FASTag KYC | फास्टटॅगबाबत मोठी अपडेट! मिळाला दिलासा, कसं कराल ई-केवायसी घ्या जाणून

FASTag KYC NHAI | फास्टटॅग संदर्भात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने ई-केवायसीचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी 31 जानेवारी 2024 ही अंतिम मुदत होती. आता त्याविषयी मोठी अपडेट समोर येत आहे. ई-केवायसीबाबतची अंतिम मुदत वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे वाहनधारकांना दिलासा मिळाला आहे.

FASTag KYC | फास्टटॅगबाबत मोठी अपडेट! मिळाला दिलासा, कसं कराल ई-केवायसी घ्या जाणून
Follow us
| Updated on: Feb 01, 2024 | 3:30 PM

नवी दिल्ली | 1 February 2024 : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) फास्टटॅग केवायसी पूर्ण करण्यासंदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. फास्टटॅग संदर्भातील घोळ थांबविण्यासाठी आणि एक वाहन, एक फास्टटॅगचा वापर वाढविण्यासाठी एनएचएआयने ई-केवायसी अनिवार्य केले आहे. यासाठी प्राधिकरणाने 31 जानेवारी ही अंतिम मुदत असल्याचे जाहीर केले होते. पण आता ही तारीख वाढविण्यात आली आहे. आता ग्राहकांना 29 फेब्रुवारीपर्यंत फास्टटॅगचे ई-केवायसी पूर्ण करता येणार आहे. त्यानंतर तुमचे फास्टटॅग अपडेट केले नसेल तर ते डिएक्टीवेट होईल.

तीन वर्षांपासून फास्टटॅग दिमतीला

फास्टटॅग 15 फेब्रुवारी 2021 पासून चारचाकी वाहनांना अनिवार्य करण्यात आले आहे. टोल नाक्यावरील गर्दी कमी करण्यासाठी फास्टटॅगचा वापर वाढविण्यात आला. यामुळे इलेक्ट्रॉनिक टोल जमा करण्याला गती आणि सुसूत्रता आली. प्रत्येक वाहनाला फास्टटॅग अनिवार्य असताना, एकच फास्टटॅग अनेक वाहनांसाठी वापरल्या जात असल्याचे समोर आले होते. त्यामुळे ई-केवायसीचे हत्यार उपासण्यात आले आहे.

हे सुद्धा वाचा

नाहीतर दुप्पट टोल

जर फास्टटॅगच अपडेट केले नाही तर वाहनधारकांना टोल नाक्यावर दुप्पट कर मोजावा लागेल. NHAI च्या फास्टटॅग विभागात यासंबंधीची सूचना आणि इतर अपडेट तुम्हाला माहिती करुन घेता येईल. सिंगल फास्टटॅगला प्रोत्साहन देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

अपडेट करा केवायसी

जर फास्टटॅगचे तुम्ही केवायसी अपडेट केले नसेल तर त्वरीत करुन घ्या. केवायसी अपडेट झाले की नाही, हे तपासण्यासाठी fastag.ihmcl.com या संकेतस्थळावर लॉग इन करा. तुमचा नोंदणीकृत मोबाईल आणि पासवर्ड अथवा ओटीपी द्वारे तुम्ही लॉग-इन होऊ शकता. डॅशबोर्डवर माय प्रोफाईलवर क्लिक करा. योग्य ती माहिती भरल्यानंतर तुम्हाला स्टेट्स चेक करता येईल.

कोणती लागतात कागदपत्रं

  • ई-केवायसी अपडेट करण्यासाठी कागदपत्रे आवश्यक
  • तुमचा वाहन नोंदणी प्रमाणपत्र (RC)
  • पासपोर्ट साईज फोटो
  • वाहन परवाना, पॅन कार्ड, आधार कार्ड, मतदान कार्ड
  • ओळखीचा वरीलपैकी कोणताही पुरावा

अशी आहे सोपी पद्धत

  1. बँकेशी जोडलेल्या फास्टॅग वेबसाईटवर जा
  2. नोंदणीकृत मोबाईल क्रमांकचा वापर करुन लॉग इन करा
  3. मोबाईलवर आलेला ओटीपी टाका
  4. माय प्रोफाईलवर जाऊन केवायसी टॅबवर क्लिक करा
  5. पत्ता आणि इतर आवश्यक माहिती भरा
  6. केवायसीची प्रक्रिया पूर्ण होईल
  7. fastag.ihmcl.com या साईटवर फास्टटॅग स्टेट्स चेक करा
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.