Ganeshostav Investment | गणेशोत्सवाला करा गुंतवणुकीचा संकल्प, बाप्पाच हरेल विघ्न

Ganeshostav Investment | या गणेश चतुर्थीला गुंतवणुकीचा संकल्प सोडणार असाल तर गणाधीशाच्या या गुणांच्या आधारे सजग रहा. गुंतवणुकीसंबंधी या 8 टिप्स लक्षात ठेवल्यास गुंतवणुकीतून फायदा होईल.

Ganeshostav Investment | गणेशोत्सवाला करा गुंतवणुकीचा संकल्प, बाप्पाच हरेल विघ्न
गणेशोत्सवाला गुंतवणुकीचा श्रीगणेशा Image Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Aug 31, 2022 | 5:24 PM

Ganeshostav Investment | कोणत्याही शुभकार्याची सुरुवात ही गणेश वंदनेने अथवा गणेशाला (Ganeshostav) स्मरण करुन करण्यात येते. आजतर गणनायकाचं आपल्या घराघरात विधिवत आगमन झालं आहे. गणेशाच्या आगमनाने घर कसं प्रसन्न झालं आहे. या प्रसन्न वातावरणात तुम्हीही नवीन गुंतवणुकीचा(Investment) श्रीगणेशा करु इच्छित असाल तरी हा सोनेरी योग म्हणायला हरकत नाही. गुंतवणूक करताना सजगता अत्यंत महत्वाची असते. डोळे झाकून केलेली गुंतवणूक फारशी फायद्याची ठरत नाही. विघ्नहर्त्याच्या साक्षीने गणपती उत्सव साजरा करताना प्रत्येकाने गणाधीशाचे गुण ही गुंतवणूक करताना आत्मसात केल्यास फायदा होईल. स्टॉक मार्केटमध्ये दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी अनेक संधी आहेत. त्यावर परतावा (Return) ही तगडा मिळतो. त्यामुळे तुम्ही अद्याप शेअर बाजारात (Share Market) गुंतवणूक केली नसल्यास सध्याचा काळ त्यासाठी चांगला म्हणता येईल. गणेश चतुर्थीच्या या मुहूर्तावर गुंतवणुकीसंबंधीच्या या खास टिप्स पाहुयात..

गुंतवणुकीचा संकल्प करा

आतापर्यंत गुंतवणूक केली नसल्यास गुंतवणुकीच्या क्षेत्रात पाऊल ठेवा. फुल न फुलाची पाकळी गुंतवणूक करा. आजची बचत ही भविष्यातील मोठी रक्कम असते. त्यामुळे गुंतवणुकीत एक पाऊल पुढे टाका. गुंतवणूक केल्यास तुम्हाला बचतीची आणि काटकसरीची सवय लागते. पैसाने पैसा वाढतो. कायदेशीर मार्गाने तुम्हाला तुमचा पैसा वाढवण्यासाठी तो कुठे तरी गुंतवावा लागेल.

हुशारीने करा गुंतवणूक

गुंतवणूक करताना सजग रहा. हुशारीने गुंतवणूक करा. गुंतवणूक करायची म्हणून कुठे आणि कशी ही गुंतवणूक करा. अनोळखी योजना, मोठ्या आमिषाच्या योजनांपासून चार हात दूर रहा. अल्पावधीत करोडपती करणाऱ्या अनेक योजना या फसव्या असतात. गणेशाला गजानन ही म्हणतात. त्यामुळे अभ्यास करुनच गुंतवणूक करा.

हे सुद्धा वाचा

दुसऱ्याचा सल्लाही ऐका

गणपतीचे कान सुपासारखे असतात. त्यामुळे त्याला लंबकर्णही म्हणतात. याचा भाविक असा ही अर्थ काढतात की, बाप्पा सर्वांचेच ऐकतो. त्यांचे सुख, दुख त्याला समजतात. त्यामुळे गुंतवणूक करताना दुसऱ्याचे सल्ले आणि झालेली फसवणूक याकडे अजिबात दुर्लक्ष करु नका. समोरच्याला ठेचा मागचा शहाणा हा नियमही लक्षात ठेवा.

ध्येय निश्चित करा

भगवान गणेशाचे डोळे चिमुकले असले तरी, ते फार तेजस्वी आहे. त्यामुळेच त्यांना चिंतेश्वर ही म्हणतात. याचा अर्थ असा की, तुम्हाला गुंतवणूक करताना नेहमी ध्येय समोर ठेवावे लागेल. कुठेही गुंतवणूक करुन चालणार नाही. सतत अपडेट रहावे लागेल. अभ्यास ठेवावा लागेल.

चुकीच्या गुंतवणुकीतून बाहेर पडा

जर तुम्ही चुकीची गुंतवणूक केली असेल तर त्यातून लागलीच बाहेर पडा. त्यासाठी सातत्य आणि अभ्यास हवा. त्यातून तुम्हाला चूक झाल्याचा अंदाज आला तर लागलीच बाहेर पडा. त्यामुळे भविष्यात होणारं मोठं नुकसान टाळता येईल.

लवचिक रहा

गुंतवणूक करताना लवचिक रहा. तुमच्या भावनांचा बाजारावर परिणाम होत नसतो. तर बाजारातील भावनांचा परिणाम होत असतो. त्यामुळे गुंतवणूक करताना लागलीच काढण्याची अतिघाई ही करु नका. पोर्टफोलियोत वैविध्य ठेवल्यास गुंतवणुकीपासून कमी नुकसान होईल.

स्वयंशिस्त अंगी भिनवा

बाजारात गुंतवणूक करताना स्वयंशिस्त अत्यंत गरजेची आहे. स्वयंशिस्त नसेल तर तुमच्या गुंतवणुकीवर त्याचा विपरीत परिणाम होईल. दर महिन्याला तुम्ही ठराविक गुंतवणूक करत असाल तर ती कायम ठेवा. त्यात वाढ करा. खंड पडू देऊ नका. नियमीत गुंतवणूक तुम्हाला काही वर्षात चांगला परतावा देईल.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.