ITR News : ITR भरण्याची वेळेपूर्वी करा घाई, संधीला तोड नाही , असे मिळवा सहा फायदे

Last Date ITR : आयकर विवरण पत्र वेळेत भरले तर दंड आणि कारवाईपासून तुम्ही वाचू तर शकतातच पण वेळेच्या आत आयटीआर भरल्यास हे सहा फायदे होतात.

ITR News : ITR भरण्याची वेळेपूर्वी करा घाई, संधीला तोड नाही , असे मिळवा सहा फायदे
Image Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Jul 10, 2022 | 6:07 PM

आयकर विवरण पत्र भरण्यासाठी तुम्ही शेवटच्या तारखेची वाट पाहत आहात काय ? करदात्यांनी (Taxpayer) आयकर विवरण पत्र (Income Tax Return) वेळेच्या आत भरणे आवश्यक आहे. त्यामुळे कारवाई आणि दंड (Penalty) दोन्ही टाळता येते. आयकर विवरण पत्र (ITR) भरण्यासाठी बरेच करदाते चालढकल करतात. वेळेवर तांत्रिक अडचणी आल्या की, त्यांची तारांबळ उडते. महत्वाचे काम सोडून आयटीआर भरण्यासाठी धावाधाव करावी लागते. काही तांत्रिक बिघाडामुळे रिटर्न वेळेच्या आत भरता येत नाही. कालमर्यादा(Time Bond) संपल्यानंतर आयटीआर दाखल केल्यास, आयकर कायदा (Income Tax Act), 1961 च्या कलम 234A अंतर्गत व्याज तर लागतेच पण दंड ही आकारल्या जातो. त्यामुळे वेळेच्या आता आयकर विवरण पत्र भरले तर तुमच्यावरील कारवाई टळू शकेल आणि वेळेत आयटीआर न भरल्यामुळे होणारा नाहकचा मनस्ताप ही तुम्ही वाचवू शकाल. एवढेच नाही तर वेळेत आयकर विवरण पत्र दाखल केल्यास तुम्हाला फायदा ही होतो. चला तर बघुयात करदात्याला काय फायदा होऊ शकतो ते.

कर्ज मंजूरी लवकर

कर्ज मंजुरीसाठी आयटीआरची प्रत आवश्यक असते. जर तुम्हाला कर्ज घ्यायचे असेल तर सर्वात अगोदर सर्व कामे सोडून आयटीआर भरणे आवश्यक आहे. त्यामुळे कर्ज मंजूरीसाठी त्रास होणार नाही. आयटीआर प्रत जोडल्यास कर्ज मिळणे सोपे होते. गृहकर्ज असो वा वाहन कर्ज, सर्व बँका आयकर विवरण पत्राची प्रत मागतात.

व्हिजा

परदेशात जाण्याचा बेत आखात असाल तर आयटीआरची प्रत तुमच्या कामी येईल. कारण इमिग्रेशन (emigration) कार्यालयात अगोदर आयटीआरची प्रत तुमच्याकडून घेण्यात येते. आजच्या घडीला जवळपास सर्वच परराष्ट्र वकालती, दूतावास(Embassy) वाणिज्य दूतावास (consulate) तुम्ही सध्या भारलेल्या उत्पन्न कर विवरण पत्र मागतील. त्याशिवाय तुम्हाला व्हिजा(VISA) मिळणार नाही.

हे सुद्धा वाचा

कर परताव्याचा दावा

टीडीएस मार्फत रक्कम कपात झाली आणि ती परत मिळवायची असेल तर तुम्हाला आयटीआर भरणे आवश्यक आहे. उत्पन कर विवरण पत्र भरल्याशिवाय तुम्हाला परताव्याची प्रक्रिया पूर्ण करता येणार नाही. तरच तुमच्या खात्यात टीडीएसची रक्कम जमा होईल.

उत्पन्न आणि पत्त्याचा सबळ पुरावा

उत्पन्न आणि पत्ता याचा सबळ पुरावा म्हणून आयटीआर उपयोगी पडतो. यापेक्षा दुसरे मजबूत कागदपत्र असू शकत नाही. तुमचे उत्पन्न आणि पत्त्यासाठी हा सबळ पुरावा म्हणून उपयोगी पडतो. कारण त्याला प्राप्तिकर खात्याची पुष्टी असते.

नुकसान भरपाई

31 जुलै पूर्वी तुम्ही आयटीआर जमा करत असाल तर तुम्हाला नुकसानीची भरपाई पुढील वर्षांपर्यंत वाढविता येईल. ही भरपाई तुम्हाला पुढच्या आर्थिक वर्षांपर्यंत वाढविता येते. या नुकसानीची भरपाई तुम्हाला पुढील वर्षी करता येते. एवढेच नाही तर पुढच्या वर्षी लवकर ही प्रक्रिया पूर्ण केल्यास या जबाबदारीतून ही तुम्हाला माफी मिळू शकते.

दंडाच्या रक्कमेतून दिलासा

आयटीआर वेळेच्या आत भरल्यास तुम्ही कारवाई आणि दंडातून तुमची सूटका तर होईलच पण मनस्तापातून ही दिलासा मिळेल. दंडावर तुम्हाला कधी कधी व्याज ही आकारल्या जाऊ शकते. दंडाची रक्कम 5,000 रुपयांपर्यंत असू शकते.

बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.