Sensex 100000 ची घेणार भरारी, कधी येणार आनंदवार्ता, तज्ज्ञांचा अंदाज काय

Sensex : या आठवड्याच्या तिसऱ्या व्यापारी दिवशी बुधवारी मुंबई स्टॉक एक्सचेंजचा 30 शेअर्सचा सेन्सेक्स 200 अंकांनी उसळला. त्यापूर्वी सेन्सेक्सने 75000 अंकांची विक्रमी गुढी उभारली आहे. आता त्यापुढे भारतीय शेअर बाजार अजून झेंडे गाडणार आहे. काय आहे तज्ज्ञांचा अंदाज?

Sensex 100000 ची घेणार भरारी, कधी येणार आनंदवार्ता, तज्ज्ञांचा अंदाज काय
शेअर बाजारातील काही कंपन्यांनी त्यांचे तिमाही निकाल जाहीर केले. त्यात डिव्हिडंडची घोषणा करुन गुंतवणूकदारांना मोठा दिलासा दिला आहे.
Follow us
| Updated on: Apr 10, 2024 | 4:24 PM

शेअर बाजारात गेल्या काही व्यापारी सत्रात मोठा उलटफेर दिसून आला. मंगळवारी सेन्सेक्सने विक्रमाची गुढी उभारली. BSE Sensex सह NSE Nifty ने रॉकेट भरारी घेतली. दोन्ही निर्देशांकानी सर्वकालीन उच्चांक गाठला. पण बाजार बंद होताना तो लाल रंगात न्हाहला. बुधवारी 10 एप्रिल रोजी सेन्सेक्सने 200 अंकांची उसळी घेतली. आता जागतिक तज्ज्ञांनुसार, भारतीय शेअर बाजार लवकरच नवीन किर्तीमान नावावर नोंदवणार आहे. 25,000 अंकांची घौडदौड करत सेन्सेक्स 1 लाख अंकाचा टप्पा गाठण्याची शक्यता आहे. बाजारातील विश्लेषक आणि मोबियस इमर्जिंग अपॉर्च्युनिटीज फंडचे चेअरमन Mark Mobius ने हा अंदाज वर्तवला आहे.

5 वर्षांत सेन्सेक्स रचणार इतिहास

भारतीय शेअर बाजार एक इतिहास रचत आहे. बीएसईने 400 लाख कोटी रुपयांचे मार्केट कॅप ओलांडले आहे. सेन्सेक्स 75,000 अंकांच्या ऐतिहासिक स्तरावर जाऊन आले आहे. त्यामुळे आता सेन्सेक्स लवकरच नवीन विक्रमाला गवसणी घालण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. बाजारातील तज्ज्ञानुसार, शेअर बाजार लवकरच एक लाखांचा स्तर गाठू शकतो. एका वृत्तानुसार, मार्क मोबियस यांनी भारतीय शेअर बाजार येत्या 5 वर्षांत 1,00,000 अंकांवर पोहचेल असा अंदाज वर्तवला आहे.

हे सुद्धा वाचा

बाजार उघडताच 1497 शेअर तेजीत

बाजार उघडताच जवळपास 1497 शेअर तेजीत दिसून आले. तर 542 शेअरला या स्पर्धेत तग धरता आला नाही. त्यामध्ये घसरण दिसून आली. तर 115 शेअरमध्ये कोणताही बदल दिसला नाही. बाजारात उघडताच टाटा स्टील, हिंडाल्को, भारती एअरटेल, रिलायन्स इंडस्ट्रीज, कोल इंडिया आणि बीपीएीएल हे शेअर तेजीत दिसून आले. तर डिव्हिस लॅब, एचडीएफसी बँक, अदानी पोर्ट्स, सन फार्मा, अपोलो हॉस्पिटलच्या स्टॉकला घरघर लागली होती.

सूचना : हा शेअरचा केवळ लेखाजोखा आहे. या शेअरची कामगिरी आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही प्रमाणित गुंतवणूक सल्लागाराकडून सल्ला आवश्य घ्या. तुमचा कोणत्या ही प्रकारचा फायदा अथवा नुकसानीला TV9 मराठी जबाबदार नसेल. पेनी शेअरमध्ये गुंतवणूक करताना जागरुक राहा. कंपनीचे फंडामेंटल तपासा. भूलथापांना अजिबात बळी पडू नका.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.