प्रकल्प हाती घेतले. त्यात रस्ते, धरणे आणि सिंचन प्रकल्पाच्या बांधणीपासून ते नॅचरल गॅस पुरवठा या क्षेत्रात त्यांनी हात आजमाविला. त्यात त्यांना प्रचंड यश आले. तेलंगणा राज्यातील दृष्काळ दूर करण्यासाठी मेघा कंपनीने 14 अब्ज डॉलरचे सिंचन प्रकल्प राबविले. पहिला प्रकल्प साल 2019 मध्ये सेवेत आला.

पी.पी. रेड्डी यांनी 36 वर्षांपूर्वी अवघ्या दोन कर्मचाऱ्यांच्या मदतीने आपल्या व्यवसायाची स्थापना केली होती. आता देशातील नावाजलेल्या एक उद्योजक म्हणून त्यांच्याकडे पाहीले जाते. मेघा इंजिनिअरींग एण्ड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड आज देशातील अग्रगण्य इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी म्हणून पाहीले जाते. जगात अशक्य असे काहीच नाही असे त्यांचे ब्रीद वाक्य आहे. सध्या कंपनी अक्षय ऊर्जा, सिंचन, वीज, ऑईल आणि गॅस आणि पिण्याचे पाणी या क्षेत्रा देशात आणि विदेशात प्रकल्प उभारीत आहे. त्यांच्या नाव अनेक प्रकल्पाचे यश जमा झाले आहे. कंपनीला मिळालेले यश हे प्रत्येक कामगाराचे यश आहे असे रेड्डी यांचे मत आहे.

पुतण्याकडे सोपविली धुरा

साल 2006 रोजी त्यांनी आपल्या कंपनीचे नाव बदलत मेघा इंजिनअरींग एण्ड इन्फ्रास्ट्रक्चर असे ठेवले. त्यांचे पुतणे पी.व्ही.कृष्णा रेड्डी हे साल 1991 मध्ये त्यांच्या व्यवसायात त्यांना मदत करु लागले आता त्यांच्याकडे पी.पी. रेड्डी यांनी या व्यवसायाची धुरा सोपविली आहे.