Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gautam Adani : एकाच दिवसात छापले 4,251 कोटी रुपये; अंबानी कुटुंबियांना या एका सौद्याने केले मालामाल

Gautam Adani Income : भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत उद्योजक गौतम अदानी यांनी एकाच दिवशी 4,251 कोटी रुपयांची कमाई केली. एका सौद्यातून त्यांना मोठा फायदा झाला. हिंडनबर्ग रिसर्चने दुसऱ्यांदा केलेल्या आरोपांचा कोणताही परिणाम त्यांच्या कमाईवर दिसून आला नाही.

Gautam Adani : एकाच दिवसात छापले 4,251 कोटी रुपये; अंबानी कुटुंबियांना या एका सौद्याने केले मालामाल
गौतम अदानी यांची जोरदार कमाई
Follow us
| Updated on: Aug 25, 2024 | 3:31 PM

Ambuja Cements : अदानी समुहाची मालकी अदानी कुटुंबाकडे आहे. या कुटुंबाने शुक्रवारी 4,251 कोटी रुपये कमावले आहेत. हा पैसा त्यांनी अंबुजा सिमेंटचे  शेअर विक्री करुन मिळवला आहे. आता ही रक्कम अदानी समूह इतर विविध कंपन्यात गुंतवणूक करणार आहे. या विक्रीतून मिळालेली रक्कम अदानी कुटुंबिय 125 अब्ज डॉलरच्या पोर्टफोलिओ मॅनेजमेंटसाठी करतील. यामध्ये जीक्यूजी पार्टनर्स (GQG Partners), नॅशनल पेन्शन सिस्टम ट्रस्ट (National Pension System Trust) आणि एसबीआई लाईफ इन्शुरन्स (SBI Life Insurance) सारख्या दिग्गज कंपन्यांनी अंबुजा सिमेंटमध्ये ही हिस्सेदारी खरेदी केली आहे.

जीक्युजी पार्टनर्सची 1679 कोटींची गुंतवणूक

स्टॉक एक्सचेंजच्या नवीन आकडेवारीनुसार, जीक्यूजी पार्टनर्सने सर्वात जास्त 1679 कोटींचा हिस्सा खरेदी केला. नॅशनल पेन्शन सिस्टिम ट्रस्टने 525 कोटी रुपये आणि एसबीआय लाईफ इन्शुरन्सने जवळपास 500 कोटीं रुपयाचा वाटा खरेदी केला. बिझनेस स्टँडर्टच्या एका वृत्तानुसार, अदानी कुटुंबिय त्यांच्या समुहातील कंपन्यांमधील हिस्सेदारी कमी करत आहेत. गौतम अदानी यांच्या नेतृत्वातील अदानी समूहातील कंपन्यांचे शेअर यावेळी 52 आठवड्यातील उच्चांकावर व्यापार करत आहेत.

हे सुद्धा वाचा

इन्फ्रास्ट्रक्चरवर अदानी समूहाची 100 अब्ज डॉलरची गुंतवणूक

अदानी समूह पुढील एका दशकात इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रात 100 अब्ज डॉलरची गुंतवणूक करण्याची योजना तयार करत आहे. यामध्ये 15 अब्ज डॉलरची गुंतवणूक तर या आर्थिक वर्षातच होणार आहे. भारत सरकारच्या विकास यात्रेत अनेक उद्योजक सहभागी होण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे अनेक कंपन्या अदानी समूहात गुंतवणूक वाढवत आहेत. त्यात सरकारी कंपन्यांचा पण सहभाग आहे. भविष्यात अदानी समूहात निर्गुंतवणूक वाढण्याची शक्यता आहे. शुक्रवारी अंबुजा सिमेंटचा शेअर 633 रुपयांवर बंद झाला.

अदानी पॉवरमधील हिस्सेदारी लवकरच विक्री

हिस्सेदारी विक्री केल्याने अंबुजा सिमेंटमध्ये अदानी कुटुंबियांची हिस्सेदारी 67.3 टक्के इतकी उरली आहे. अदानी समूहाने ही कंपनी स्विस फर्म होलसिम (Holcim) कडून मे 2022 मध्ये खरेदी केली होती. अदानी कुटुंबियांनी अदानी पॉवरमध्ये (Adani Power) जवळपास 3 टक्के हिस्सेदारी कमी करायची आहे.  या सौद्यामुळे अंबानी कुटुंबिय मालामाल झाले आहे.

जळगावात दोन गटात तूफान राडा
जळगावात दोन गटात तूफान राडा.
नितेश राणेंकडून विधानपरिषदेत नार्वेकरांचा मित्र म्हणून उल्लेख
नितेश राणेंकडून विधानपरिषदेत नार्वेकरांचा मित्र म्हणून उल्लेख.
आरोपी गौरव अहुजाचा येरवडामध्ये मुक्काम वाढला
आरोपी गौरव अहुजाचा येरवडामध्ये मुक्काम वाढला.
तृप्ती देसाईंसोबत काय झाली चर्चा? धनंजय देशमुखांनी दिली प्रतिक्रिया
तृप्ती देसाईंसोबत काय झाली चर्चा? धनंजय देशमुखांनी दिली प्रतिक्रिया.
फडणवीसांची औरंगजेबाशी तुलना! 'त्या' वक्तव्यानंतर सपकाळ आता म्हणताय...
फडणवीसांची औरंगजेबाशी तुलना! 'त्या' वक्तव्यानंतर सपकाळ आता म्हणताय....
औरंगजेबाच्या कबरीवरून वातावरण तापलं, बघा कुठं, कसा झाला अंत?
औरंगजेबाच्या कबरीवरून वातावरण तापलं, बघा कुठं, कसा झाला अंत?.
स्वारगेट प्रकरणातील पीडितेनं DCM शिंदेंकडे केली एकच मागणी, म्हणाली...
स्वारगेट प्रकरणातील पीडितेनं DCM शिंदेंकडे केली एकच मागणी, म्हणाली....
'जिसे, निभा ना सकू..', अजितदादांची शायरीतून विरोधकांना टोलेबाजी
'जिसे, निभा ना सकू..', अजितदादांची शायरीतून विरोधकांना टोलेबाजी.
पटोलेंच्या ऑफरवर दादांनी उडवली खिल्ली, 'तुम्ही कशाचा पाठिंबा देताय...'
पटोलेंच्या ऑफरवर दादांनी उडवली खिल्ली, 'तुम्ही कशाचा पाठिंबा देताय...'.
औरंगजेबाच्या कबरीचं प्रकरण तापलं; बजरंग दलाचं राज्यभरात आंदोलन
औरंगजेबाच्या कबरीचं प्रकरण तापलं; बजरंग दलाचं राज्यभरात आंदोलन.