Home Loan EMI : होम लोनचा डोक्याला ताप, हा उपाय केला का

Home Loan EMI : घराचं स्वप्न साकारताना अनेकदा वाढलेले व्याजदर तुमचे बजेट बिघडवते. ईएमआयची परतफेड करताना प्रचंड ताण येतो. पण हे काही उपाय केल्यास तुम्हाला गृहकर्जाचे टेन्शन येणार नाही. अथवा ते कमी होईल.

Home Loan EMI : होम लोनचा डोक्याला ताप, हा उपाय केला का
Follow us
| Updated on: Feb 16, 2023 | 9:03 PM

नवी दिल्ली : आरबीआयनने सलग सहाव्यांदा रेपो दरात (Repo Rate) वाढ केली. गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात रेपो दर 4 टक्के होता. आता या महिन्यातील निर्णयानंतर रेपो दर 6.50 टक्क्यांवर पोहचला आहे. अर्थात आरबीआयच्या या धोरणांचा सामान्य ग्राहकांना आणि कर्जदारांना मोठा फटका बसला आहे. त्यांच्या खिशावर मोठा ताण आला आहे. गृहकर्जाचा (Home Loan) हप्ता फेडण्यास थोडाही उशीर झाला तर त्याचा परिणाम सिबिल स्कोअरवर दिसून येतो. बँकेला तर आयते सावज मिळते. पिनल इंटरेस्टच्या रुपाने बँका दंड वसुली करतात. हा दंड ईएमआयच्या (EMI) एक अथवा दोन टक्के असतो. त्यामुळे टेन्शन येण्यापूर्वीच काही उपाय केले अथवा काही निश्चित नियोजन केल्यास गृहकर्जाचा ताप होणार नाही.

जर तुम्ही अतिरिक्त कमाई करत असाल, तर ही रक्कम तुम्हाला कर्जाच्या प्रीपेमेंट रुपात वापरता येईल. त्यामुळे तुमचा कर्जाचा कालावधी कमी होईल. गृहकर्ज हे मोठे कर्ज असते. जर तुमच्याकडे प्रीमेंटची, आगाऊ रक्कमेची व्यवस्था असेल तर तुमचा कर्जाचा कालावधी कमी होईल आणि पर्यायाने तुमचा फायदा होईल. त्यामुळे ईएमआयही कमी होईल. ही रक्कम कमी असल्याचा तुम्हाला फायदा होईल.

तुम्ही तुमच्या आर्थिक गरजा ओळखून आणि उत्पन्नाआधारे कर्जासंबंधीचा योग्य निर्णय घेऊ शकता. तुम्ही प्रीपेमेंट करता तेव्ही ही रक्कम तुमच्या मूळ रक्कमेतून कमी होते. त्यामुळे तुमचा मासिक हप्ता कमी होतो. कर्जाच्या सुरुवातीच्या काळात प्रीपेमेंटमुळे ईएमआय घटतो. व्याज वाचते.

हे सुद्धा वाचा

जर तुम्ही कर्जाची झंझट लवकर मिटवू पाहात असाल तर तुम्हाला ईएमआयची रक्कम वाढविण्यावर भर द्यावा लागेल. पगारात वाढ झाली अथवा तगडे बोनस मिळाल्यासा त्याचा वापर ईएमआयची रक्कम वाढविल्यास घेता येईल. पण गोष्ट लक्षात ठेवा, तुमचा आर्थिक पाया भक्कम असेल तरच हा उपाय करा. नाहीतर ओढताण होईल. ईएमआय वाढविल्याने तुमची मूळ रक्कम आणि त्यावरील व्याज कमी होईल. कर्जाचा कालावधी ही घटेल. कर्जाची परतफेड लवकर होईल.

गृह कर्जाचा हप्ता वाढल्याने घरातील खर्चांवर त्याचा परिणाम दिसून येतो. त्यामुळे तुमचे बजेट कोलमडू शकते. यामुळे तुमच्या बचतीवर मोठा परिणाम होईल. बचत करता येणार नाही. अतिरिक्त कमाईचे साधन असले तर मात्र तुम्हाला कर्जाची परतफेड आणि बचत दोन्ही साधता येतील.

तुम्ही कर्जाचा कालावधी वाढून घेतल्यास आर्थिक ताण कमी होईल. पण कर्जावर जास्त व्याज द्यावे लागेल. तसेच कर्जाचा कालावधीही वाढेल. समजा तुम्ही 8.75 टक्के व्याजदराने 25 लाख रुपयांचे 15 वर्षांसाठी गृहकर्ज घेतले आहे. त्यामुळे तुम्हाला दरमहा 24,986 रुपये ईएमआय जमा करावा लागेल. 19,97,518 इतके व्याज चुकते करावे लागेल. पण जर तुम्ही 25 वर्षांसाठी कर्ज घेणार असाल तर मासिक हप्ता 20,554 रुपये होईल. पण त्यावर 36,66,076 रुपयांचे व्याज मोजावे लागेल.

मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.