नवी दिल्ली : पारा चढण्यापूर्वी रविवारी सकाळीच जवळच्या ठिकाणी जायचे असेल तर पेट्रोल-डिझेलचा आजचा भाव जाणून घ्या. जागतिक बाजारात कच्चा तेलात (Crude Oil) सातत्याने चढउतार सुरु आहे. आज कच्चा तेलाचे दर वधारले नाहीत. पेट्रोलियम कंपन्यांना दिलासा मिळाला आहे. पण हा दिलासा कोट्यवधी ग्राहकांपर्यंत कधी पोहचेल हा प्रश्न आहे. गेल्या एका वर्षांपासून पेट्रोलियम कंपन्यांना स्वस्तात पेट्रोल-डिझेल (Petrol Diesel Price) मिळूनही त्याचा कणभर ही फायदा ग्राहकांना मिळालेला नाही. आता कर्नाटक पराभवानंतर आता भावात कपात होण्याची दाट शक्यता असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. कारण छत्तीसगड आणि मध्यप्रदेशसह लोकसभेच्या निवडणुका टप्प्यात आहेत.
कच्चा तेलाची किंमत
आज 13 मे रोजी, डब्ल्यूटीआई क्रूड ऑईल (WTI Crude Oil) 70.04 डॉलर प्रति बॅरलवर झाले. तर ब्रेंट क्रूड ऑईल (Brent Crude Oil) 74.17 डॉलर प्रति बॅरल झाले. पेट्रोलियम कंपन्यांनी आज सकाळी 6 वाजताच इंधनाचे दर जाहीर केले. त्यानुसार, तुमच्या शहरातील भाव जाणून घ्या. राज्यात रायगडसह ठाण्यामध्ये पेट्रोल-डिझेल स्वस्त आहे. तुमच्या शहरातील भाव एका एसएमएसवर जाणून घेता येईल.
इंधन होईल स्वस्त
सूत्रांच्या माहितीनुसार. पेट्रोल-डिझेलच्या किंमती लवकरच कमी होतील. पुढील 6 महिन्यात हळूहळू पेट्रोल-डिझेलच्या किंमती कमी होतील. तज्ज्ञांच्या मते, सध्या पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत 20 रुपयांची कपात होण्याची संभावना आहे. ही कपात एकदाच होणार नाही. तर टप्प्याटप्प्याने ही कपात करण्यात येईल.
जून महिन्यात पहिली कपात
कर्नाटकी रागाने काँग्रेसचं कम बँक झाले आहे तर भाजपचा पराभव झाला आहे. या नाट्यमय घडामोडींचा परिणाम सर्वच स्तरावर आता दिसून येईल. पुढच्या टप्प्यात 4 राज्यातील निवडणूका होत आहेत. पुढील वर्षी लोकसभेच्या निवडणूका होत आहे. त्यामुळे केंद्र सरकार पेट्रोल-डिझेल कार्ड खेळण्याच्या तयारीत आहे. आता इंधन स्वस्त होण्याची शक्यता आहे.
मोठा बदल नाही
केंद्र सरकारने 22 मे रोजी पेट्रोल-डिझेलवरील उत्पादन शुल्कात (Excise Duty) कपात केली. त्यानंतर देशातील भाजपशासित राज्यांनी तोच कित्ता गिरवला. त्यांनी मूल्यवर्धीत करात कपात केली. त्यामुळे जनतेला एका लिटरमागे 10 ते 12 रुपयांचा फायदा तर झालाच. पण गेल्या एक वर्षात इंधनाच्या भावात कोणताही मोठा बदल झालेला नाही.
प्रति लिटर इतका फायदा
देशात पेट्रोल-डिझेलच्या किंमती (Petrol-Diesel Prices) गेल्या वर्षभरापासून मोठा फरक दिसलेला नाही. बाजारात तेलाच्या किंमतीत मामूली बदल दिसतो. जवळपास 345 दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत मोठी तफावत दिसलेली नाही. एका अहवालानुसार, तेल कंपन्यांना प्रति लिटर 10 रुपयांपेक्षा जास्त नफा झाला आहे.
भाव एका SMS वर