Petrol Diesel Price Today : एक लिटर पेट्रोल-डिझेलसाठी परभणीसह नांदेडकरांच्या खिशाला जादा झळ बसणार आहे. तुमच्या शहरातील एक लिटर इंधनाची किंमती किती आहे, माहिती आहे का?
Ad
आजचा भाव तरी काय
Follow us on
नवी दिल्ली : पाकिस्तानमधील सरकारने (Pakistan Government) जनतेला मोठा दिलासा. पुढील 15 दिवस तिथल्या जनतेला पेट्रोल 12 रुपयांनी तर डिझेल 30 रुपये लिटरने स्वस्त मिळणार आहे. भारतात एक वर्षांहून अधिक काळापासून इंधनात कोणतीही कपात करण्यात आलेली नाही. भारत रशियाकडून स्वस्तात कच्चा तेल खरेदी करत आहे. इराणने पण स्वस्त इंधनाचा पुरवठा केला आहे. पण पेट्रोल-डिझेलच्या किरकोळ (Petrol Diesel Price) किंमती तसू भर ही बदल झाला नाही. एक लिटर पेट्रोल-डिझेलसाठी परभणीसह नांदेडकरांच्या खिशाला जादा झळ बसणार आहे. तुमच्या शहरातील एक लिटर इंधनाची किंमती किती आहे, माहिती आहे का?
कच्चा तेलाची किंमत
आज 18 मे रोजी, डब्ल्यूटीआई क्रूड ऑईल (WTI Crude Oil) 72.61 डॉलर प्रति बॅरलवर पोहचले. तर ब्रेंट क्रूड ऑईलचा (Brent Crude Oil) भाव 76.74 डॉलर प्रति बॅरल झाले.