रेल्वे तिकीटाच्या पैशात, विमान तिकीट…; असं करा बुकिंग…
रेल्वे तिकिटाच्या पैशात तुम्हाला आता विमानाचे तिकीट मिळणार असल्याने अनेकांनी आता विमानाच्या प्रवासाला प्राधान्य दिले आहे.
नवी दिल्लीः रेल्वे तिकिटाच्या पैशात तुम्हाला आता विमानाचे तिकीट मिळणार असल्याचे वाचून तुमचा त्यावर विश्वास बसणार नाही. पण हे खरे आहे की एक वेबसाइट आता रेल्वे तिकिटाच्या पैशात फ्लाइट तिकीट देत आहे. आणि तुम्ही ते सहज खरेदीदेखील करू शकणार आहात. आता तुम्हीदेखील विचार करत असाल की हे कसे शक्य आहे. मात्र आता आम्ही तुम्हाला सांगतो की रेल्वे तिकिटाच्या पैशात तुम्हाला विमानाचे तिकीट मिळणे शक्य होणार आहे.
Akasa Air अनेक तिकिटांवर मोठ्या प्रमाणात सूट देत आहे. तुम्ही गांधीनगर, उदयपूर, कल्पेश्वर, गिर नॅशनल पार्क, स्टॅच्यू ऑफ युनिटी, दमण आणि दीव, कच्छ, भूज, सुवली बीच, द्वारका, मांडू, सापुतारा, सोमनाथ, पोरबंदर, वडोदरा, सूरत, उज्जैन यांसारख्या ठिकाणांना भेट देण्याचा विचार करत असाल तर, तर तुम्ही येथे फ्लाइट तिकीट बुक करा.
कारण इथे रेल्वे तिकिटांची किंमत आधीच खूप आहे. मात्र येथे फ्लाइट तिकिटाची किंमत 2500 रुपयांपासून सुरू होत असल्याने ते प्रवाशांसाठी फायद्याचे असणार आहे.
मुंबई ते अहमदाबाद फ्लाइटचे तिकीट दर ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात Akasa Air च्या वेबसाइटवर 1950 ते Rs 2550 पर्यंत उपलब्ध आहेत.
आणि तुम्ही जर या मार्गावर रेल्वेने प्रवास केलात तर तुम्हाला 3 ते 6 हजार रुपयांमध् रेल्वेचे तिकीटचा दर असणार आहे. त्यामुळे ट्रेनच्या तिकिटाच्या दरामध्येच तुम्हाला विमानाचे तिकीट मिळत आहे. त्यामुळे तुम्ही सहज आता विमानाने प्रवास करू शकणार आहे.
जर तुम्हाला तिकीट बुक करायचे असेल तर तुम्ही ते अकासा एअरच्या अधिकृत साइटवरून सहज करू शकता. तुम्हाला फक्त प्रवाशांचे तपशील या ठिकाणी द्यावे लागणार आहेत.
आणि इथे तुम्ही तिकीट बुकिंग काही दिवस अगोदर करूनही घेऊ शकता. कारण तिकीट खूप वेगाने विकली जात आहेत. त्यामुळे अनेक लोक याच साईटवरुन तिकीट खरेदी करत आहेत.