Work from home: घरून काम करून पैसे कमवायचे आहेत? मग ‘हे’ आहेत सोपे पर्याय

काही महिलांना काम करण्याची इच्छा खूप असते, मात्र त्यांना ऑफीसला जाऊन काम करणे शक्य नसते. अशावेळी त्या घरी राहूनच काही कामं करू शकतात, ज्याद्वारे अर्थार्जनही होऊ शकते.

Work from home: घरून काम करून पैसे कमवायचे आहेत? मग 'हे' आहेत सोपे पर्याय
घरून पैसे कमविण्याचे पर्याय Image Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Sep 01, 2022 | 1:08 PM

रोजच्या धावपळीच्या जीवनापासून (busy , hectic lifestyle) थोडं दूर होऊन घरी बसून काम करणं कोणाला आवडणार नाही ? काही महिला अशा असतात, ज्यांना काम करण्याची (woman wants to work) इच्छा खूप असते, मात्र त्यांना ऑफीसला जाऊन काम करणे शक्य नसते. घरच्या अडचणींमुळे त्यांना ऑफीसला तर जाता येत नाही, पण त्यांना कामाची खूप आवड असते. अशावेळी त्या घरी राहूनच (work from home) अशी काही कामे अथवा जॉब करू शकतात, ज्यामुळे त्यांचे शिक्षण आणि वेळही सत्कारणी लागू शकेल आणि थोड्याफार प्रमाणात अर्थार्जनही (earn money) होऊ शकेल. घरी राहून काम करण्याचा फायदा म्हणजे आपली वेळ सांभाळून काम करता येते, तसेच ऑफीसला जाण्या-येण्याचा वेळ आणि दगदग वाचते, ज्यामुळे जास्त उत्साहाने आणि लक्ष देऊन, एकाग्रतेने काम करता येते.

मुलांची शिकवणी घेणे –

कोरोना काळापासून लोकं ऑफलाइन शाळांपेक्षा ऑनलाइन शिक्षण घेणे पसंत करत आहेत. त्यामुळे वेळ तर वाचतोच, पण कुठेही बाहेर जावे लागत नसल्याने संसर्गापासून बचावही होते. या काळात अनेक शाळा ऑनलाइन सुरू होत्या. ज्या महिलांना घरी राहून काम करण्याची इच्छा आहे, त्या ऑनलाइन क्लासेस किंवा शिकवणी घेऊ शकतात. किंवा मुलांना घरी बोलावूनही त्यांना शिकवू शकतात. त्यामध्ये कमाईही चांगली होते.

हे सुद्धा वाचा

कुकिंग करीअर –

बऱ्याच तरूणी अथवा महिलांना स्वयंपाक करणे, वेगवेगळे पदार्थ तयार करणे, रेसिपीज ट्राय करणे आवडते. तुम्हाला घरी राहून काम करायचे असेल तर तुम्ही खाद्यपदार्थ तयार करण्याचा एक छोटा उद्योग सुरू करू शकता. घरी राहून वेगवेगळे पदार्थ बनवून त्यांच्या ऑर्डर्स घेऊ शकता, केटरिंगही करू शकता. टिफीन सर्व्हिस किंवा ऑनलाइन माध्यमातूनही तुम्ही तुमचे पदार्थ विकून पैसे कमवू शकता.

फिटनेस सेंटर –

महिला किंवा तरुणी घरातल्या घरात फिटनेस सेंटरही उघडू शकतात. मात्र त्यासाठी तुम्हाला व्यायामाचे, फिटनेसचे ज्ञान असणे आवश्यक आहे. तुम्ही त्या संदर्भातील एखादा कोर्स केला असेल तर या क्षेत्रात तुम्ही काम करू शकता. घरच्या घरी महिलांकडून व्यायाम करून घेऊ शकता अथवा ऑनलाइन क्लासही घेऊ शकता. या क्षेत्रातही चांगली कमाई होऊ शकते.

डान्स क्लास –

अनेक महिलांना नृत्याची आवड असते. तुम्हालाही अशी आवड असल्यास तुम्ही मुलांसाठी किंवा मोठ्या व्यक्तींसाठीही डान्स क्लास घेऊ शकता. तुम्ही त्याचे शास्त्रोक्त शिक्षण घेतले असेल तर आणखीनच उत्तम गोष्ट. घरी किंवा ऑनलाइन क्लासच्या माध्यमातून तुम्ही मुलांना किंवा नृत्य शिकण्याची आवड असणाऱ्या लोकांना डान्स शिकवू शकता. तुमच्या कामाच्या वेळाही तुमच्या सोयीनुसार, ठरवता येऊ शकतील.

योगासनांचा क्लास –

आजकाल बरेच लोक आपल्या तब्येतीबाबत जागृत झाले आहेत. सगळयांना हार्डकोअर व्यायाम करणे शक्य नाही, त्यामुळे बरेच जण योगासने शिकण्यास प्राधान्य देतात. तुम्हीही योगासनांचा क्लास घेऊ शकता. घरच्या घरी योगा सेंटर उघडू शकता. मात्र त्यासाठी तुमच्याकडे त्याचे शिक्षण व सर्टिफिकेट असणे गरजेचे आहे.

कॉम्प्युटर क्लास –

आजकालच्या टेक्नॉलॉजीच्या जमान्यात सर्वांना कॉम्प्युटरचे ज्ञान असणे आवश्यक आहे. छोट्या-मोठ्या कामांसाठी त्याचा खूप उपयोग होतो. तुम्हाला शिकवण्याची आवड असेल तर तुम्ही लहान मुलांसाठी किंवा मोठ्यांसाठीही कॉम्प्युटरचे क्लास घरी घेऊ शकता. तुम्ही त्या संदर्भातील एखादा सर्टीफिकेट कोर्स केला असेल तर अजूनच उत्तम ठरते. कमी गुंतवणूकीत हा क्लास सुरू करता येतो. त्यामध्ये कमाईही चांगली होते.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.