20 वर्षी झालेल्या एका अपघाताने स्वप्न भंग झाले, मग उभी केली 3.50 लाख करोडची बॅंक
कोटक महिंद्र बॅंक भारतीय कॉर्पोरेट इतिहासातील ही पहिली कंपनी होती जिला बॅंकींगसाठी हिरवा कंदील मिळाला होता. बॅंकेचे संस्थापक उदय कोटक पायउतार झाले आहेत. पाहा त्यांचा प्रवास
नवी दिल्ली | 3 सप्टेंबर 2023 : कोटक महिंद्र बॅंकचे ( Kotak Mahindra Bank ) संस्थापक उदय कोटक यांनी ( Uday Kotak ) एक सप्टेंबर 2023 रोजी व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ पदाचा राजीनामा दिली आहे. कोटक महिंद्र बॅंकेच्या उभारणीत 38 वर्षे त्यांनी मेहनत केली. त्यांनी पदभार सोडला असला तरी ते नॉन-एक्झुकेटिव्ह डायरेक्टर म्हणून बॅंकेशी जोडलेली राहतील. त्यांना या पदावर पाच वर्षे मुदतवाढ दिली आहे. उदय कोटक यांनी कोटक महिंद्र बॅंकेची पताका भारतीय बॅंकींग सेक्टर फडकवित ठेवली. गेल्या 38 वर्षांत अनेक अडचणींवर मात करीत त्यांनी बॅंकेला यशाच्या शिखरावर नेले आहे.
देशातील सर्वात यशस्वी बॅंकर्स असलेल्या उदय कोटक यांनी कोटक महिंद्र बॅंकेचे रोपटे लावताना आधी 1985 मध्ये एका नॉन बॅंकींग फायनान्स कंपनीच्या रुपात तिची सुरुवात केली होती. नंतर तिला बॅंकेचा दर्जा मिळाला. ते 20 वर्षांचे असताना त्यांना किक्रेटटर व्हायचे होते. किक्रेट खेळताना एका मॅच दरम्यान त्यांच्या डोक्याल चेंडू लागल्याने ते गंभीर जखमी झाले. ते बेशुद्ध पडल्याने त्यांना रुग्णालयात नेण्यात येऊन त्यांच्यावर सर्जरी करावी लागली. त्यानंतर एक वर्षे त्यांना आराम करावा लागला. किक्रेटला कायमचा रामराम करावा लागला. त्यानंतर त्यांनी दुसऱ्या पिचवर बॅटींग सुरु केली. त्यात फोर आणि सिक्सर मारले.
30 लाख रुपयांचे भांडवल
22 मार्च 2003 मध्ये कोटक महिंद्र फायनान्स लि.ला भारतीय रिझर्व्ह बॅंकेकडून बॅंकींग लायसन्स मिळाले होते. भारतीय कॉर्पोरेट इतिहासातील ही पहिली कंपनी होती जिला बॅंकींगसाठी हिरवा कंदील मिळाला. आजच्या घडीला कोटक महिंद्र बॅंकचे मार्केट कॅप सुमारे 3.52 लाख कोटी आहे. ही कंपनी उदय कोटक यांनी 30 लाख रुपयांच्या गुंतवणूकीने सुरु केली होती. बिल डीस्काऊंटच्या कामाने तिची सुरुवात झाली, नंतर या फर्मने लोन पोर्टफोलियो, स्टॉक ब्रोकरिंग, इन्वेस्टमेंट बॅंकींक, इश्योरंन्स आणि म्युच्युअल फंड्समध्ये तिचा विस्तार केला. अखेर 2003 ला ती नॉन फायनान्स कंपनीचे कोटक महिंद्र बॅंकेचे स्वरुप धारण केले.
गणित आवडीचा विषय
15 मार्च 1959 मध्ये एका गुजराती व्यापारी कुटुंबात उदय कोटक यांचा जन्म झाला. त्यांचे कुटुंब कॉटन ट्रेडींगमध्ये होते. त्यांनी वेगळा रस्ता निवडला. सुरुवातीला घरच्यांनी विरोध केला. त्यांचे इरादे मजबूत होते. त्यांनी 26 व्या वर्षी या संस्थेची पायाभरणी केली. ते लहानपणी क्रिकेट खेळण्यासोबत अभ्यासात हुशार होते. गणित त्यांचा आवडीचा विषय असल्याने ते कंपनीचा डोलारा सांभाळू शकले. सिडनहॅम कॉलेजातून ते ग्रॅज्युएट झाले. त्यानंतर त्यांनी जमनालाल बजाज इन्सिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमधून एमबीए झाले. पोस्ट ग्रॅज्युएटनंतर त्यांनी कोटक मॅनेजमेंट फायनान्स लि. बिल डीस्काऊंट सेवा सुरु केली. त्यांच्या यशा मागे त्यांची पत्नी पल्लवी यांची भूमिका महत्वाची राहीली.