Gold Silver Rate Today : ग्राहकांना महागाईचा ताप! सोने-चांदी पुन्हा महाग

Gold Silver Rate Today : सोने-चांदीच्या भावाचा अंदाज बांधणे सध्या ग्राहकांना कठीण झालं आहे. सकाळच्या सत्रात स्वस्त असणारे सोने अचानक गिरकी घेत असल्याने खरेदीदार संभ्रमात आहे. आजचा भाव काय आहे, माहिती आहे का...

Gold Silver Rate Today : ग्राहकांना महागाईचा ताप! सोने-चांदी पुन्हा महाग
आजचा भाव घ्या जाणून
Follow us
| Updated on: Jun 07, 2023 | 9:05 AM

नवी दिल्ली : सोने-चांदीच्या भावाचा अंदाज बांधणे ग्राहकांना सध्या कठीण झालं आहे. सकाळच्या सत्रात स्वस्त असणारे सोने अचानक गिरकी घेत असल्याने खरेदीदार संभ्रमात आहे. संध्याकाळच्या सत्रात भाव एकदम महाग झाले आहे. 6 जून रोजी सकाळच्या सत्रात भावात बदल नव्हता. पण संध्याकाळी भाव 300 रुपयांनी वधारला. 22 कॅरेट सोने 55,750 रुपये तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 60,800 रुपये झाला. चांदीत सकाळच्या सत्रात काहीच बदल झाला नाही. संध्याकाळी किलोमागे 500 रुपयांची वाढ झाली. चांदी 73,500 रुपये किलो पोहचली. सकाळच्या सत्रात सोने-चांदीच्या किंमतीत (Gold Silver Price) कोणताही बदल झालेला नाही.

या आठवड्यात असा झाला बदल

  1. goodreturns नुसार, 1 जून रोजी सोन्यात 150 रुपयांची घसरण झाली होती.
  2. 22 कॅरेट सोने 55,850 रुपये तर 10 ग्रॅम 24 कॅरेटचा भाव 60,930 रुपये पोहचला.
  3. हे सुद्धा वाचा
  4. 2 जून रोजी सोन्याने मुसंडी मारली. सोने 300 रुपये प्रति 10 ग्रॅमने वधारले
  5. 3 जून रोजी सोन्यात मोठी पडझड झाली. सोने 700 रुपयांनी आपटले
  6. 4, 5 जून रोजी भावात मोठा बदल झाला नाही
  7. 6 जून रोजी भावात प्रति 10 ग्रॅम 300 दरवाढ झाली

24, 23, 22 कॅरेटचा भाव ibjarates.com नुसार, 24 कॅरेट सोन्याचा भाव 60,096 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. 23 कॅरेटचा भाव 59,856 रुपये तर 22 कॅरेटचा भाव 55,047 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. 18 कॅरेट सोन्याचा भाव 45,072 रुपये होता. हे भाव काल संध्याकाळचे आहेत.

भाव एका मिस्ड कॉलवर 22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोने खरेदीपूर्वी तुम्हाला त्याची किंमत एका मिस कॉलवर कळू शकते. त्यासाठी 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊ शकता. त्यानंतर थोड्याचवेळात एसएमएस (SMS) येईल. त्याआधारे तुम्हाला किंमती कळतील. तसेच भाव जाणून घेण्यासाठी तुम्ही www.ibja.co वा ibjarates.com या ठिकाणी माहिती घेऊ शकता.

BIS Care APP सोनार तुम्हाला गंडवत असल्याची शंका असल्यास, अथवा तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असल्यास तुमच्या मोबाईलमध्ये BIS Care APP डाऊनलोड करा. प्ले स्टोअरमध्ये जाऊन तुम्ही हे बीआयएस ॲप घेऊ शकता. तुम्ही खरेदी केलेल्या सोन्यावर त्याचा हॉलमार्क क्रमांक (HUID) अंकित असतो. हा क्रमांक टाकल्यास हॉलमार्किंगची संपूर्ण माहिती समोर येईल आणि सर्वात शेवटी हे सोने किती कॅरेटचे आहे ते दिसेल.

शुद्ध सोन्याचा हॉलमार्क भारतीय मानके संस्थेद्वारे शुद्ध सोन्यासाठी हॉलमार्क देण्यात येतो. 24 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916 तर 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 अंकीत असते. अनेक ठिकाणी ग्राहक 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याची आग्रहाने मागणी करतात.

काही लोक 18 कॅरेट सोन्याचा वापर करतात. जेवढा कॅरेट सोने असेल, तेवढे सोने शुद्ध ठरते 24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध असते. 22 कॅरेट सोने जवळपास 91 टक्के शुद्ध असते. 22 कॅरेट सोन्यात 9% इतर धातू असतात. दागिने तयार करण्यासाठी याचा वापर होतो. त्यात तांबे, चांदी, झिंक यांचा वापर करुन दागिने तयार करण्यात येतात. 24 कॅरेट सोने दमदार असते. पण त्याचा दागिने तयार करण्यासाठी वापर होत नाही.

मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.