सर्वात शक्तिशाली महिलांची नावं जाहीर, Nirmala Sitharaman यांच्यासह या भारतीय महिलांचा समावेश, कोण-कोण Forbes च्या यादीत

Forbes 2024 Worlds Most Powerful Women : जगाभरातील 100 सर्वात शक्तिशाली, प्रभावशाली महिलांच्या यादीत देशातील तीन महिलांनी त्यांचे स्थान अबाधित ठेवले आहे. यामध्ये भारताच्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्यासह दोन उद्योजिकांचा समावेश आहे.

सर्वात शक्तिशाली महिलांची नावं जाहीर, Nirmala Sitharaman यांच्यासह या भारतीय महिलांचा समावेश, कोण-कोण Forbes च्या यादीत
जगातील प्रभावशाली महिला
Follow us
| Updated on: Dec 13, 2024 | 2:24 PM

फोर्ब्सने जगभरातील 100 सर्वात शक्तिशाली, प्रभावशाली महिलांची यादी जाहीर केली आहे. या यादीत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्यासह दोन भारतीय उद्योजिकांनी स्थान पटकवलं आहे. गेल्यावर्षीच्या यादीत सुद्धा या महिलांनी स्थान पटाकवले होते. या वेळी सुद्धा त्यांनी या यादीत नाव कायम ठेवले. व्यवसाय, मनोरंजन, राजकीय आणि इतर विविध क्षेत्रातील महिलांची नावं या यादीत आहेत. या क्षेत्रात स्वत:ची वेगळी छाप निर्माण करणाऱ्या महिलांना या यादीत मानाचे स्थान देण्यात येते.

टॉप-100 प्रभावाशाली महिलांमध्ये भारतीय

अर्थमंत्री निर्मला सीतारमण

हे सुद्धा वाचा

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांना या यादीत स्थान पटकावलं आहे. जगातील प्रभावशाली महिलांमध्ये त्या 28 व्या क्रमांकावर आहेत. मे 2019 मध्ये त्या भारताच्या पूर्णकालीन अर्थमंत्री झाल्या. जून 2024 मधील लोकसभा निवडणुकीनंतर एनडीए सरकारने त्यांना पुन्हा अर्थमंत्री पदाची जबाबदारी सोपवली. त्या 4 ट्रिलियन अर्थव्यवस्था असलेल्या भारताची जबाबदारी सांभाळतात. जगातील ही पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. लवकरच भारतीय अर्थव्यवस्था जपान आणि जर्मनीला मागे टाकून तिसर्‍या क्रमांकावर पोहचण्याचा दावा करण्यात येतो. गेल्यावेळी या यादीत त्या 32 व्या क्रमांकावर होत्या. त्यांनी आता चार क्रमांक पुढे झेप घेतली आहे.

रोशनी नाडर मल्होत्रा

फोर्ब्सच्या शक्तिशाली महिलांच्या यादीत रोशनी नाडर-मल्होत्रा या 81 व्या स्थानावर आहेत. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्यासोबत त्या या यादीत आहेत. रोशनी नादर मल्होत्रा या HCL च्या संस्थापक आणि उद्योगपती शिव नाडर यांची मुलगी आहे. एचसीएल टेक्नोलॉजीजचे सीईओ म्हणून त्या काम पाहत आहेत. त्यांनी जुलै 2020 मध्ये वडीलानंतर या पदाची जबाबदारी स्वीकारली. त्यांनी पत्रकारिता आणि एमबीएचे शिक्षण घेतले आहे.

किरण मुजुमदार-शॉ

जगातील प्रभावशाली महिलांच्या यादीत किरण मुजुमदार-शॉ यांनी स्थान पटकवलं आहे. तर भारतातील त्या 91 व्या सर्वात श्रीमंत उद्योगपती आहेत. फोर्ब्सच्या यादीत त्या 82 व्या क्रमांकावर आहेत. बायोटेक्नॉलॉजी क्षेत्रात त्यांनी बाजी मारली आहे. 1978 मध्ये त्यांनी बायोफार्मास्युटिकल फर्म बायोकॉन या कंपनीची स्थापना केली होती. बायोकॉन ही बहुराष्ट्रीय कंपनी ठरली आहे. मलेशियात ही कंपनी इनशुलीनचे उत्पादन करते. किरण मुजुमदार यांनी कॅन्सरवर संशोधनासाठी ग्लासगो विद्यापीठाला 7.5 दशलक्ष डॉलरची मदत केली होती. तर कोरोना काळात औषध निर्मितीसाठी त्यांच्या कंपनीने मोठी मदत केली.

रविवारी भाजप, शिवसेनेसह राष्ट्रवादीचे कोणते नेते घेणार मंत्रिपदाची शपथ
रविवारी भाजप, शिवसेनेसह राष्ट्रवादीचे कोणते नेते घेणार मंत्रिपदाची शपथ.
आता मुंबईऐवजी 'या' ठिकाणी येत्या १५ तारखेला होणार मंत्रिमंडळ विस्तार
आता मुंबईऐवजी 'या' ठिकाणी येत्या १५ तारखेला होणार मंत्रिमंडळ विस्तार.
'राष्ट्रवादीवर बोलणारे मिटकरी कोण? त्यांना अकोल्यात..', कोणाचाी टीका?
'राष्ट्रवादीवर बोलणारे मिटकरी कोण? त्यांना अकोल्यात..', कोणाचाी टीका?.
विधानसभेतील पराभवानंतर मोठा निर्णय, नाना पटोले यांचं दिल्लीत पत्र अन्.
विधानसभेतील पराभवानंतर मोठा निर्णय, नाना पटोले यांचं दिल्लीत पत्र अन्..
राष्ट्रवादी पुन्हा एक होणार? रोहित पवारांच्या आईनं काय केलं वक्तव्य?
राष्ट्रवादी पुन्हा एक होणार? रोहित पवारांच्या आईनं काय केलं वक्तव्य?.
साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनला ‘पुष्पा 2’प्रकरणी अटक, नेमकं काय घडलं?
साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनला ‘पुष्पा 2’प्रकरणी अटक, नेमकं काय घडलं?.
फडणवीसांचं वक्फ बोर्ड विधेयकासंदर्भात मोठं वक्तव्य, जिथे बोट ठेवतील...
फडणवीसांचं वक्फ बोर्ड विधेयकासंदर्भात मोठं वक्तव्य, जिथे बोट ठेवतील....
बेस्ट चालकांची सरप्राईज टेस्ट;महाव्यवस्थापकांचे कंत्राटदारांना निर्देश
बेस्ट चालकांची सरप्राईज टेस्ट;महाव्यवस्थापकांचे कंत्राटदारांना निर्देश.
महापालिका निवडणुका या महिन्यानंतरच, 22 जानेवारीच्या सुनावणीवर भवितव्य
महापालिका निवडणुका या महिन्यानंतरच, 22 जानेवारीच्या सुनावणीवर भवितव्य.
फडणवीस दिल्लीतून यादी घेऊन आले? नव्या सरकारमध्ये कोण-कोण होणार मंत्री?
फडणवीस दिल्लीतून यादी घेऊन आले? नव्या सरकारमध्ये कोण-कोण होणार मंत्री?.