अमेरिकेतील जन्माला आलीत अंबानी कुटुंबातील ही चार मुले, ज्यांना मिळणार मोठे फायदे
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या विवाहाचा खर्च पाहून अनेकांचे डोळे दीपले आहेत. आतापर्यंत या पृथ्वी तलावरील हा सर्वात महागडा विवाह सोहळा ठरला आहे.
मुकेश अंबानी आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. त्यांच्या धाकट्या मुलगा अनंत आणि राधिका मर्चंट यांचा विवाहाच्या खर्चाने जगाचे डोळे दीपले आहेत. या विवाहाच्या आधी प्री-वेडींग सोहळ्यासाठी 1700 कोटी रुपये खर्च केला आहे. या प्री-वेडींग आणि मुख्य विवाहाच्या सोहळ्यातील श्रीमंतीच्या प्रदर्शनाने अवघा देश स्तिमित झाला आहे. मुकेश आणि नीता अंबानी यांच्या जुळी मुलांना अमेरिकेत जन्म दिलेला आहे. ईशा अंबानी ( Isha Ambani ) आणि आकाश अंबानी ( Akash Ambani ) या जुळ्या मुलांना अमेरिकेत जन्म दिल्याने त्यांना लाभ मिळाले आहेत. यात एक खास बाब म्हणजे नीता अंबानी आणि त्यांची कन्या ईशा अंबानी या दोघींना IVF तंत्राने गर्भधारणा होऊन त्यांनी जुळ्या मुलांनी जन्म दिलेला आहे. एक मुलगा आणि एक मुलगी आणि आई आणि मुली दोघींचा जन्म अमेरिकेतील आहे.
अंबानी कुटुंबातील मुलांना हा लाभ
अंबानी कुटुंबातील या मुलांचा जन्मच अमेरिकेत झाला असल्याने त्यांना नंतर व्हीसाची गरजच लागणार नाही. आकाश आणि ईशा या दोघांनाही अमेरिकेचे नागरिकत्व मिळालेले आहे. तर इशा अंबानी हीच्या मुलांनाही अमेरिकेचे नागरिकत्व मिळालेले आहे. अमेरिकेत जन्म झाल्यानंतर काय असतो फायदा पाहूयात….अमेरिकेत जेव्हा एखाद्याचा जन्म होतो तेव्हा मुलांना व्हीसा शिवाय अमेरिकेत जाता येते आणि राहाता देखील येते. आकाश आणि इशा यांना अमेरिकेचे नागरिकत्व मिळालेले आहे. व्हीसा मिळाल्याने त्यांना केव्हाही कामा निमित्ताने अमेरिकेत जाता येणार आहे. त्यांना केव्हाच बी1, बी2 किंवा अन्य व्हीसाची केव्हाच गरज लागणार नाही.
अमेरिकन युनिव्हर्सिटी
जर अंबानी यांच्या मुलांनी अमेरिकन युनिव्हर्सिटीत प्रवेशासाठी अर्ज केला तर त्याला विविध स्कॉलरशिपसाठी अर्ज करण्याचा संधी मिळेल. केवळ अमेरिकन नागरिकांनाच हा अधिकार आहे. अमेरिकन पासपोर्ट मिळाल्याने मुलांना कोणत्याही पर्यटक व्हीसा शिवाय अनेक देशांची सफर करता येणार आहे. कारण अमेरिकन पासपोर्ट ज्यांच्याकडे असेल त्यांना 116 देशांमध्ये व्हीसा मुक्त प्रवेश आहे. तर जगातील 47 देश अमेरिकन नागरिकांच्या आगमनासाठी व्हीसाच्या पायघड्या अंथरतात.