Today Gold Silver Price : स्वस्तात सोने खरेदीची सुवर्णसंधी, 14 ते 24 कॅरेटचे आजचे भाव एका क्लिकवर

Today Gold Silver Price : सोन्याच्या किंमतींना सध्या ब्रेक लागला आहे. 2 फेब्रुवारी सोन्याने विक्रम केल्यानंतर गेल्या 20 दिवसांत सोन्याचे आवसान गळाले आहे. सोन्यात तेजी येईल, पण सध्या स्वस्तात सोने खरेदीची संधी आहे.

Today Gold Silver Price : स्वस्तात सोने खरेदीची सुवर्णसंधी, 14 ते 24 कॅरेटचे आजचे भाव एका क्लिकवर
आजचा भाव काय
Follow us
| Updated on: Feb 23, 2023 | 9:18 AM

नवी दिल्ली : सोने-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. सोने-चांदीत सोमवारनंतर पुन्हा तेजी दिसून आली. आठवड्याच्या चौथ्या दिवशी गुरुवारी, सोने 112 रुपये प्रति 10 ग्रॅमने महागले. तर चांदीच्या किंमतीत 216 रुपये प्रति किलोची वाढ दिसून आली. यानंतर सोन्याचा भाव वधारला. सोने (Gold Price Update) 56500 रुपये प्रति 10 ग्रॅम तर चांदी 66000 रुपये प्रति किलोच्या (Silver Rate) जवळपास आहे. गुडरिटर्न्सनुसार, 22 कॅरेट सोने 52,150 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोने 56,880 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. सोने आणि चांदीच्या किंमतीत चढउतार होत आहे. सोन्याच्या किंमतींना सध्या ब्रेक लागला आहे. 2 फेब्रुवारी सोन्याने विक्रम केल्यानंतर गेल्या 20 दिवसांत सोन्याचे आवसान गळाले आहे. सोन्यात तेजी येईल, पण सध्या स्वस्तात सोने खरेदीची संधी आहे.

बुधवारी चांदीच्या किंमतीत तेजी दिसून आली होती. बुधवारी चांदी 216 रुपयांनी वधारली होती, हा भाव 65986 रुपये प्रति किलो होता. तर मंगळवारी चांदीत 10 रुपयांची वृद्धी झाली होती. चांदी 65770 रुपये प्रति किलोवर बंद झाली होती.

24 कॅरेट सोने 112 रुपयांनी महागले, त्याचा भाव 56496 रुपये, 23 कॅरेटचे सोने 112 रुपयांनी वधारले, त्याचा भाव 56270 रुपये, 22 कॅरेटचे सोने 102 रुपयांनी महाग झाले. त्याचा 51750 रुपये, 18 कॅरेट सोने 84 रुपयांनी महाग होऊन 42372 रुपये झाले आणि 14 कॅरेटचे सोने 65 रुपयांनी महाग होऊन 33050 रुपये प्रति 10 ग्रॅमवर व्यापार करत आहे.

हे सुद्धा वाचा

सोन्यात गेल्या 20 दिवसांपासून सोन्याने उसळी मारली नाही. सोने सध्या त्याचा सर्वकालीन उच्चांकी किंमतीपेक्षा 2386 रुपये प्रति 10 ग्रॅम स्वस्त विक्री होत आहे. 2 फेब्रुवारी 2023 रोजी सोन्याचा भाव 58882 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. तर चांदी तिच्या उच्चांकी किंमतीपेक्षा 13994 रुपये प्रति किलोने स्वस्त मिळत आहे. चांदीचा उच्चांकी भाव 79980 रुपये प्रति किलो होता.

गुडरिटर्न्सनुसार, मुंबईत 22 कॅरेट सोन्याच्या भाव 52,000 रुपये, तर 24 कॅरेट सोन्याचा दर 56,730 रुपये आहे. पुण्यात 22 कॅरेट सोन्याच्या भाव 52,000 रुपये, तर 24 कॅरेट सोन्याचा दर 56,730 रुपये आहे. नागपूरमध्ये 22 कॅरेट सोन्याच्या भाव 52,000 रुपये, तर 24 कॅरेट सोन्याचा दर 56,730 रुपये आहे. नाशिकमध्ये 22 कॅरेट सोन्याच्या भाव 52,030 रुपये, तर 24 कॅरेट सोन्याचा दर 56,760 रुपये आहे.

भारतीय मानके संस्थेद्वारे शुद्ध सोन्यासाठी हॉलमार्क देण्यात येतो. 24 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916 तर 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 अंकीत असते. अनेक ठिकाणी ग्राहक 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याची आग्रहाने मागणी करतात.

काही लोक 18 कॅरेट सोन्याचा वापर करतात. जेवढा कॅरेट सोने असेल, तेवढे सोने शुद्ध ठरते. 24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध असते. 22 कॅरेट सोने जवळपास 91 टक्के शुद्ध होते. 22 कॅरेट सोन्यात 9% इतर धातू असतात. दागिने तयार करण्यासाठी याचा वापर होतो. त्यात तांबे, चांदी, झिंक यांचा वापर करुन दागिने तयार करण्यात येतात. 24 कॅरेट सोने दमदार असते. पण त्याचा दागिने तयार करण्यासाठी वापर होत नाही.

पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.