आयकर नियमात 1 एप्रिलपासून होणार हे बदल, वाचा कोणत्या नियमात होणार बदल
आयकर नियमात 1 एप्रिलपासून होणार हे बदल, वाचा कोणत्या नियमात होणार बदल(five rules will be changed in income tax from 1 april 2021)
नवी दिल्ली : यंदाच्या देशाच्या अर्थसंकल्पात आयकरबाबत कोणतीही विशेष घोषणा करण्यात आली नाही. मात्र टॅक्सशी संलग्न नियमात काही बदल करण्यात आलेत. हे नवे नियम 1 एप्रिलपासून लागू करण्यात येणार आहेत. त्यामुळे करदात्यांना काही गोष्टी ध्यानात ठेवणे गरजेचे आहे. तुम्ही या नियमांबाबत जाणून आधीच प्लॅन करु शकता. या अर्थसंकल्पात इनकम टॅक्स नियमांसह आयटीआर भरण्याबाबतही काही बदल करण्यात आलेत. जर तुम्ही आयटीआर भरत असाल तर तुम्हाला या नियमांबाबत जाणून घेणे आवश्यक आहे. जाणून घेऊया 1 एप्रिलपासून बदल होणाऱ्या नियमांबाबत…(five rules will be changed in income tax from 1 april 2021)
जेष्ठ नागरिकांना आयटीआरमधून दिलासा
या अर्थसंकल्पात जेष्ठ नागरिकांसाठी दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. आता 75 वर्षाहून अधिक वयाच्या नागरिकांना आयटीआर न भरण्याची मुभा देण्यात आली आहे. मात्र याचा लाभ तेच नागरिक घेऊ शकतात, ज्यांची कमाई पेन्शन आणि व्याजावर आहे. जेष्ठ नागरिकांना इनकम टॅक्स भरणे अनिवार्य असून बँकेकडून टॅक्स कापूनच तु्म्हाला पैसे मिळतील. मात्र तुम्हाला आयटीआर भरण्याची आवश्यकता नाही.
पीएफच्या व्याजावरही टॅक्स लागणार
अर्थसंकल्पामध्ये अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी ईपीएफ धारकांनाही लक्ष्य केले आहे. जर तुम्ही दरवर्षी 2.5 लाख ईपीएफमध्ये जमा करीत असाल तर अतिरिक्त फंडवर प्राप्तिकर लागू होणार. याआधी ईपीएफ टॅक्स फ्री होते. तसे, फार कमी लोक 2.5 लाखाहून अधिक पैसे जमा करतात. नोकरदार वर्गाचे वार्षिक उत्पन्न 21 लाख रुपयांपेक्षा अधिक असेल तरच तुमचा पीएफ हिस्सा 2.5 लाख रुपये असेल.
या लोकांना भरावा लागणार दुप्पट टॅक्स
जे लोक टीडीएस वाचवण्यासाठी आयटीआर भरत नाहीत अशा लोकांना सरकारने आता लक्ष्य केले आहे. जर तुम्हीही असे करीत असाल तर सावध व्हा. करदात्यांना कर भरण्यासाठी प्रेरीत करण्यासाठी इनकम टॅक्स अॅक्ट 1961 मध्ये सेक्शन 206AB जोडण्याची घोषणा करण्यात आली आहे. या अॅक्टनुसार इनकम टॅक्स रिटर्न फाईल न करणाऱ्यांचे दुप्पट टीडीएस कापले जाणार आहे.
आयटीआर फाईल करणे होणार सोपे
करदात्यांना आयटीआर भरणे सोपे व्हावे यासाठी पगाराव्यतिरिक्त अन्य इनकम सोर्सची माहिती आधीच भरली जाईल. उदा. लाभांश उत्पन्न, भांडवली नफा, बँकेतील ठेवींवरील इनकम, पोस्ट ऑफिस व्याज इनकम याची माहिती आधीच भरली जाईल. आतापर्यंत करदात्यांना याचे वेगळा हिशोब करावा लागत होता. यामध्ये अनेकदा विसरण्याच्या कारणामुळे करदात्यांना त्रासदायक होत होते. मात्र आता अन्य इनकम सोर्सची माहिती आधीच भरल्यामुळे ते सोपे होणार आहे.
नविन उद्योगांसाठी टॅक्स हॉलिडे
या अर्थसंकल्पात सरकारने नवीन उद्योगांना प्रेरणा देण्यासाठी टॅक्सची नवी योजना आणली आहे. आता मार्च 2022 पर्यंत सुरु होणाऱ्या नविन उद्योगांसाठी टॅक्स हॉलिडे ही नवी योजना सरकारने आणली आहे. या योजनेनुसार नवीन उद्योजकांना टॅक्स भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. याशिवाय नवीन उद्योगामध्ये गुंतवणुकदारांना आकर्षित करण्यासाठी टॅक्स फ्री भांडवली नफ्यावरही मुदतवाढ देण्यात आली आहे.(five rules will be changed in income tax from 1 april 2021)
VIDEO | Mumbai Petrol Rate Hike | मुंबईत पेट्रोल, डिझेलचे दर वाढतेच, सर्वसामान्य त्रस्त #Mumbai #Petrol #FuelRate pic.twitter.com/4RemXC6ptS
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 9, 2021
इतर बातम्या
बजेटनंतर शेअर बाजार उसळला, सलग 7 व्या सत्रात सेंसेक्स आणि निफ्टीने मोडला रेकॉर्ड
PM KISAN: नियम बदलले! 6000 रुपये पाहिजेत, तर करा ‘हे’ काम, अन्यथा…
gold today rate : बजेटनंतर अवघ्या 9 दिवसांत सोनं झालं स्वस्त, पाहा तुमच्या शहरातले आजचे भाव