GAIL Share Price | गुंतवणूकदारांसाठी गुड न्यूज, शेअरचा भाव तर वधरलाच, आता करा बोनस शेअर्सची तयारी

GAIL Share Price | या सरकारी कंपनीचा शेअर 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीवरून 13 टक्क्यांनी वधारला आणि आता बोनस शेअर्स देण्याच्या तयारीत कंपनी आहे.

GAIL Share Price | गुंतवणूकदारांसाठी गुड न्यूज, शेअरचा भाव तर वधरलाच, आता करा बोनस शेअर्सची तयारी
GAIL चा बोनस शेअर?Image Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Jul 26, 2022 | 9:35 AM

GAIL Share Price | सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी (Public Sector Company) गेलच्या (Gail Company) गुंतवणूकदारांना एका निर्णयामुळे लॉटरी (Lottery) लागणार आहे. येत्या दोन दिवसांत याविषयीचा निर्णय होण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून गेलच्या शेअरने अचानक उसळी मारल्याने गुंतवणूकदारांची बल्ले बल्ले सुरु आहे. गेल कंपनीच्या शेअरने (Company Share) पडत्या काळातही चमकदार कामगिरी केली आहे. दमदार कामगिरीमुळे या शेअरवर मध्यंतरी गुंतवणूकदारांच्या उड्या पडल्या होत्या. आता कंपनीने गुंतवणूकदारांना (Investors) सरप्राईज गिफ्ट देण्याचा विचार केला आहे. गेलच्या संचालक मंडळाची (Board of Directors) बैठक बुधवार, 27 जुलै 2022 रोजी होणार आहे. यात कंपनीकडून बोनस शेअर्स (Bonus Share) जारी करण्याबाबत विचार केला जाणार आहे. त्यामुळे जर तुमच्याकडे कंपनीचे 1000 शेअर असतील तर त्याचे 2000 शेअर होण्याची शक्यता आहे. याआधी गेलने जुलै 2019 मध्ये 1:1 बोनस जारी केला होता. त्यावेळी ही गुंतवणूकदारांना फायदा झाला होता.

कंपनी काय म्हणाली ?

गेलच्या संचालक मंडळाने शेअर बाजाराला याविषयीची माहिती दिली. त्यानुसार, गेल इंडिया लिमिटेडचे संचालक मंडळ बुधवार, 27 जुलै 2022 रोजी बोनस शेअर्स जारी करण्याचा विचार करण्यासाठी बैठक घेणार आहे. या बैठकीत बोनस शेअर्स जारी करण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगितले. याआधी गेल कंपनीने जुलै 2019 मध्ये 1:1 बोनस गुंतवणूकदारांना दिला होता.

हे सुद्धा वाचा

गेलच्या शेअरची किंमत

शुक्रवारी गेलचे समभाग 141.70 अंकावर बंद झाले होते.हे आधीच्या 143.90 च्या बंदच्या तुलनेत 1.53% कमी होते. तर सोमवारी गेल इंडिया कंपनीचा शेअर 147.15 अंकावर व्यापार करत होता. मागील वर्षाच्या तुलनेत हा शेअर 0.49 टक्क्यांनी घसरला आहे, परंतु 2022 मध्ये तो 7.80 टक्के वाढला आहे. गेल्या सहा महिन्यांत शेअरमध्ये 0.60 टक्के, तर मागील महिन्यात 7.59 टक्क्यांनी वाढ झाली आहे.गेल्या पाच व्यापारी सत्रांमध्ये हा शेअर 0.21 टक्क्यांनी घसरला आहे. एनएसईवर हा शेअर 19-22 एप्रिल रोजी 173.50 या 52 आठवड्यांच्या उच्चांकी पातळीवर आणि 20 डिसेंबर 21 रोजी 125.20 अंकावर म्हणजे 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर पोहोचला होता. म्हणजेच सध्याच्या 147.15 च्या शेअरच्या किंमतीवर, तो 52 आठवड्यांच्या उच्चांकापेक्षा 20.32% कमी आणि 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीपेक्षा 13.17% जास्त व्यापार करीत आहे.

GAIL कंपनीने जुलै 2019 मध्ये 1:1 बोनस जारी केला होता, 6 टक्क्यांहून अधिक लाभांश उत्पन्नासह तो गुंतवणूकदारांना मिळाला होता. 31 मार्च 2022 रोजी संपलेल्या चौथ्या तिमाहीत गेलच्या निव्वळ नफ्यात 40.6 टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे.

ताज्या घडामोडीत, संदीप कुमार यांची GAIL India लिमिटेडचे ​​नेतृत्व करण्यासाठी निवड करण्यात आली आहे. गुप्ता यांची GAIL च्या अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालकपदासाठी निवड करण्यात आली आहे आणि ते मनोज जैन यांची जागा घेतील, जैन हे 31 ऑगस्ट रोजी निवृत्त होणार आहेत.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.