सलग पाच दिवस बँका बंद, नवरात्रीत ATM मध्ये पैशांचा तुटवडा?

लवकरच आता नवरात्री येत आहे. त्यानंतर लगेच दिवाळी आहे. दिवाळी म्हटली की, लोक मोठ्या प्रमाणात खरेदीसाठी घराबाहेर पडतात. पण या दरम्यान सलग पाच दिवस बँका बंद (Bank Employees Strike) असणार आहेत.

सलग पाच दिवस बँका बंद, नवरात्रीत ATM मध्ये पैशांचा तुटवडा?
Follow us
| Updated on: Sep 23, 2019 | 9:33 AM

मुंबई : लवकरच नवरात्रीला सुरुवात होणार आहे. त्यानंतर अवघ्या काही दिवसांवर दिवाळी येऊन ठेपली आहे. दिवाळी म्हटली की, लोक मोठ्या प्रमाणात खरेदीसाठी घराबाहेर पडतात. पण या दरम्यान सलग पाच दिवस बँका बंद (Bank Employees Strike) असणार आहेत. त्यामुळे खरेदी करताना तुम्हाला पैशांची (Money) कमतरता भासू शकते. कारण या महिन्याचा शेवटी सलग पाच दिवस बँका बंद (Bank Employees Strike) आहेत. त्यामुळे पुढील तीन दिवसात तुम्ही बँकेतून पैसे काढून घेऊ शकता.

या महिन्याच्या शेवटी सलग पाच दिवस बँका बंद आहेत. त्यामुळे त्यापूर्वीच तुम्ही पैसे काढू शकता. जेणेकरुन खरेदीसाठी तुम्हाला अडचणी येणार नाहीत. 26 आणि 27 सप्टेंबर रोजी बँक कर्मचारी संपावर जात आहेत. 10 सरकारी बँकांचे विलनीकरण करणार असल्याने कर्मचारी संप पुकारत आहेत. त्यानंतर 28 सप्टेंबरला महिन्याचा चौथा शनिवार आहे आणि 29 रविवार असल्यामुळे बँक बद राहतील.

सलग 26 ते 29 सप्टेंबर पर्यंत बँका बंद राहिल्यानंतर 30 सप्टेंबरला सुरु होतील. पण या दिवशी महिना अखेर असल्यामुळे बँका व्यवहार करणार नाहीत. सलग पाच दिवस बँका बंद राहिल्याने सामान्य जनतेसह व्यापाऱ्यांनाही याचा त्रास सहन करावा लागण्याची शक्यता आहे.

पाच दिवस सलग बँका बंद राहणार असल्याने त्याचा परिणाम एटीएमवरही पडू शकतो. एटीएममध्ये पैसे नसल्याने पैशांची कमतरता होऊ शकते. कारण एटीएममध्ये दोन दिवसाचे पैसे ठेवू शकतो. संप आणि बँक बंद असल्यामुळे 5 दिवस एटीएममध्ये पैसे टाकले जाणार नाही.

चेक क्लिअर होण्यासाठी वेळ लागणार

जर तुम्ही संप आणि बँका बंद असलेल्या वेळेत बँकेत चेक क्लिअर करण्यासाठी दिलात, तर तो क्लिअर होण्यासाठी आठवडा लागू शकतो. महिन्याच्या शेवटच्या दिवसात बँका बंद असल्यामुळे चेक क्लिअर होण्याची शक्यता कमी आहे. कारण बँका 30 ला जरी सुरु झाल्या, तर 2 ऑक्टोबर रोजी पुन्हा गांधी जयंती आहे. त्यामुळे बँका बंद असतील. तुमचा चेक गांधी जयंतीनंतरच क्लिअर होऊ शकेल.

दरम्यान, सरकारकडून 10 बँकांचे विलिनीकरण करुन चार बँका तयार करण्याची शक्यता आहे. याचा विरोध म्हणून कर्मचारी संघटनेनी संप पुकारला आहे. यामध्ये ऑल इंडिया बँक ऑफिसर्स कन्फेडरेशन, ऑल इंडिया बँक ऑफिसर्स असोसीएशन, इंडियन नॅशनल बँक ऑफिसर्स आणि नॅशनल बँक ऑफिसर्स या संघटनांचा समावेश आहे.

दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.
शरद पवारांकडून RSS चं कौतुक; 'हातचा मळ असा समज अन् गाफिल राहिलो, पण..'
शरद पवारांकडून RSS चं कौतुक; 'हातचा मळ असा समज अन् गाफिल राहिलो, पण..'.