विद्यार्थ्याला आयकर खात्याने पाठवली 46 कोटींची नोटीस; तुमच्याकडून पण झाली का ही चूक?

Income Tax Department Notice: आयकर विभागाने एका विद्यार्थ्याला 46 कोटींची नोटीस पाठवल्याने त्याचे धाबे दणाणले आहे. त्याच्या एका चुकीने त्याला मनस्ताप सहन करावा लागत आहे. विद्यार्थ्याने या प्रकरणात पोलिसांकडे तक्रार दिली आहे. तुम्ही पण करत नाही ना, ही चूक?

विद्यार्थ्याला आयकर खात्याने पाठवली 46 कोटींची नोटीस; तुमच्याकडून पण झाली का ही चूक?
विद्यार्थ्याला आयकर खात्याची नोटीस
Follow us
| Updated on: Mar 31, 2024 | 10:38 AM

प्राप्तिकर खात्याने एका विद्यार्थ्याला 46 कोटी रुपयांची नोटीस पाठवल्याने एकच खळबळ उडाली. ही घटना मध्य प्रदेशातील ग्वालियर येथील आहे. या घटनेने त्याचे कुटुंबिय पण हादरले आहेत. तर विद्यार्थ्याच्या डोळ्यासमोर अंधाऱ्या आल्या आहेत. सुरुवातीला त्याला ही गमंत वाटली. पण प्रकरण गंभीर असल्याचे लक्षात येताच, त्याने पोलिसांमध्ये धाव घेतली आहे. नकळतपण झालेल्या एका चुकीचा त्याला फटका बसला आहे. वृत्त संस्था ANI ने याविषयीचे वृत्त दिले आहे. त्यानुसार विद्यार्थ्याच्या खात्यातून कोट्यवधींचे व्यवहार झाल्याने त्याला नोटीस बजावण्यात आली आहे.

नेमकं प्रकरण तरी काय?

प्रमोद कुमार दंडोतिया असं या विद्यार्थ्यांचे नाव आहे. तो मध्यप्रदेशातील ग्वालियरचा रहिवाशी आहे. तो एसएलपी या महाविद्यालयात इंग्रजी भाषेतून पदव्युत्तर पदवी करत आहे. त्याला आयकर खाते आणि जीएसटी विभागाने 46 कोटींची नोटीस पाठवली. सुरुवातीला ही नोटीस त्याला कोणाचा तरी खोडसाळपणा वाटला. मित्राने गंमत केल्याचे वाटले. पण त्याने याविषयीची चौकशी केली असता, त्याच्या पायाखालची जमीनच सरकली.

हे सुद्धा वाचा

पॅनकार्डचा झाला दुरुपयोग

आयकर खात्याने प्रमोदला नोटीस बजावली. त्यात त्यांनी त्याच्या पॅनकार्डचा वापर करुन दिल्लीत एक तर मुंबईत दोन कंपन्या रजिस्टर करण्यात आल्याचे स्पष्ट केले आहे. 2021 मध्ये हा कारनामा करण्यात आला. हे प्रकरण इतक्यावरच थांबलेले नाही. तर त्याच्या बँक खात्याचा पण वापर करण्यात आला आहे. प्रमोदला निदान बँक खात्याची तरी अपडेट माहिती असणे गरजेचे होते. पण त्याने त्याकडे केलेले दुर्लक्ष त्याच्या अंगलट आले.

शुल्क भरणेच जिकरीचे

जानेवारी 2021 ते 2024 या दरम्यान प्रमोदच्या बँक खात्यातून 46 कोटींचा व्यवहार झाल्याचे स्पष्ट झाले आहे. प्रमोदने दिलेल्या माहितीनुसार, महाविद्यालयाचे शुल्क भरणे पण त्याला अवघड आहे. त्यामुळे इतक्या मोठ्या व्यवहाराची माहिती कळताच त्याचे डोळेच पांढरे झाले. त्याने आयकर खाते आणि जीएसटीकडे याविषयीचे म्हणणे मांडले. पण त्याचा काही परिणाम न झाल्याने त्याने पोलिसांत धाव घेतली. पॅनकार्डचा चुकीचा वापर करुन त्याला फसविण्यात आल्याची कैफियत त्याने पोलिसांपुढे वाचली.

हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.