Inflation : भाव ठेवला कायम, पण कंपन्यांनी लढवली शक्कल, तुम्हाला जाणवली का महागाईची झळ!

Inflation : गेल्या वर्षी देशात महागाई 10 महिन्यांपर्यंत 6 टक्क्यांहून अधिक होती. यादरम्यान अनेक वस्तूंच्या किंमतीत मोठी वाढ झाली. काही कंपन्यांना यावर उपाय शोधला, त्यांनी आयडियाची कल्पना लढवली. त्यामुळे महागाईचा फटका जाणवत नाही. मात्र महागाई तर वाढलेली आहे.

Inflation : भाव ठेवला कायम, पण कंपन्यांनी लढवली शक्कल, तुम्हाला जाणवली का महागाईची झळ!
Follow us
| Updated on: Feb 10, 2023 | 8:27 PM

नवी दिल्ली : बिस्किट, फरसाण, कॉफी, चहापत्ती, सीलबंद दूध, गोळ्या, चॉकलेटची पॅकेट्स यांचे भाव (Food Items Price) बुलेट ट्रेनच्या वेगाने वाढत आहेत. तुम्ही म्हणाल काही काय सांगता राव, भावात काहीच फरक दिसत नाही. पूर्वी ज्या किंमतीला वस्तू खरेदी करत होतो, त्याच किंमतीला वस्तू मिळत आहे. पण या पॅकेटमधील माल कमी झाला, बिस्किटाची साईज कमी झाली, हे तुम्ही निरीक्षणाने ओळखले की नाही? कंपन्यांनी ही अनोखी शक्कल लढविली आहे. त्यामुळे ग्राहक नाराज होत नाही. त्याच्या खिशाला झळ बसल्याचे जाणवत ही नाही आणि तो त्या कंपनीचे उत्पादन नेहमी घेतो. एफएमसीजी क्षेत्रातील (FMCG Sector) सर्वच कंपन्यांनी ही ट्रिक अंमलात आणली आहे. त्याचा फटका कधी बसतो हे ग्राहकांना कळतही नाही. तो आजही दुकानात, मॉलमध्ये जाऊन वस्तू खरेदी करतो. जिभेचे चोचले पुरवायचे तर त्याला खिशाला झळ सोसावीच लागते. महागाई अशी मागच्या दाराने आली आहे.

कंपन्यांनी बिस्किट पुड्यातील बिस्किटांची साईज, प्रमाण आणि संख्या कमी केली. बिस्किटात 20 टक्क्यांची कपात केली. खाण्यातील वस्तूंसह हात धुण्याचे हँड वॉश पाऊचही महागले आहे. त्यातील लिक्विडची मात्रा कमी करण्यात आली आहे. तर लहान मुलांचे 500 ग्रॅम दूध पाऊडरचे पाकिट पूर्वी 350 रुपयांना मिळत होते. आता 400 ग्रॅम दूध पाऊडर 415 रुपयांना मिळत आहे. या किरकोळ वाटणाऱ्या वस्तूंच्या किंमतीत मोठा फरक पडला आहे.

दुकानदारांच्या मते, सर्वात मोठा फटका बिस्किट, फरसाण आणि तत्सम पदार्थांना बसला आहे. 5 महिन्यांपूर्वी जो बिस्किट पुडा पाच रुपयांना मिळत होता. तो त्याच किंमतीला मिळत आहे. पण त्याची संख्या आणि आकार कमी झाला आहे. त्याचे प्रमाण अत्यंत कमी झाले आहे. चिप्स, फरसान आणि इतर पुड्यांनाही महागाईची झळ बसली आहे. त्यातील पदार्थांची मात्रा, प्रमाण कमी झाले आहे.

हे सुद्धा वाचा

गेल्या दोन-तीन महिन्यात किरकोळ महागाई कमी झाल्याचा दावा करण्यात येत असला तरी, कंपन्यांची ही खेळी ग्राहकांच्या लक्षात असल्याचा दावा दुकानदार करत आहेत. पूर्वी 750 एमएल हँडवॉश 99 रुपयांना मिळत होते. आता किंमत तीच आहे. पण प्रमाण 625 एमएल इतके कमी झाले आहे. ग्राहकांच्या खिशावर असा दरोडा टाकण्यात येत आहे.

बिस्किटाची किंमत 5 रुपये कायम आहे. पण बिस्किट पुड्याचे प्रमाण कमी झाले आहे. 80 ग्रॅमचा पुडा 52 ग्रॅम इतका झाला आहे. चहापत्तीचा 250 ग्रॅमचा पुडा 50 रुपयांना मिळायचा, आता 200 ग्रॅम पुडा 60 रुपयांना मिळतो. चॉकलेटचे 13.2 ग्रॅमचे पॅकेट पूर्वी 5 रुपयांना मिळायचे ते आता दहा रुपयांना मिळते.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.