Rupees Trade | बस्स झालं डॉलरचा गुणगान, आता परदेशी व्यवहारही रुपयातच

Rupees Trade | आता परदेशी व्यापार आणि व्यवहार हा रुपयातूनच करण्यासाठी भारत ठोस पाऊल टाकणार आहे. डॉलरऐवजी रुपयात व्यवहारावर भर देण्यात येणार आहे. त्यासाठी एका खास बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

Rupees Trade | बस्स झालं डॉलरचा गुणगान, आता परदेशी व्यवहारही रुपयातच
डॉलर नको हवा भारतीय कलदारImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Sep 07, 2022 | 12:34 PM

Rupees Trade | विदेशातील व्यापार अथवा व्यवहार (Foreign Trade-Transaction) करण्यासाठी अमेरिकन डॉलरला (American Dollar) पर्याय म्हणून भारतीय रुपयाला (Rupees) प्रोत्साहन देण्यात येणार आहे. भारत लवकरच यासाठी ठोस पाऊल टाकणार आहे. त्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, बँकिंग संघटना, उद्योग संघटनांचे प्रतिनिधी यांच्यासह परराष्ट्र मंत्रालय आणि वाणिज्य खात्याचे अधिकारी बैठक घेणार आहेत. अर्थसेवा सचिव संजय मल्होत्रा यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होईल.

RBI ने यापूर्वीच केले समर्थन

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने भारतीय रुपयांमध्येच परदेशी व्यापार आणि व्यवहार करण्याचे यापूर्वीच समर्थन केले होते. आरबीआयने त्यासाठी पत्रव्यवहार केला. त्यात रुपयातून परदेशी व्यवहार करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याचे बँकांना निर्देश देण्यात आले होते.

जागतिक समुदाय व्यापारास उत्सूक

जागतिक समुदाय भारतासोबत व्यापारासाठी उत्सूक आहे. भारतीय रुपयात हा कारभार व्हावा यासाठी अनेक जण उत्सूक आहेत. त्यामुळे आरबीआय परदेशी व्यापार भारतीय रुपयातून होण्यासाठी प्रोत्साहन देत आहे.

हे सुद्धा वाचा

काय होतील परिणाम

आंतरराष्ट्रीय व्यापार आणि व्यवहार रुपयामध्ये केल्यास, रुपयाचे महत्व वाढेल. आंतरराष्ट्रीय स्तरावर रुपयाची घसरण थांबवता येईल. इतर चलनांपेक्षा भारतीय रुपयाची घसरण डॉलरच्या मुकाबल्यात कमी आहे. रुपयाचा वापर झाल्यास आयात खर्चात कपात होईल. सध्या रशिया आणि भारताचा व्यापार रुपयातच होत आहे.

अमेरिकन बँकेच्या धोरणाचा दुष्परिणाम

अमेरिकन फेडरल बँकेने देशातील महागाई आटोक्यात आणण्यासाठी व्याजदर वाढवले आहेत. परिणामी डॉलर मजबूत झाला. पण इतर देशातील व्यापाऱ्यांना आता त्यासाठी जादा रक्कम मोजावी लागत आहे. त्यामुळे त्यांना नुकसान होत आहे. तर अनेक देशांचे चलन घसरल्याने त्यांना ही तोटा सहन करावा लागत आहे.

भारताचा फायदा

इतर देशांचे चलन घसरण असताना भारताचा रुपयाची घसरण तशी कमी आहे. भारत सरकार या गोष्टीचा फायदा घेऊ इच्छित आहे. त्यामुळेच डॉलरला बायबाय करत रुपयाचा खणखणीत कलदार आता आंतरराष्ट्रीय स्तरावर वाजणार आहे.

धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट.
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा.
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?.
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'.