अर्थविषयक महत्त्वाच्या घडामोडी : म्युच्युअल फंडांच्या शेअर्सवर लक्ष ठेवा
तुमच्या आयुष्यावर आणि खिशावर प्रभाव टाकणाऱ्या अर्थविश्वातल्या महत्त्वाच्या घडामोडी
मुंबई : 1. डिसेंबर २०२२ मध्ये, SIP च्या माध्यमातून होणारी गुंतवणूक नव्या उच्चांकाला पोहोचली आहे. गुंतवणूकदारांनी डिसेंबर २०२२ मध्ये SIP च्या माध्यमातून १३,५७३ कोटी एवढ्या रकमेची गुंतवणूक केली आहे. पूर्ण २०२२ चा विचार केल्यास, SIP च्या माध्यमातून एकूण १.५ लाख कोटींची गुंतवणूक करण्यात आली आहे. २०२१ च्या तुलनेत या रकमेमध्ये तब्बल ३१% वाढ झाली आहे. सध्या भारतात ६.१२ कोटी म्युच्युअल फंड अकॉउंट असून, म्युच्युअल फंड इंडस्ट्रीची AUM ४० लाख कोटींच्या वर गेली आहे.
परिणाम – यामुळे, म्युच्युअल फंड कंपन्यांच्या उत्पन्नात वाढ होणार असून, HDFC AMC आणि मोतीलाल ओसवाल सारख्या शेअर्समध्ये तेजी येण्याची शक्यता आहे.
2. रतन इंडिया एंटरप्रायजेस या कंपनीने इलेक्ट्रिक वेहिकल बनवणारी रिवोल्ट मोटर्स हि कंपनी खरेदी केली आहे. आता इथून पुढे रिवोल्ट मोटर्स हि कंपनी रतन इंडिया एंटरप्रायजेसची सब्सिडीअरी म्हणून व्यवसाय करेल. रिवोल्ट मोटर्स हि भारतात सगळ्यात जास्त इलेक्ट्रिक गाड्या विकणारी कंपनी असून कंपनीचा मानेसरमध्ये मॅन्युफॅक्चरिंग प्लांट आहे. कंपनी सध्या ३० डीलर्सच्या माध्यमातून गाड्यांची विक्री करते.
परिणाम – या व्यवहारानंतर, कंपनीला आता अधिक वेगाने विस्तार करता येईल. रतन इंडियाच्या उत्पन्नात वाढ होईल.
3. क्रेडाईने दिलेल्या अहवालानुसार, बहुसंख्य बिल्डर २०२३ मध्ये रिअल इस्टेटच्या किमतींमध्ये मोठी वाढ होईल, असा अंदाज व्यक्त केला आहे. २०२२ मध्ये, सर्वाधिक घरांची विक्री झाली आहे. तोच ट्रेंड २०२३ मधेही चालू राहण्याची शक्यता आहे. तसेच, बांधकामासाठी लागणाऱ्या साहित्याच्या किमती कमी होण्याची शक्यता खूप कमी आहे. ऑकटोबर २०२२ पासून स्टीलच्या किमतींमध्ये जवळपास 10% वाढ झाली आहे
परिणाम – २०२३ मध्ये घरांच्या किमती वाढण्याची शक्यता असून, याचा सकारात्मक परिणाम रिअल इस्टेट शेअर्सवर होणार आहे
4. घाऊक महागाईचा दर ४.९५ टक्यापर्यंत खाली आला आहे. हा मागच्या २२ महिन्यातील निच्चांकी आकडा आहे. अन्न धान्य, मिनरल ऑइल, क्रूड ऑइल आणि नॅचरल गॅसच्या किमती कमी झाल्यामुळे घाऊक महागाईचा दर कमी झाला आहे, अशी माहिती कॉमर्स मंत्रालयाने दिली आहे.
परिणाम – येणाऱ्या काळातदेखील, महागाईचा दर कमी राहण्याची शक्यता असून, भारतातले व्याजदर कमी होण्यास मदत होईल.
5. भारतातले मध्यमवर्गीय नागरिक अडचणीत आहेत, याची आपल्याला कल्पना आहे, अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली आहे. यामुळेच, सरकारने इन्कम टॅक्सच्या रेटमध्ये वाढ केली नाहीये, असं देखील निर्मला सीतारामन म्हणाल्या आहेत. तसेच, सरकार शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्यासाठी कटिबद्ध आहे, असा विश्वासदेखील त्यांनी व्यक्त केला आहे. सध्या ५ लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर इन्कम टॅक्स द्यावा लागत नाही. आता येणाऱ्या बजेटमध्ये हि मर्यादा वाढणार का, याचं उत्तर १ फेब्रुवारी ला मिळणार आहे.
परिणाम – हि मर्यादा वाढल्यास, सरकारच्या उत्पन्नात घट होणार असलीतरी, करोडो करदात्यांना दिलासा मिळणार आहे.
6. सरकारी बँकांची कामगिरी सुधारण्यासाठी सरकारने अनेक उपाययोजना केल्या. या प्रयत्नांना चांगलं यश मिळालं, अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली आहे. सरकारी बँकांच्या NPA मध्ये घट झाली आहे. तसेच, २०२२ मध्ये सरकारी बँकांच्या नफ्यामध्ये १००% वाढ झाली आहे. सध्या सरकारी बँकांचा NPA ५ टक्यापर्यंत खाली आला आहे. हा मागच्या ७ वर्षातला निच्चांकी आकडा आहे.
परिणाम – येणाऱ्या काळातदेखील सरकारी बँकांची कामगिरी सुधारणार असून, PSU बँक इंडेक्समध्ये तेजी येईल.