…तर खतांचे दर गगनाला भिडणार; भारतालाही बसणार मोठा फटका?
जगभरात रसायने आणि खतांचे (fertilisers) भाव वाढू शकतात, असा इशारा रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी दिला आहे. पुतीन यांनी एका भाषणात बोलताना म्हटले आहे की, रशिया हा खतांच्या निर्मितीसाठी लागणारा कच्चा माल तसेच खनिजांचा एक मोठा निर्यातदार देश आहे. पश्चिमी देशांनी आमच्यावर निर्बंध घातले आहेत, अशा स्थितीत पुरवठा साखळी खंडित होऊ शकते.
जगभरात रसायने आणि खतांचे (fertilisers) भाव वाढू शकतात, असा इशारा रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी दिला आहे. पुतीन यांनी एका भाषणात बोलताना म्हटले आहे की, रशिया हा खतांच्या निर्मितीसाठी लागणारा कच्चा माल तसेच खनिजांचा एक मोठा निर्यातदार देश आहे. पश्चिमी देशांनी आमच्यावर निर्बंध घातले आहेत. अशा स्थितीमध्ये जर कच्चे तेल (oil) व ऊर्जा मिळवण्यासाठी वापरात येणाऱ्या इतर साधनांची किंमत वाढल्यास त्याचा दोष रशियाला देता येणार नाही. रशियाने युक्रेनविरोधात युद्ध (Russia Ukraine Crisis) सुरू केल्याने रशियाची आर्थिक कोंडी करण्यासाठी अमेरिकेने रशियावर कडक आर्थिक निर्बंध लादले आहेत. रशियाकडून निर्यात होणाऱ्या गॅस व कच्च्या तेलाचा पुरवठा बंद करण्याचा निर्णय देखील अमेरिकेने घेतला आहे. असे केल्यास रशियाची आर्थिक रसद थांबवली जाईल आणि या पैशांचा वापर रशियाला युद्धात करता येणार नसल्याचे अमेरिकेने म्हटले आहे.
खतांचे भाव वाढणार
अमेरिकेसह युरोपीयन राष्ट्रांनी जर रशियावर निर्बंध कायम ठेवले तर त्याचा मोठा फटका हा जगाला बसणार आहे. खतांचे भाव मोठ्या प्रमाणात वाढतील. कारण रशिया आणि बेलारूस हे दोनही देश खते आणि इतर रसायनांचे सर्वात मोठे निर्यातदार देश आहेत. अशा स्थितीमध्ये जर रशियावर निर्बंध कायम राहिल्यास भविष्यात खते महाग होऊ शकतात असे रशियन प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे.
भारतात खते महागण्याची शक्याता
रशिया खतांचा एक मोठा निर्यातदार देश आहे. दरवर्षी देशात पाच कोटी टन विविध प्रकारच्या खतांची निर्मिती करण्यात येते. खत निर्मितीमध्ये जगात रशियाचा तेरा टक्के वाटा आहे. रशियामध्ये सिंथेटिक फर्टिलायझर आणि युरियाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होते. अशा स्थितीमध्ये जर रशियावरील निर्बंध कायम राहिल्यास जगात खतांचा तुटवडा निर्माण होऊ शकतो. भारतात देखील ऐन पेरणीच्या हंगामात खते महागण्याची शक्यता आहे. खते महाग झाल्यास त्याचा मोठा आर्थिक फटका हा शेतकरी वर्गाला बसू शकतो.
संबंधित बातम्या
EPF वर व्याजदर किती मिळेल? या आठवड्यात होणार निर्णय
बाजारात चैतन्य परतले; मुंबई निर्देशांकांने घेतली 1552 अंकांची उसळी तर निफ्टीमध्ये 411 अंकांची तेजी
अमेरिकेची शिष्टाई आली कामी; UAE ने उत्पादन वाढीच्या संकेतांनी खनिज तेलाच्या किंमती घसरल्या