Gautam Adani : पुढे जायचे तर किंमत मोजावीच लागते; प्रत्येक संकटात आम्ही सोन्यासारखे निखरणार… अमेरिकेतील आरोपानंतर गौतम अदानींचा काय मोठा दावा?

Gautam Adani Statements : अदानी समूहाचे संचालक गौतम अदानी यांनी अमेरिकेत करण्यात आलेल्या आरोपांवर पहिल्यांदाच मन मोकळं केलं. अमेरिकेतील कायदा आणि नियमांचे पालन करण्यात आम्ही कसलाही कसूर करणार नसल्याचा दावा त्यांनी केला. प्रत्येक वेळी संकटात आम्ही मजबूतपणे समोर येण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Gautam Adani : पुढे जायचे तर किंमत मोजावीच लागते; प्रत्येक संकटात आम्ही सोन्यासारखे निखरणार... अमेरिकेतील आरोपानंतर गौतम अदानींचा काय मोठा दावा?
गौतम अदानींचा मोठा दावा
Follow us
| Updated on: Dec 01, 2024 | 9:18 AM

अमेरिकेतील आरोपानंतर पहिल्यांदाच गौतम अदानी यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या. ते या विषयावर मनमोकळेपणाने बोलले. आशियातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती गौतम अदानी यांनी पहिल्यांदाच याविषयीवर मत व्यक्त केले आहे. अशा घटना काही पहिल्यांदा घडल्या नाहीत. आमच्यासमोर अशी अनेक आव्हानं आणि संकट यापूर्वी सुद्धा आली. पुढे जायचे तर किंमत मोजावीच लागते, प्रत्येक संकटात आम्ही सोन्यासारखे निखरणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. अमेरिकेतील कायदा आणि नियमांचे पालन करण्यात आम्ही कसलाही कसूर करणार नसल्याचा दावा त्यांनी केला. प्रत्येक वेळी संकटात आम्ही मजबूतपणे समोर येण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्यांच्या या शब्दांनी अदानी समूहाचे कर्मचारी आणि गुंतवणूकदारांना दिलासा नाही तर बळ दिले आहे.

प्रत्येक आरोप, हल्ला करतो मजबूत

अदानी समूहाचे संचालक गौतम अदानी यांनी अमेरिकेत त्यांच्या समूहाविरोधात जे आरोपांचे मोहळ उठलं आहे. त्यावर प्रतिक्रिया दिली. संशयाचं धुकं, काहूर दूर करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. असे प्रत्येक हल्ले, आरोप आम्हाला कमकुवत करत नाहीत तर उलट मजबूत करतात असा दावा त्यांनी केला. 51व्या रत्न आणि आभूषण पुरस्कार कार्यक्रमात ते बोलत होते. अशा हल्ल्यांनी आम्ही खचून जाणार नाहीत, तर सोन्यासारखं निखरणार असा दावा केला.

हे सुद्धा वाचा

ही तर पुढे जाण्याची किंमत

आमच्या समूहाविरोधात काहूर माजले आहे. पण सत्य काय आहे? अदानी समूहाने कोणत्याही नियमांचे उल्लंघन अथवा न्यायालयीन प्रक्रियेत बाधा आणण्याचे कोणतेही काम केलेले नाही. तरीही सध्याच्या जगात नकारात्मक गोष्टी मोठ्या तेजीने फैलावल्या जातात, पसरवल्या जातात. आम्ही विहित कायदेशीर प्रक्रियेचे पालन करत आहोत. आम्ही झपाट्याने आगेकूच करत आहोत, सहाजिकच त्याची किंमत तर मोजावीच लागणार, सध्याचे आरोप ही पुढे जाण्याचीच किंमत असल्याचा दावा त्यांनी केला. पण या आरोपातून आम्ही अधिक मजबूत होऊ असा दावा त्यांनी केला.

काय होता आरोप

तुम्ही जितके महत्त्वकांक्षी असाल, हिम्मतवान असाल, जग तुमची तितकी कसोटी घेणारच, आता ही तेच घडत असल्याचे अदानी म्हणाले. अशा परिस्थितीत कायद्याने जे काही करता येईल, त्यावर आमचा विश्वास आहे, असे त्यांनी सांगीतले. युनायटेड स्टेट्‍स डिपार्टमेंट ऑफ जस्टिस आणि यूएस सिक्युरिटीज अँड एक्सचेंज कमिशन(SEC) यांनी 20 नोव्हेंबर 2024 रोजी न्यूयॉर्क येथील जिल्हा न्यायालयात अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेडचे (AGEL) प्रमुख गौतम अदानी, सागर अदानी आणि विनीत जैन यांच्याविरोधात लाचखोरी आणि गुंतवणूकदारांच्या फसवणुकीचे आरोप केले आहेत.

महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.