Gautam Adani | गौतम अदानी जगातील तिसरे श्रींमत, आठवडाभरातच दिली Jeff Bezos यांना मात

Gautam Adani | गौतम अदानी हे श्रीमंतीच्या एकामागून एक पायऱ्या चढत आहेत. ते आता जगातील तिसरे श्रीमंत व्यक्ती बनले आहे. अदानी आणि जगातील चौथे श्रीमंत जेफ बेजोस यांच्यात केवळ 12.1 अरब डॉलरचा फरक आहे.

Gautam Adani | गौतम अदानी जगातील तिसरे श्रींमत, आठवडाभरातच दिली Jeff Bezos यांना मात
श्रीमंतीची हनुमान उडीImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Sep 07, 2022 | 1:23 PM

Gautam Adani | जगातील टॉप 10 अरबपतींमध्ये (Top 10 Billionaires) भारतातील उद्योजक गौतम अदानी (Gautam Adani) यांच्या नावाचा पुन्हा डंका वाजला. काही दिवसांपू्र्वी श्रीमंतांच्या यादीत घसरल्यानंतर अदानी यांनी मागे वळून पाहिलेच नाही. अदानी हे श्रीमंतीच्या एकामागून एक पायऱ्या चढत आहेत. ते आता जगातील तिसरे श्रीमंत व्यक्ती (World 3rd Richest) बनले आहे. अदानी आणि जगातील चौथे श्रीमंत जेफ बेजोस (Jeff Bezos) यांच्यात केवळ 12.1 अरब डॉलरचा फरक आहे.

अदानी यांच्या संपत्तीत वाढ

फोर्ब्सच्या रियल टाईम (Forbes Real Time) दशलक्ष निर्देशांकात (Billionaires Index) अदानी समुहाचे संचालक गौतम अदानी यांच्या संपत्तीत वाढ झाल्याची नोंद झाली. त्यांची एकूण संपत्ती 148.8 अरब डॉलर झाली आहे.

जेफ बेजोस यांची संपत्ती

संपत्तीतील लक्षणीय वाढीमुळे अदानी यांनी अॅमेझॉनचे जेफ बेजोस यांना धोबीपछाड दिली. फोर्ब्सच्या माहितीनुसारत, जेफ बेजोस यांची संपत्ती कमी होऊन ती 136.7 अरब डॉलर इतकी राहिली आहे.

हे सुद्धा वाचा

चर्चा ठरली खरी

अदानी यांच्या सपंत्तीचे आकडे दिवसागणिक वाढत असल्याने ते लवकरच बेजोस यांना मात देतील ही चर्चा होती. ती चर्चा अखेर खरी ठरली. बेजोस आता जगातील चौथे सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहे.

दोघांच्या संपत्तीतील अंतर किती?

बेजोस आणि अदानी यांच्या संपत्तीमधील अंतर 12.1 अरब डॉलर इतके आहे. आता अदानी यादीतील इतर दोघांच्या स्पर्धेत उतरले आहेत.  संपत्तीत वाढ होत राहिली तर लवकरच दुसऱ्या स्थानी दिसतील, असा अंदाज बांधण्यात येत आहे.

पहिल्या,दुसऱ्या स्थानी कोण?

श्रीमंतांच्या यादीत आता पहिल्या स्थानी टेस्लाचे सीईओ एलन मस्क (Elon Musk) तर दुसऱ्या स्थानी बर्नार्ड अर्नाल्ट (Bernard Arnault) यांचा समावेश आहे. त्यांच्यानंतर गौतम अदानी यांनी स्थान पटकावलं आहे.  गौतम अदानी यांच्या श्रीमंतीचा वेग सर्वांनाच थक्क करणारा आहे. एकीकडे त्यांच्या कंपन्यांवर कर्जाचा डोंगर वाढत असताना त्यांची ही घौडदौडही सुरुच आहे.

धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट.
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा.
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?.
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'.