गौतम अदानी वादात; इकडे मुकेश अंबानी सुसाट, मेगा डीलचा गुंतवणूकदारांना फायदा काय?

| Updated on: Nov 29, 2024 | 4:35 PM

Gautam Adani-Mukesh Ambani : वेवटेक कंपनी ही हेलियम तयार करते. त्याचा वापर हा औषधी विज्ञान, वैज्ञानिक संशोधन, अवकाश आणि हवाई वाहतूक, फायबर ऑप्टिक्स आणि इलेक्ट्रॉनिक्समध्ये करण्यात येतो. या कंपनीत मुकेश अंबानी यांनी मोठा करार केला आहे. त्याचा फायदा कंपनीसोबतच गुंतवणूकदारांना होणार आहे.

गौतम अदानी वादात; इकडे मुकेश अंबानी सुसाट, मेगा डीलचा गुंतवणूकदारांना फायदा काय?
गौतम अदानी मुकेश अंबानी
Follow us on

अदानी समूहातील काही कंपन्यांच्या वरिष्ठांवर अमेरिकेत लाच दिल्याचा खटला सुरू आहे. त्यावरून सध्या अदानी आणि अमेरिकेतील यंत्रणांमध्ये संबंध ताणल्या गेले आहे. अदानी यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. तर या वादा दरम्यान दुसरीकडे मुकेश अंबानी यांनी अमेरिकेत एक मोठी डील केली आहे. वेवटेक कंपनी ही हेलियम तयार करते. त्याचा वापर हा औषधी विज्ञान, वैज्ञानिक संशोधन, अवकाश आणि हवाई वाहतूक, फायबर ऑप्टिक्स आणि इलेक्ट्रॉनिक्समध्ये करण्यात येतो. या कंपनीत मुकेश अंबानी यांनी मोठा करार केला आहे.

वेवटेकमध्ये 21 टक्के पार्टनरशीप

वेवटेक ही कंपनी गेल्या काही वर्षांपासून हेलियम गॅसचा शोध घेते आणि त्यांचे उत्पादन करते. या कंपनीसोबत मुकेश अंबानी यांनी करार केला आहे. मुकेश अंबानी यांनी या कंपनीत 21 टक्के वाटा खरेदी केला आहे. या कोट्यवधीच्या डीलचा रिलायन्स कंपनीलाच नाही तर गुंतवणूकदारांना पण भविष्यात फायदा होईल. कंपनीचे शेअर वधारण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

हे सुद्धा वाचा

1.2 कोटी डॉलरची डील

मुकेश अंबानी यांनी अमेरिकेत हेलियम गॅस उत्पादन करणारी कंपनी वेवटेक हेलियममध्ये 1.2 कोटी डॉलर म्हणजे जवळपास 101.33 कोटी रुपयांची म्हणजे 21 टक्क्यांची हिस्सेदारी खरेदी केली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजने गुरुवारी शेअर बाजाराला या नवीन व्यापारी घडामोडींची माहिती दिली.

केव्हा सुरू झाली वेवटेक हेलियमची सुरुवात?

वेवटेक हेलियम कंपनीची सुरुवात 2 मे 2021 रोजी अमेरिकेत झाली. या कंपनीने 2024 मध्ये व्यापार आणि व्यवसायात मोठी झेप घेतली. अनेक ठिकाणी संपत्तीचं अधिग्रहण केले आणि हेलियम निर्मितीला सुरूवात केली.

कुठे होतो हेलियमचा वापर

वेवटेक कंपनी ही हेलियम तयार करते. त्याचा वापर हा औषधी विज्ञान, वैज्ञानिक संशोधन, अवकाश आणि हवाई वाहतूक, फायबर ऑप्टिक्स आणि इलेक्ट्रॉनिक्समध्ये करण्यात येतो. भविष्यात हेलियमचा उपयोग AI आणि डाटा सेंटरच्या विस्तार आणि सेमीकंडक्टर उत्पादनासाठी करण्यात येऊ शकतो.

भविष्यात हेलियमाचा वापर वाढणार आहे. आधुनिक तंत्रज्ञानासाठी हा गॅस महत्त्वपूर्ण ठरू शकतो. कम्प्युटर चिप तयार करण्यासाठी त्याचा वापर होईल. हा वायु AI आणि डाटा सेंटरसाठी महत्त्वाचा असेल. त्यामुळे रिलायन्सने भविष्यातील संधी पाहता आतापासूनच या क्षेत्रात उडी घेतली आहे. त्याचा कंपनीला मोठा फायदा होण्याची शक्यता आहे.