गौतम अदानी यांची वर्षाची सुरुवात सुसाट, आणखी एका मोठ्या कंपनीला खरेदी केले

अब्जाधीश गौतम अदानी यांना साल 2024 खास आहे. त्यांची एकूण संपत्ती 94.5 अब्ज डॉलरवर गेली आहे आणि जगातील ते 14 वे सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. खास गोष्ट म्हणजे या वर्षी त्यांनी आतापर्यंत 10.02 अब्ज डॉलरची कमाई केली आहे. जी अन्य अब्जाधीशांपेक्षा जास्त आहे.

गौतम अदानी यांची वर्षाची सुरुवात सुसाट, आणखी एका मोठ्या कंपनीला खरेदी केले
Gautam Adani Image Credit source: TV9MARATHI
Follow us
| Updated on: Jan 08, 2024 | 1:57 PM

मुंबई | 8 जानेवारी 2024 : अब्जाधीश गौतम अदानी यांची साल 2024 ची सुरुवातच जोरदार झाली आहे. जगातील टॉप अब्जोपतींच्या यादीत गौतम अदानी यांचा क्रम वाढतच चालला आहे. अदानी यांनी त्यांचा व्यवसायाचा विस्तार सुरुच ठेवला आहे. आता त्यांनी एक मोठी बिझनेस डील केली आहे. साल 2024 ची ही त्यांची पहीलीच डील असून त्यांनी कोट्यवधी रुपयांचा मोठा व्यवहार केला आहे. अदानी ग्रुपची सिमेंट सेक्टर मधील दिग्गज कंपनी एसीसी लिमिटेडने आता एसीसीपीएल नावाच्या कंपनीचे अधिग्रहण पूर्ण केल्याने ही कंपनी त्यांच्या नावे जमा झाली आहे.

अदानी ग्रुपच्या एसीसी लिमिटेडने सोमवार 8 जानेवारी रोजी एशियन कॉंक्रीट्स एण्ड सिमेट्स प्रायव्हेट लिमिटेडचे अधिग्रहण पूर्ण केल्याचे बिझनेस स्टॅंडर्डच्या बातमीत म्हटले आहे. 775 कोटी रुपयांमध्ये हा व्यवहार पूर्ण झाल्यानंतर सिमेंट सेक्टरमध्ये अदानी यांचा दबदबा वाढला आहे. नवीन वर्षांच्या या पहिल्याच करारामुळे अदानी ग्रुपच्या शेअरवर देखील परिणाम झाला आहे. त्यामुळे एसीसी लि.चे शेअर 2350 रुपयांवर ट्रेंड करीत आहेत.

एसीसीजवळ संपूर्ण मालकी

एसीसी लिमिटेड अदानी ग्रुपची सिमेंट फर्म अंबूजा सिमेंटची सब्सिडियरी कंपनी आहे. या कंपनीकडे एशियन कॉंक्रीट एण्ड सिमेंट्समध्ये 45 टक्के हिस्सेदारी आहे. त्यातच कंपनीने हीच्या सध्या प्रोमोटर्सकडून बाकीचे 55 टक्के वाटाही खरेदी केला आहे. आता ACCPL ची संपूर्ण मालकी एसीसी जवळ आली आहे. या 55 टक्के शेअरचे अधिग्रहणाची किंमत 425.96 कोटी आहे.

या वर्षीचा पहिला मोठा सौदा

एकीकडे गौतम अदानी आपला व्यवसाय वाढविण्यासाठी नवीनवीन करार करीत आहेत. तशी त्यांची एकूण संपत्ती देखील रोज वाढत आहे. ब्लुमबर्ग बिल्येनियर्स इंडेक्सच्या मते गौतम अदानी यांची एकूण संपत्ती 94.5 अब्ज डॉलरवर पोहचली आहे. त्यामुळे जगातील सर्वात श्रीमंत लोकांच्या यादीत ते 14 व्या क्रमांकावर आहेत. साल 2024 च्या सुरुवातीला त्यांच्या संपत्तीत मोठी वाढ दिसत आहे. अन्य अब्जाधीशांना मोग टाकत या वर्षी त्यांनी 10.2 अब्ज डॉलरची कमाई केली आहे.

... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ
... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ.
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी.
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?.
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?.
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?.
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर.
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?.
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?.
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका.
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर.