Financial Planning : पगार कसा येतो आणि कुठे जातो कळंत नाही? या टिप्सने करा योग्य नियोजन

आपण आपली उद्दिष्टे जाणून घेतल्यास, आपण त्यानुसार गुंतवणूकीची योजना तयार करू शकता आणि त्याद्वारे जीवनाची महत्त्वपूर्ण उद्दिष्टे साध्य करू शकता (Financial Planning for better future)

Financial Planning : पगार कसा येतो आणि कुठे जातो कळंत नाही? या टिप्सने करा योग्य नियोजन
money
Follow us
| Updated on: Feb 22, 2021 | 4:03 PM

मुंबई : जेव्हा आपण दररोज सकाळी उठतो, तेव्हा आपल्या डोक्यात दिवसभराची एक योजना तयार असते. जी आपल्याला त्या दिवसात पूर्ण करायची असते. मग त्यात, आपण आधीपासून काम करत असलेला प्रकल्प पूर्ण करण्याचा विचार असेल किंवा एखाद्या ग्राहकाबरोबर एखादा महत्त्वपूर्ण करार पूर्ण करण्याची इच्छा असेल. आपल्यापैकी बरेचजण दिवसभरासाठी निश्चित केलेली उद्दिष्ट साध्य करू शकतात. कारण त्यांनी त्याची योजना अगोदरच तयार केलेली असते. घर विकत घेणे, कार घेणे, मुलांचे शिक्षण आणि लग्नापासून आरामदायी निवृत्ती यासारख्या जीवनातील मोठ्या उद्दिष्टांसाठी आपण काळजीपूर्वक योजना आखली पाहिजे (Financial Planning how to set a goal for better future).

छोट्याशा पावलाने सुरु होते ध्येय नियोजनाची प्रक्रिया

यासाठी सर्वात आधी आपले लक्ष्य लिहून घ्या. तुम्हाला पुढच्या वर्षी कार खरेदी करायची आहे?, लग्नाच्या किंवा स्वतःच्या वाढदिवसासारख्या खास प्रसंगी परदेशात फिरायला जायचे आहे? स्वतःसाठी मोठे घर घ्यायचे आहे? की मुलांचे शिक्षण आणि लग्नासाठी पैसे वाचवायचे आहेत?, हे आधी लिहून ठेवा.

आपली उद्दिष्टे साध्य करण्यासाठी त्यांचे नियोजन महत्वाचे

ध्येय नेहमी अल्पकालीन, मध्यम आणि दीर्घ अशा तीन मुदतींची असतात. कोणते ध्येय मध्यम मुदतीचे व कोणते दीर्घ मुदतीचे आहे, ते आपण कसे ठरवाल? यासाठी सोप्या मार्गदर्शक टिप्स :

– अल्प-मुदतीची उद्दिष्टे ती आहेत, जी आपण 2 वर्षांच्या आत साध्य करू इच्छिता. जसे की एखाद्या गुंतवणूकीची योजना तयार करणे, आवश्यकतेनुसार जीवन आणि आरोग्य विमा घेणे, गुंतवणूकीसाठी आपल्या पगाराच्या काही भागाचे ऑटो-डेबिट करणे आणि कोणतीही गोष्ट पूर्ण करण्यासाठी आपत्कालीन निधी तयार करणे, ही अल्पकालीन उद्दीष्ट आहेत. एखाद्या महागड्या फर्निचरपासून मोठ्या फ्रीजपर्यंत आणि सुट्टीच्या दिवशी कुटुंबास फिरायला नेणे, हे देखील आपले अल्प-मुदतीचे ध्येय आहे.

– मध्यम-मुदतीची उद्दिष्टे ती आहेत, जी आपण 2 ते 5 वर्षांच्या आत प्राप्त करू इच्छिता. आपले स्वतःचे अपार्टमेंट घेणे किंवा मोठे घर खरेदी करणे हे मध्यम-मुदतीचे लक्ष्य असू शकते.

– दीर्घकालीन उद्दिष्टांमध्ये आपल्या जीवनातील मोठी स्वप्ने समाविष्ट असतात. यात मुलांचे महाविद्यालयीन शिक्षण, सेवानिवृत्ती, मुलांची लग्न, सेवानिवृत्तीपूर्वी गृह कर्जाची परतफेड किंवा कामकाजाच्या आयुष्यातून अकाली निवृत्ती घेण्यासाठी आवश्यक असलेले कॉर्पस जमवणे हे दीर्घकालीन ध्येयामध्ये सामील होते (Financial Planning how to set a goal for better future).

पहिल्या पगारापासून करा गुंतवणूक!

ही उद्दिष्टे साध्य करण्यासाठी, प्रत्येक उद्दिष्टासाठी गुंतवणूकीची एक रणनीती बनवावी लागते. साधारणत: या उद्दिष्टांसाठी अनेकक दशके शिस्तबद्ध गुंतवणूक करणे आवश्यक असते. आपणास आपली उद्दिष्टे गाठण्याची गती वाढवायची असल्यास, आपण लवकरात लवकर गुंतवणूक सुरू करावी. पहिल्या पगारापासून गुंतवणूक करणे, नेहमीच योग्य मानले जाते.

उद्दिष्टांसाठी गुंतवणूक योजना गरजेची!

एकदा आपल्याला आपली उद्दिष्ट्ये माहित झाल्यावर, आपण आपले उत्पन्न काळजीपूर्वक खर्च करण्याचा निर्णय घेऊ शकता. उदाहरणार्थ, आपण प्रथम बचत कराल आणि नंतर उर्वरित उत्पन्नाचा आणखी काही भाग वाचवाल. आपण आपली उद्दिष्टे जाणून घेतल्यास, आपण त्यानुसार गुंतवणूकीची योजना तयार करू शकता आणि त्याद्वारे जीवनाची महत्त्वपूर्ण उद्दिष्टे साध्य करू शकता.

जर तुम्हाला तुमच्या जीवनाची उद्दिष्टे साध्य करायची असतील, तर आता तुम्हाला काय करावे लागेल, हे तर माहित आहेच! तव्हा आजच पेन आणि कागद उचलून आपल्या योजना सुरू करा. परंतु हे लक्षात ठेवा की, आपली उद्दिष्टे अशी असली पाहिजेत, जी आपण साध्य करू शकू अन्यथा आपण अपयशी ठरण्याची शक्यता अधिक आहे.

(टीप : कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

(Financial Planning how to set a goal for better future)

हेही वाचा :

FD Rates In India: 2 कोटींपेक्षा कमी FD: SBI, PNB सह 5 मोठ्या बँकांमध्ये व्याजदर काय?

कमी पैशात करा ‘हा’ कोर्स आणि स्वस्त: बनवा इलेक्ट्रिक कार, DIY ची बेस्ट बिझनेस आयडिया

पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.