Petrol Diesel Rate : पाच राज्यातील निवडणूक निकालानंतर पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ होऊ शकते असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. अखेर हा अंदाज खरा ठरला आहे. गेल्या पाच दिवसांत चौथ्यांदा इंधनाच्या किमती (Fuel Price) वाढवण्यात आल्या आहेत. आज पुन्हा एकदा पेट्रोल (Petrol)आणि डिझेलच्या दरामध्ये वाढ करण्यात आली आहे, पेट्रोल आणि डिझेलचे दर प्रति लिटर 80 पैशांनी वाढले आहेत. गेल्या पाच दिवसांमध्ये इंधन प्रति लिटर मागे तब्बल 3.20 रुपयांनी महाग झाले आहे. भारतीय पेट्रोलियम वितरण कंपनी इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOCL) नुसार आज राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोचा दर प्रति लिटर 98.61 तर डिझेल 89.87 रुपयांवर पोहोचले आहे. मुंबईमध्ये पेट्रोचा दर प्रति लिटर 113.35 तर डिझेलचा दर 96.70 रुपये इतका आहे. जवळपास सर्वच महानगरामध्ये पेट्रोलच्या किमतीने शंभरी पार केली आहे. या इंधन दरवाढीचा मोठा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसताना दिसून येत आहे.
आज पेट्रोल आणि डिझेलमध्ये प्रति लिटरमागे प्रत्येकी 80 पैशांची वाढ झाली आहे. नव्या दरानुसार राजधानी मुंबईमध्ये पेट्रोलचे दर प्रति लिटर 113.35 तर डिझेल 96.70 रुपयांवर पोहोचले आहे. तर औरंगाबादमध्ये पेट्रोल 114.17 आणि डिझेल 98.35 रुपये प्रति लिटर आहे. कोल्हापूरमध्ये पेट्रोल 112.68 तर डिझेल 95.46 रुपये लिटर आहे. पुण्यात पेट्रोल आणि डिझेलचे दर प्रति लिटर अनुक्रमे 112.37 आणि 95.13 रुपये इतके आहेत. तर उपराजधानी नागपूरमध्ये पेट्रोल 112.22 रुपये लिटर आणि डिझेल 95.02 रुपये लिटर इतके आहे.
गेल्या पाच दिवसांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये चार वेळा वाढ झाली आहे. 22 मार्चनंतर केवळ 24 मार्च रोजी पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर होते. गेल्या पाच दिवसांमध्ये इंधनाचे दर तब्बल 3.20 रुपयांनी महाग झाले आहेत. नव्या दरानुसार मध्यप्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगाना, कर्नाटक, ओडिशा, जम्मू-कश्मीर आणि लडाखमध्ये पेट्रोलचे दर हे 100 रुपयांपेक्षा अधिक आहेत.
अनिल अंबानींचा रिलायन्स पॉवरच्या संचालकपदाचा राजीनामा
Inflation: महागाईचा आणखी एक मोठा झटका; एप्रिलपासून आठशेपेक्षा अधिक औषधांच्या दरात वाढ
भविष्यात पेट्रोल, डिझेल आणखी महागणार ; पेट्रोलियम कंपन्यांना तीन महिन्यात 19 हजार कोटी रुपयांचा तोटा