बॉलिवूडमधील दिग्गजांनी अशी केली कमाई; या कंपन्यांतील गुंतवणूक आली कामी

Bollywood Stars | बॉलिवूड स्टार्स केवळ चित्रपटातून पैसा कमवत नाहीत. तर कंपन्या, ज्वाईंट व्हेंचर, कंपन्यांचे शेअर यामधील गुंतवणुकीतून ते मालामाल होत आहे. काही बॉलिवूड स्टार्सने गेल्या काही वर्षात कंपन्यांच्या आयपीओमध्ये पैसा लावून अशी जोरदार कमाई केली आहे.

बॉलिवूडमधील दिग्गजांनी अशी केली कमाई; या कंपन्यांतील गुंतवणूक आली कामी
Follow us
| Updated on: Mar 10, 2024 | 2:58 PM

नवी दिल्ली | 10 March 2024 : बॉलिवूडच्या स्टार्सना गेले वर्षच नाही तर नवीन वर्ष पण पावलं आहे. कारण त्यांची चित्रपटातूनच नाही तर इतर ठिकाणाहून अधिक कमाई होत आहे. अभिनेता, अभिनेत्रींसाठी काही कंपन्या नोट छापण्याची मशीन ठरल्या आहेत. अभिनयासोबतच हे दिग्गज काही कंपन्यांतील गुंतवणूकीतून कमाई करत आहे. या कंपन्या त्यांच्यासाठी दुभत्या गाई ठरल्या आहेत. काही वर्षांतच त्यांना कोट्यवधींचा परतावा मिळाला आहे. बॉलिवूड दिग्गजांनी आयपीओमध्ये गुंतवणूक केली होती. आता हे आयपीओ मल्टिबॅगर शेअर ठरले आहेत.

आमिर खान, रणबीर कपूरने अशी केली कमाई

बॉलिवूड सूपरस्टार्स आमिर खान आणि रणबीर कपूर यांनी ड्रोन आचार्य एरियल इनोव्हेशनच्या आयपीओतून कमाई केली. आमिर खानने प्री-आयपीओमध्ये 25 लाख रुपयांची गुंतवणूक केली होती. तर रणबीर कपूरने 20 लाखांची गुंतवणूक केली होती. बाजारात लिस्टिंग झाल्यानंतर या शेअरने 45.52 टक्क्यांचा परतावा दिला. आमिर खान आणि रणबीर कपूरला तीन पट परतावा मिळाला आहे. आमिर खानच्या गुंतवणुकीचे मूल्य 72.62 लाख तर रणबीरच्या गुंतवणूकीचे मूल्य 57.97 लाख रुपये झाले आहे.

हे सुद्धा वाचा

नायकामधून आलिया भट्ट, कॅटरिनाची कमाई

आलिया भट हिने नायका कंपनीत 4.95 कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. कंपनी सूचीबद्ध झाल्यानंतर आता गुंतवणूकीचे मूल्य 11 पटीने वाढून 54 कोटी रुपये झाले आहे. तर कॅटरिना कॅफने 2.04 कोटी गुंतवले होते. आता गुंतवणुकीचे मूल्य 22 कोटी रुपये झाले आहे. पण मध्यंतरी नायकाच्या शेअरमध्ये मोठी पझझड झाली. त्याचा मोठा फटका या दोन्ही अभिनेत्रींना बसला आहे. त्यांना नुकसान सहन करावे लागत आहे.

अजय देवगणची गुंतवणूक

बॉलिवूडचा सिंघम अजय देवगण याने गे्ल्या एका वर्षात 860 टक्क्यांहून अधिक रिटर्न देणाऱ्या कंपनीत गुंतवणूक केली आहे. .या कंपनीत त्याने 2.74 कोटींची गुंतवणूक केली आहे. अजय देवगण याने पॅनोरमा स्टुडियोज इंटरनॅशनल या कंपनीत ही गुंतवणूक केली. 274 रुपये प्रति शेअरप्रमाणे त्याने खरेदी केली आहे. सिंघमला या गुंतवणुकीतून 363.13 टक्क्यांचा परतावा मिळाला आहे. पॅनोरमा स्टुडियोज इंटरनॅशनल, सिनेमा निर्मिती आणि वितरणाचे काम करते. ही कंपनी कुमार मंगत पाठक यांनी स्थापन केली आहे. ते अजय देवगण यांचे चांगेल मित्र आहेत. कंपनीच्या संकेतस्थळावर दिलेल्या माहितीनुसार, अजय देवगण आणि पाठक गेल्या 25 वर्षांपासून एकत्र काम करत आहेत.

सचिन तेंडूलकर मालामाल

मास्टर ब्लॉस्टरने आझाद इंजिनिअरिंगमध्ये गुंतवणूक केली आहे. प्री-आयपीओमध्ये त्याने या कंपनीचे 114.10 रुपयाप्रमाणे 438,120 शेअर खरेदी केले. कंपनीचा शेअर, बाजारात सूचीबद्ध झाल्यानंतर तो 720 प्रति शेअरवर पोहचला. आता सचिन तेंडूलकर यांच्या गुंतवणुकीचे मूल्य जवळपास 12 पट वाढले आहे. आता गुंतवणुकीची किंमत 59.39 कोटी रुपये झाली आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.