Insurance : मोफत मिळते लाखोंची विमा सुरक्षा! मग तुम्हाला मिळाला का फायदा ?

Insurance : तुम्हालाही लाखोंची मोफत विमा सुरक्षा मिळते, तुम्हाला माहिती आहे का?

Insurance : मोफत मिळते लाखोंची विमा सुरक्षा! मग तुम्हाला मिळाला का फायदा ?
मोफत मिळवा विमाImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Nov 17, 2022 | 7:11 PM

नवी दिल्ली : भविष्यातील जोखीमेसाठी आणि आपल्या पश्चात कुटुंबियांच्या आर्थिक सुरक्षेसाठी आपण जीवन विमा (Life Insurance) खरेदी करतो. तसेच आता आरोग्य (Health), ट्रॅव्हल विमा घेण्याकडेही लोकांचा कल वाढला आहे. पण त्यासाठी तु्म्हाला दरमहा, तिमाही, सहामाही, वार्षिक प्रीमिअम द्यावा लागतो. पण तुम्हाला मोफत विमा (Free Insurance Coverage) मिळतो, याची माहिती आहे का?

केंद्रीय भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (EPFO) सदस्यांना केंद्र सरकार हे विमा संरक्षण देते. नोकरदार वर्गाचे पीएफ खाते असते. त्यांना मोफत विमा मिळतो. इंप्लॉइज डिपॉजिट लिंक्ड इंश्योरेंस स्कीम 1976 (EDLI) अंतर्गत हा विमा मिळतो.

अगदी अल्प शुल्कात हा विमा EDLI अंतर्गत देण्यात येतो. या योजनेतंर्गत सदस्याच्या वारसाला 2.5 लाख ते 7 लाख रुपयापर्यंतचे विमा संरक्षण मिळते. या योजनेतंर्गत जास्तीत जास्त 7 लाख रुपयांचे विमा संरक्षण मिळते.

हे सुद्धा वाचा

एका वर्षातच एक किंवा दोन कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या आणि ज्यांचे पीएफ खाते आहे, अशा कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना या योजनेचा फायदा मिळतो. वारसदाराला योजनेतंर्गत विम्यासाठी दावा दाखल करता येतो.

सरकारी आणि खासगी क्षेत्रातील सर्वच बँक त्यांच्या डेबिट कार्डवर विमा संरक्षण देतात. यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे विमा संरक्षण मिळते. यामध्ये वैयक्तिक अपघात संरक्षण, खरेदी सुरक्षा, कायमचे अपंगत्व यावर विमा संरक्षण देण्यात येते. यावर 10 लाखांपर्यंतचे विमा सुरक्षा देण्यात येते.

क्रेडिट कार्ड धारकालाही या विम्याचा लाभ मिळतो. त्यांना अपघात विमा, प्रवास विमा, क्रेडिट विमा आणि खरेदी विम्यावर संरक्षण मिळते. विविध बँकेच्या क्रेडिट कार्डवर बँकेच्या धोरणानुसार इन्शुरन्स कव्हरेजची रक्कम बदलते.

अनेकदा म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना ही गोष्ट माहितीच नसते की, त्यांच्या गुंतवणुकीवरही विमा संरक्षण मिळते. अनेक फंड हाऊस ही सुविधा पुरवितात. एसआईपी सह विमा उत्पादन (SIP plus Insurance products) असे या योजनेचे नाव आहे.

ICICI Prudential Mutual Fund चा SIP Plus, Aditya Birla Sun Life Mutual Fund चा Century Fund तर इतरही अनेक फंड हाऊस अशा प्रकारचे विमा संरक्षण देते. यामध्ये कमाल 50 लाख रुपयांपर्यंतचे विमा संरक्षण मिळते.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.