Home Buying Tips | पहिलंच घर खरेदी करताय? मग ‘या’ गोष्टींकडे लक्ष द्या!

सध्या घर खरेदीला दमदार मागणी आहे, तसेच स्वस्त गृहकर्जांचेही आकर्षण आहे. अशावेळी तुम्हीही नवीन घर खरेदी करण्याचा विचार करत आहात का

Home Buying Tips | पहिलंच घर खरेदी करताय? मग ‘या’ गोष्टींकडे लक्ष द्या!
घर घेण्यासाठी आपले बजेट काय आहे, या एका प्रश्नावर पुढील इतर गोष्टी अवलंबून असतात.
Follow us
| Updated on: Feb 05, 2021 | 11:12 AM

मुंबई : गृह कर्जावरील व्याज दर हे सध्या नेहमीपेक्षा खूप कमी आहेत. अनेक बँका आणि गृह वित्त कंपन्यांचे व्याज 6.75% च्या पातळीवर पोहोचले आहे. कोरोनाने गृह खरेदीदारांना रिअल इस्टेट मार्केटपासून दूर ठेवले आहे. या क्षेत्रात सध्या घर खरेदीला दमदार मागणी आहे, तसेच स्वस्त गृहकर्जांचेही आकर्षण आहे. अशावेळी तुम्हीही नवीन घर खरेदी करण्याचा विचार करत आहात का? जर आपण पहिले घर विकत घेण्याचा विचार करत असाल तर ‘या’ गोष्टी आधी लक्षात घ्या…( First home and new home buying tips for beginners)

आपले बजेट किती आहे?

घर घेण्यासाठी आपले बजेट काय आहे, या एका प्रश्नावर पुढील इतर गोष्टी अवलंबून असतात. यानंतर, घराचे आकार आणि स्थान निश्चित करणे महत्त्वाचे आहे. जर आपण नवीन घर होमलोनवर घेत असाल तर जितके पैसे डाऊन पेमेंट म्हणून द्याल, तितका कर्जाचा बोजा कमी होईल. डाऊन पेमेंटसाठी आपल्याकडे किती पैसे आहेत आणि कर्ज किती घ्यावे लागेल? या कर्जाचा ईएमआयदेखील द्यावा लागणार आहे. याचाच अर्थ असा आहे की दरमहा आपल्या पगाराचा एक भाग हा या कर्जाची परतफेड करत असेल. म्हणूनच सर्व खर्चाचे मूल्यांकन करणे विसरू नका.

घराचे लोकेशन तपासा…

केवळ गुगल मॅपवर घराचे लोकेशन पाहू नका. तिथे स्वतः जा आणि ती जागा नीट तपासून घ्या. अन्यथा अशी परिस्थिती होईल की, घर असेल दूरच्या ठिकाणी आणि तिथून आपले कामाचे ठिकाण, तसेच आपल्याला शहरात कुठेही फिरायला जाण्यासाठी अगदी कष्ट घ्यावे लागतील. कुटुंबातील सदस्यांनाही कुठेतरी बाहेर जायचे असल्यास पुन्हापुन्हा विचार करावा लागेल (First home and new home buying tips for beginners).

लोकेशनला कधी भेट द्याल?

हा प्रश्न विचित्र वाटू शकतो परंतु महत्त्वाचा आहे. अर्थात, आपण साईट व्हिजीटसाठी सकाळच्या वेळेतच जातो, परंतु रिअल इस्टेट नेमकी कशी आहे हे जाणून घेण्यासाठी, संध्याकाळनंतरही त्याची तपासणी करणे महत्वाचे आहे. त्या ठिकाणी किती पथदिवे सुरू आहेत, कॅब, ऑटो व सार्वजनिक वाहतूक सोय उपलब्ध आहे का, हे तपासून पाहा.

एका महिन्याचा पगार पुरेसा नाही?

जेव्हा गृहकर्ज दिले जाईल, तेव्हा आपले 6 महिन्यांचे बँक स्टेटमेंट तपासले जाईल. आपले खाते लगेच रिक्त होते का हे पहिले तपासले जाईल. आपण प्रत्येक महिन्यात बँक खात्यात किती रक्कम शिल्लक ठेवतो, यावर आपल्या कर्जाची परतफेड करण्याची क्षमता बँक ठरवते.

सिबिल स्कोअर

हा स्कोअर आपल्या सर्व कर्जांची माहिती देतो. सिबिल आपल्या क्रेडिट कार्ड पेमेंट, जुने कर्ज किंवा कोणत्याही जुन्या डीफॉल्टबद्दल माहिती देतो.मात्र, जर आपल्याकडे क्रेडीट कार्ड नसेल किंवा जुने कर्जही नसेल तर सिबिल कसे मिळेल?, असा प्रश्न तुम्हालाही पडला असेलच ना?  अशावेळी काळजी करण्याचे काहीच कारण नाही. हा स्कोअर तेथे दिसणारच नाही, त्यावेळी तुमचे बँक स्टेटमेंट या नव्या कर्जाचा आधार असेल.

(First home and new home buying tips for beginners)

हेही वाचा :

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.