चहा पावडर ते बिस्कीट, तेल, शाम्पूपर्यंत सर्व वस्तू महाग होणार? काय आहे कारण ?
हाय प्रोडक्शन कॉस्ट आणि फूड इनफ्लेशनच्या कारणाने FMCG कंपन्यांच्या मार्जिनमध्ये जुलै- सप्टेंबरच्या तिमाहीत घसरण झालेली आहे. त्याचा परिणाम शहरातील विक्रीवर झालेला आहे. त्यामुळे कंपन्या आता आपल्या पदार्थांच्या किंमती वाढविण्याचा विचार करीत आहेत.
सर्वसामान्याला महागाईचा तडाखा बसणार आहे. रोजच्या वापरातील गृहोपयोगी वस्तू आणि खाद्यपदार्थांच्या उदाहरणार्थ चहा, बिस्कीट्स, तेल,शाम्पू अशा सर्वच वस्तू महागण्याची शक्यता आहे. जुलै- सप्टेंबर तिमाहीत हाय प्रोडक्शन कॉस्ट आणि फूड इनफ्लेशनच्या कारणाने FMCG ( Fast moving consumer goods ) कंपन्यांचे मार्जिन कमी झालेले आहे. ज्याचा परिणाम शहरी क्षेत्रातील विक्रीवर दिसत आहे. त्यामुळे या कंपन्या आता आपले प्रोडक्ट महागात विकू शकतात. काही कंपन्यांनी खाद्यपदार्थांच्या किंमती वाढविण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.
हिंदूस्थान युनिलिव्हर लिमिटेडपासून ते गोदरेज कंझ्युमर प्रोडक्ट्स लिमिडेट, मॅरिको, आयटीसी आणि टाटा कंझ्युमर प्रोडक्ट्स लिमिटेडला चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत शहरात घटलेल्या पदार्थांच्या विक्रीने चिंता सतावत आहे. सप्टेंबर तिमाहीत शहरी क्षेत्रात विक्री अंदाजापेक्षा कमी झाली आहे. तज्ज्ञांच्या मते FMCG सेक्टर ची एकूण विक्रीत शहरातील विक्रीचा हिस्सा 65-68 टक्के असतो.सप्टेंबर तिमाही दरम्यान शहराच्या तुलनेत ग्रामीण भागात चांगली विक्री झालेली आहे.
दुसऱ्ंया तिमाहीत झालेला हा तोटा एक शॉर्ट टर्म झटका आहे. त्यामुळे खर्च स्थिर करुन मार्जिनला वसुल केले जाईल असे GCPL चे व्यवस्थापकीय संचालक आणि CEO सुधीर सीतापती यांनी म्हटले आहे.या काळात खाद्यपदार्थांचे वाढलेले दर आणि शहरी भागात मागणीत झालेली घट हे देखील या घसरणीची कारणे मानली जात आहेत.
शहरी क्षेत्रात खरेदीवर परिणाम
शहरी क्षेत्रात ग्राहकांच्या खरेदीवर मोठा परिणाम झाला आहे. खाद्यपदार्थांचे वाढलेले दरामुळे ग्राहकांच्या खरेदी क्षमतेवर प्रभाव झालेला असे टाटा कंझ्युमर प्रोडक्ट्स लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ सुनील डिसुझा यांनी म्हटलेले आहे. या तिमाहीत मार्केट व्हॉल्युम ग्रोथ सुस्त राहीली आहे. अलिकडच्या तिमाहीत शहरातील ग्रोथ प्रभावित झालेली आहे. तर ग्रामीण क्षेत्रात मात्र हळूवार का होईल परंतू वाढ होत आहे.