Petrol Diesel Rate Today : गुलाबी नोटेने पेट्रोल-डिझेल महाग? खिशाला कितीची झळ

Petrol Diesel Rate Today : जागतिक बाजारात कच्चा तेलाच चढउताराचे सत्र असले तरी भाव 75 डॉलर प्रति बॅरलच्या आसपास आहे. पण या एका कारणामुळे पेट्रोल-डिझेल महागले आहे...

Petrol Diesel Rate Today : गुलाबी नोटेने पेट्रोल-डिझेल महाग? खिशाला कितीची झळ
आजचा भाव घ्या जाणून
Follow us
| Updated on: May 23, 2023 | 8:27 AM

नवी दिल्ली : जागतिक बाजारात कच्चा तेलात (Crude Oil) चढउताराचे सत्र आहे. पण तसा भावात मोठा बदल झालेला नाही. ओपेक प्लस संघटनांनी धोरणात केलेल्या बदलाचा मोठा फायदा सर्वच देशांना झाला. सध्या भाव 75 डॉलर प्रति बॅरलच्या आसपास आहे. शेजारी असलेल्या कंगाल पाकिस्तान सरकारने जनतेसाठी इंधनाच्या किंमतीत मोठी कपात केली. 31मे पर्यंत त्यांना दर कपातीचा दिलासा मिळेल. भारतात आजपासून 2000 रुपयांच्या गुलाबी नोटेच्या पाठवणीचा महोत्सव सुरु होत आहे. काही पेट्रोल पंपावर दोन हजारांच्याच नोटा जास्त येत असल्याने टाकी फुल्ल करुन घ्या अथवा कमिशन द्या असा मामला सुरु असल्याची चर्चा आहे. त्यामुळे पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत (Petrol Diesel Price) अशी कृत्रिम वाढ झाली आहे.

क्रूड ऑईलचा भाव आज 23 मे रोजी, कच्चा तेलाच्या किंमतीत चढउताराचे सत्र आहे. डब्ल्यूटीआई क्रूड ऑईल (WTI Crude Oil) 71.99 डॉलर प्रति बॅरलवर पोहचले. तर ब्रेंट क्रूड ऑईलचा (Brent Crude Oil) भाव 76.19 डॉलर प्रति बॅरल झाले.

राज्यातील प्रमुख शहरातील भाव (Source:goodreturns)

हे सुद्धा वाचा
  1. मुंबईमध्ये पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेलचा दर 94.27 रुपये प्रति लिटर आहे
  2. अहमदनगर पेट्रोल 106.36 तर डिझेल 92.88 रुपये प्रति लिटर
  3. अकोल्यात पेट्रोल 106.45 रुपये आणि डिझेल 92.99 रुपये प्रति लिटर
  4. अमरावतीत पेट्रोल 106.90 तर डिझेल 93.42 रुपये प्रति लिटर
  5. औरंगाबाद 106.75 पेट्रोल आणि डिझेल 93.24 रुपये प्रति लिटर
  6. जळगावमध्ये पेट्रोल 106.34 आणि डिझेल 92.86 रुपये प्रति लिटर
  7. कोल्हापूरमध्ये पेट्रोल 106.47 आणि डिझेल 93.01 रुपये प्रति लिटर
  8. लातूरमध्ये पेट्रोल 107.83 तर डिझेल 94.30 रुपये प्रति लिटर
  9. नागपूरमध्ये पेट्रोल 106.04 तर डिझेल 92.59 रुपये प्रति लिटर
  10. नांदेडमध्ये पेट्रोल 108.03 तर डिझेल 94.52 रुपये प्रति लिटर
  11. नाशिकमध्ये पेट्रोल 106.86 रुपये आणि डिझेल 93.36 रुपये प्रति लिटर
  12. परभणी पेट्रोल 109.33 तर डिझेल 95.73 रुपये प्रति लिटर
  13. पुण्यात पेट्रोलचा भाव 106.21 आणि डिझेल 92.72 रुपये प्रति लिटर
  14. रायगड पेट्रोलचा भाव 106.81 आणि डिझेल 93.27 रुपये प्रति लिटर
  15. सोलापूरमध्ये पेट्रोलचा दर 106.32 रुपये तर डिझेल 92.85 रुपये प्रति लिटर
  16. ठाणे पेट्रोलचा दर 106.45 रुपये तर डिझेल 94.41 रुपये प्रति लिटर

भाव एका SMS वर

  1. भारतीय तेल विपणन कंपन्या दररोज सकाळी 6 वाजता इंधनाचे नवीन दर जाहीर करण्यात येतात.
  2. देशात राज्याचा कर, स्थानिक स्वराज्य संस्थांचा कर, पंपधारकांचे कमिशन यामुळे किंमतीत फरक दिसतो.
  3. त्याआधारे देशातील विविध शहरातील इंधनाच्या दरात तफावत दिसते.
  4. पेट्रोल-डिझेलचे रोजचे दर तुम्ही एसएमएसद्वारे जाणून घेऊ शकता.
  5. इंडियन ऑईलच्या ग्राहकांनी RSP असे लिहून 9224992249 या क्रमांक आजचे नवीन दर कळतील.
  6. इंधनाचे दर जाणून घेण्यासाठी ग्राहकांना पंपावर जायची गरज नाही.
  7. बीपीसीएलच्या ग्राहकांनाही घरबसल्या त्याच्या मोबाईलवर भाव कळू शकतात.
  8. त्याने मोबाईल मॅसेजमध्ये RSP लिहून हा मॅसेज 9223112222 या क्रमांकावर पाठवावा.
  9. त्यानंतर कंपनी त्याला एसएमएसद्वारे (SMS) आजचे अपडेट दर कळवेल.
  10. एचपीसीएल ग्राहकांना HPPrice असे लिहून 9222201122 या क्रमांकावर एसएमएस करावा लागेल.

वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.