Rupees : रुपया कमजोर होतोय? कोणी लावला हा शोध ? अर्थमंत्र्यांचा हा दावा तर पहा..

Rupees : रुपया कमजोर होतोय, असं तुम्हाला वाटतंय, पण अर्थमंत्र्यांनी तर भारीच दावा केलाय..

Rupees : रुपया कमजोर होतोय? कोणी लावला हा शोध ? अर्थमंत्र्यांचा हा दावा तर पहा..
कोण म्हणतंय रुपया घसरतोय?Image Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Oct 16, 2022 | 3:25 PM

नवी दिल्ली : रेकॉर्डब्रेक महागाई(Inflation) आणि मंदीचे (Recession) सावट यामध्ये डॉलरच्या (Dollar) तुलने रुपयाची घसरण सुरु आहे. रुपयाने (Rupees) डॉलरपुढे सपशेल नांगी टाकली आहे. एका डॉलरच्या तुलनेत रुपया 82.69 रुपये आहे. म्हणजेच एका डॉलरसाठी तुम्हाला 82.69 रुपये खर्च करावे लागतील. आता तज्ज्ञांच्या मते, डॉलरची एवढी मजबूती आणि रुपयाची एवढी घसरण चिंताजनक आहे. पण केंद्रीय अर्थमंत्र्यांनी (Finance Minister) या उत्तरात ट्विस्ट आणला आहे.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांनी दावा केला की, इतर देशांच्या चलनाचा विचार करता भारताचा रुपया दमदार कामगिरी करत आहे. त्यांनी भविष्यात बाजारातील उभरते चलनाविषयी (Emerging Market Currencies) चर्चेदरम्यान त्यांनी हा दावा केला.

हे सुद्धा वाचा

इतर देशांच्या चलनांच्या मानाने रुपयाचे प्रदर्शन चांगले असल्याचे हे द्योतक असल्याचे त्यांनी सांगितले. इतर देशाच्या चलनाच्या मानाने रुपयाचे प्रदर्शन चांगले असल्याचा दावा केंद्रीय अर्थमंत्र्यांनी केला आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयाची रेकॉर्डब्रेक घसरण झाल्यानंतर अर्थमंत्र्यांचे हे वक्तव्य केले आहे.

त्यापुढे जाऊन सीतारमण यांनी डॉलर दिवसागणिक मजबूत होत असल्यानेच रुपयाची घसरण होत असल्याचा अजब दावा केला. रुपया कमजोर होत नसल्याचा दावा त्यांनी केला. त्याऐवजी डॉलर मजबूत होत असल्याचा युक्तीवाद अर्थमंत्र्यांनी केला. सीतारमण सध्या अमेरिकन दौऱ्यावर आहेत.

सध्या बाजारात मोठ्या प्रमाणात चढ-उतार होताना दिसत नाही. परिणामी भारतीय केंद्रीय रिझर्व्ह बँकही बाजारात दखल देत नसल्याचे त्यांनी सांगितले. रुपयाच्या घसरणीवर थेट उत्तर देणं त्यांनी टाळलं. अमेरिकन डॉलरच्या तुलने भारतीय रुपया मजबूत स्थिती असल्याचा दावा त्यांनी केला.

आंतरराष्ट्रीय नाणेनिधी(IMF) आणि जागतिक बँकेच्या (World Bank) वार्षिक बैठकीत सीतारमण यांनी सहभाग घेतला. त्यांनी पत्रकार परिषदेदरम्यान अनेक मुद्यांवर केंद्र सरकारची बाजू मांडली. रशिया-युक्रेन युद्धाचा ही परिणाम रुपयाच्या घसरणीवर होत असल्याचा दावा करण्यात येत आहे.

बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.