चार रुपयांच्या शेअरचा चौकार; 1 लाखांचा रिटर्न छप्परफाड, गुंतवणूकदार मालामाल

Penny Share Multibagger Return : या स्मॉलकॅप कंपनीने गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. गेल्या पाच वर्षांत हा शेअर 700% हून अधिकने वधारला आहे. 4 रुपये ते 32.50 रुपयांपर्यंत उसळी घेत या स्टॉकने गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. या स्टॉकची एलआयसीमध्ये पण वाटा आहे.

चार रुपयांच्या शेअरचा चौकार; 1 लाखांचा रिटर्न छप्परफाड, गुंतवणूकदार मालामाल
पेनी स्टॉक
Follow us
| Updated on: Nov 15, 2024 | 4:34 PM

तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. भारतीय शेअर बाजारात सध्या चढउताराचे सत्र आहे. त्यात काही दिग्गज शेअरला फटका बसला आहे, तर बाजारात असे काही स्टॉक आहेत जे गुंतवणूकदारांना नफा देण्यात अग्रेसर आहेत. त्यात या स्मॉलकॅप कंपनीने गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. गेल्या पाच वर्षांत हा शेअर 700% हून अधिकने वधारला आहे. 4 रुपये ते 32.50 रुपयांपर्यंत उसळी घेत या स्टॉकने गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. या स्टॉकची एलआयसीमध्ये पण वाटा आहे.

एटीव्ही प्रोजेक्टसची कमाल

एटीव्ही प्रोजेक्ट्स इंडिया लिमिटेड (ATV Projects India) कंपनीचा शेअर असाच मल्टिबॅगर ठरला आहे. या स्मॉलकॅप स्टॉकने गुंतवणूकदारांना गेल्या काही वर्षात मोठा परतावा दिला आहे. काही वर्षांपूर्वी हा शेअर 4 रुपयांना होता. गेल्या पाच वर्षात हा शेअर मजल दरमजल करत 32.50 रुपयांवर पोहचला आहे. या शेअरने दीर्घकालीन गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना 700% टक्क्यांहून अधिकचा परतावा दिला आहे.

हे सुद्धा वाचा

5 वर्षांत असा वाढला भाव

एटीव्ही प्रोजेक्ट्सचा शेअर गेल्या एका महिन्यात 10% आपटला आहे. पण गेल्या सहा महिन्यातील रेकॉर्ड जोरदार आहे. 6 महिन्यापूर्वी हा शेअर 23.90 रुपयांवर होता. तो आता 32.50 रुपयांवर आला. म्हणजे सहा महिन्यात तो 35% उसळला आहे. या वर्षाच्या सुरुवातीला हा शेअर 15.25 रुपयांवर होता. आता तो 32.50 रुपयांवर आला आहे. या शेअरने या काळात 110% रिटर्न दिला आहे.

गुंतवणूकदारांचा फायदा

गेल्या एका वर्षात हा स्टॉक 14.60 रुपयांहून 32.50 रुपयांपर्यंत आला आहे. गुंतवणूकदारांना 125% परतावा दिला. तर 5 वर्षांपूर्वी या स्टॉकमध्ये एखाद्याने 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती तर ती रक्कम आता 8 लाख रुपयांच्या घरात असती.

एखाद्या गुंतवणूकदाराने एका महिन्यापूर्वी या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते तर त्याला फटका बसला असता. त्याची रक्कम कमी होऊन 90,000 रुपयांवर आली असती. तर 6 महिन्यांपूर्वी त्याने गुंतवणूक केली असती तर या एक लाख रुपयांचे आता 1.35 लाख रुपये झाले असते. जर एखाद्याने 2023 च्या अखेरीस 1 लाख रुपये गुंतवले असते तर ही रक्कम आज 2.10 लाख रुपये झाली असती. या कंपनीत देशातील विमा क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी एलआयसीने गुंतवणूक केलेली आहे. एलआयसीकडे 9,95,241 शेअर आहेत. एलआयसीचा हा वाटा 1.87% इतका आहे.

सूचना : हा शेअरचा केवळ लेखाजोखा आहे. या शेअरची कामगिरी आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही प्रमाणित गुंतवणूक सल्लागाराकडून सल्ला आवश्य घ्या. तुमचा कोणत्या ही प्रकारचा फायदा अथवा नुकसानीला TV9 मराठी जबाबदार नसेल. पेनी शेअरमध्ये गुंतवणूक करताना जागरुक राहा. कंपनीचे फंडामेंटल तपासा. भूलथापांना अजिबात बळी पडू नका.

बोट अपघात 13 मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून किती लाखांची मदत
बोट अपघात 13 मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून किती लाखांची मदत.
'महिलांना 2100 रू. कधी देणार? लाडक्या बहिणी वाट बघताय, आता...'
'महिलांना 2100 रू. कधी देणार? लाडक्या बहिणी वाट बघताय, आता...'.
एलिफंटाला जाणारी बोट उलटली, समुद्रात काय झालं? अपघात नेमका कसा झाला?
एलिफंटाला जाणारी बोट उलटली, समुद्रात काय झालं? अपघात नेमका कसा झाला?.
आंबेडकरांबाबतच्या वक्तव्यावरून शाहांची कोंडी, अडकले वादाच्या भोवऱ्यात
आंबेडकरांबाबतच्या वक्तव्यावरून शाहांची कोंडी, अडकले वादाच्या भोवऱ्यात.
'फडणवीस तुम्हाला सरपंचाच्या...',देशमुखांच्या हत्येचे पडसाद विधानसभेत
'फडणवीस तुम्हाला सरपंचाच्या...',देशमुखांच्या हत्येचे पडसाद विधानसभेत.
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.