Tea : चहाच्या चवीसाठी मोजा कोट्यवधी! चहापत्तीची किंमत ऐकून तोंडाचा आ वासेल..एका किलोत तर खरेदी करता येईल एक बंगला ..

Tea : सकाळी पित असलेला चहा कोट्यवधी रुपयांचा असल्याचे सांगितल्यावर तुम्हाला विश्वास बसेल का..

Tea : चहाच्या चवीसाठी मोजा कोट्यवधी! चहापत्तीची किंमत ऐकून तोंडाचा आ वासेल..एका किलोत तर खरेदी करता येईल एक बंगला ..
चहासाठी मोजा कोट्यवधीImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Nov 18, 2022 | 8:27 PM

नवी दिल्ली : अनेकांची सकाळ व्यायामाने नाहीतर सकाळच्या वाफाळलेल्या चहाच्या(Tea) घोटाने होते. प्रत्येकाच्या घरात वेगवेगळ्या ब्रँडच्या (Tea Companies) चहा उकळतो आणि कपात ओतल्या जातो. त्याचा अस्वाद घेत गप्पा रंगतात. बाजारात (Market)चहाचे अनेक ब्रँड आहेत. अनेक कंपन्या आहेत. पण तुम्हाला एक कप चहासाठी कोट्यवधी (Crore)रुपये मोजण्यात येतात, हे सांगितल्यावर विश्वास बसेल का?

चला तर , जगातील 5 महागड्या चहांविषयी (Most Expensive Tea) जाणून घेऊयात. त्यांचे बजेट अर्थातच इतके महागडे आहेत की डोळे विस्फरल्याशिवाय आणि तोंडाचा आ वासल्याशिवाय राहणार नाही.

तर ग्राहकांना या महागड्या चहासाठी कोट्यवधी रुपये मोजावे लागतील. या किंमतीत निमशहरात एक बंगला विकत घेता येईल. तर मोठ्या शहरात लक्झरी सदनिका विकत घेता येईल.

हे सुद्धा वाचा

Da-Hong Pao Tea हा जगातील सर्वात महागडा चहा आहे. तो चीनच्या फुजियान या प्रांतातील डोंगरमाळांमध्ये उगविल्या जातो. हा चहा दुर्मिळ असल्याने तो राष्ट्रीय संपत्ती म्हणून घोषीत करण्यात आला आहे. एक किलो चहासाठी 1.2 दशलक्ष डॉलर मोजावे लागतात. म्हणजेच भारतीय चलनात 9 कोटी रुपये मोजावे लागतात.

Panda Dung Tea हा पण एक चीनमधील ब्रँड आहे. पांडाच्या शेणापासून जे खत तयार होते, ते या चहाच्या मळ्यात वापरण्यात येते. हे शेण हाय अॅटीऑक्सिडेंट म्हणून ओळखल्या जाते. एक किलो चहासाठी 57 लाख रुपये खर्च करावे लागतात.

जगातील तिसरी महागडी चहा ही सिंगापूरची आहे. या चहाला Yellow Gold Tea Buds असे म्हणतात. हा पण एक दुर्मिळ चहा आहे. याचे पान सोनेरी रंगाचे असते. वर्षांतून एकदाच याचे पीक घेण्यात येते. एक किलो चहासाठी 6 लाख रुपयांहून अधिकचा खर्च येतो.

Silver Tips Imperial Tea हा चहा भारतात उत्पादित होतो. हा जगातील चौथा सर्वात महागडा चहा आहे. या चहाचे पान केवळ पौर्णिमेच्या रात्रीच तोडण्यात येतात. दार्जिलिंगच्या मळ्यात याचे उत्पादन घेण्यात येते. एक किलो चहासाठी 1,50,724 रुपये मोजावे लागतील.

Gyokuro चा महागड्या चहाच्या यादीतील पाचवा क्रमांक लागतो. जपानमधील उजी जिल्ह्यात याचे उत्पादन करण्यात येते. एक किलो चहासाठी 52,960 रुपये खर्च करावे लागतात.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.