गुंतवणूकदारांचा भांगडा! Tata च्या एका शेअरवर 800 रुपयांहून अधिकचा परतावा

Tata Technologies | टाटा हा गुंतवणूकदारांच्या भरवशावर नेहमीच खरा उतरला आहे. यावेळी पण टाटाने गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा दिला आहे. टाटा समूहातील या मोठ्या कंपनाची शेअर अखेर बाजारात सूचीबद्ध झाला. शेअर बाजारात येताच या शेअरने धमाकेदार एंट्री घेतली. एका शेअरवर गुंतवणूकदारांना 800 रुपयांहून अधिकची कमाई करता आली.

गुंतवणूकदारांचा भांगडा! Tata च्या एका शेअरवर 800 रुपयांहून अधिकचा परतावा
Follow us
| Updated on: Nov 30, 2023 | 11:08 AM

नवी दिल्ली | 30 नोव्हेंबर 2023 : टाटा टेक्नॉलॉजीजच्या IPO ने बाजारात धुमाकूळ घातला. आयपीओ उघडताच त्यावर गुंतवणूकदारांच्या उड्या पडल्या. आता टाटा टेक्नॉलॉजीजच्या शेअरने त्यांना लॉटरी लावली. या शेअर्सचे अलॉटमेंट झाले आहे. गुंतवणूकदारांच्या खात्यावर ते जमा झाले आहेत. हा शेअर NSE आणि BSE वर सूचीबद्ध झाला. ज्या लोकांना आयपीओ खरेदी करता आला नाही. त्यांना आता बाजारात हा शेअर खरेदी-विक्री करता येईल. सूचीबद्ध होताच टाटा टेकनॉलॉजीने बाजारात धमाकेदार एंट्री केली. बाजार उघडल्यानंतर एका तासातच त्याने गुंतवणूकदारांना दुप्पट नफा मिळवून दिला.

500 रुपयांचा शेअर 1200 रुपयांवर लिस्ट

BSE वर टाटा समूहाचा हा शेअर 140% प्रीमियमसह 1199.95 रुपयांवर सूचीबद्ध झाला. तर NSE वर कंपनीचा शेअर बीएसई इतक्याच प्रीमियमसह 1,200 रुपयांवर लिस्ट झाला. लिस्टिंगच्या काही वेळातच हा शेअर, बाजारात जवळपास 180% उसळला. टाटा टेक्नॉलॉजीजचा शेअर 1398 रुपयांवर पोहचला. टाटा टेक्नॉलॉजीजचा प्राईस बँड 475-500 रुपये होता. त्या हिशोबाने गुंतवणूकदारांना जोरदार नफा झाला. 19 वर्षांनी आलेल्या टाटा समूहातील या शेअरने बाजारात येताच धुमाकूळ घातला. यापूर्वी 2004 मध्ये टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेजच्या (TCS) शेअरने मार्केट गाजवले होते.

हे सुद्धा वाचा

ऑफर-फॉर सेल

टाटा टेक्नॉलॉजीजचा हा आयपीओ पूर्णपणे ऑफर-फॉर सेल (OFS) होता. याअंतर्गत कंपनीचे शेअरहोल्डर्स आणि सध्याचे प्रमोटर्स 4.63 कोटी शेअर्सची विक्री झाली. माहितीनुसार, टाटा मोटर्सचा टाटा टेक्नॉलॉजीजमध्ये 74 टक्के वाटा आहे. तर अल्फा टीसी होल्डिंग्सची 7.2 टक्के आणि टाटा कॅपिटल ग्रोथ फंडचा 3.63 टक्के वाटा आहे. या आयपीओच्या माध्यमातून टाटा मोटर्स 8.11 कोटी, अल्फा टीसी होल्डिंग्स 97.2 लाख आणि टाटा कॅपिटल ग्रोथ फंड 48.6 लाख शेअर्सची विक्री करणार होती.

गुंतवणूकदारांचा जबरदस्त प्रतिसाद

टाटा टेक्नॉलॉजीजच्या आयपीओला गुंतवणूकदारांनी जबरदस्त प्रतिसाद दिला. IPO तिसऱ्या दिवशी 69.4 पट सब्सक्राईब झाला. या रेकॉर्डमुळे 3.6 लाख एप्लीकेशन मिळाले. IPO 22 नोव्हेंबर रोजी उघडला. 24 नोव्हेंबर रोजी हा आयपीओ बंद झाला. कंपनीने या आयपीओच्या माध्यमातून 3042 कोटी रुपये जमा केले. तर आता गुंतवणूकदारांना पण जोरदार कमाई करता आली आहे.

Non Stop LIVE Update
बाप.. बाप होता है, विजयानंतर काय म्हणाले धर्मरावबाबा आत्राम
बाप.. बाप होता है, विजयानंतर काय म्हणाले धर्मरावबाबा आत्राम.
साकोलीत नाना पटोले यांचा कसाबसा निसटता विजय, पाहा काय घडले?
साकोलीत नाना पटोले यांचा कसाबसा निसटता विजय, पाहा काय घडले?.
वसईतून भाजपाच्या स्नेहा दुबे विजयी, काय म्हणाल्या...पाहा
वसईतून भाजपाच्या स्नेहा दुबे विजयी, काय म्हणाल्या...पाहा.
'या' दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?
'या' दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?.
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण...
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण....
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी.
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'.
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री.
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्...
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्....
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर...
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर....