गौतम अदानी यांची श्रीमंतीत भरारी; हिंडनबर्गचे भूत बाटलीत बंद, मुकेश अंबानींना टाकले मागे

Gautam Adani net worth : अदानी समूहाचे संचालक गौतम अदानी यांच्यावरची संकटांची मालिका खंडित होताच त्यांनी मोठी झेप घेतली. त्यांच्या संपत्तीत 4,54,73,57,37,500 रुपयाने वाढ झाल्याने अदानीचा आशिया खंडात दबदबा निर्माण झाला आहे.

गौतम अदानी यांची श्रीमंतीत भरारी; हिंडनबर्गचे भूत बाटलीत बंद, मुकेश अंबानींना टाकले मागे
गौतम अदानी यांची मोठी झेप
Follow us
| Updated on: Jun 01, 2024 | 11:43 AM

श्रीमंतांच्या यादीत मोठा उलटफेर दिसून आला. गौतम अदानी आता आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती झाले आहेत. त्यांनी रिलायन्स समूहाचे चेअरमन मुकेश अंबानी यांना श्रीमंतीत मागे टाकले आहे. Bloomberg Billionaires Index नुसार, शुक्रवारी अदानी यांच्या संपत्तीत 5.45 अब्ज डॉलरची भर पडली आणि त्यांची एकूण संपत्ती 111 अब्ज डॉलरवर पोहचली. ते जागतिक श्रीमंतांच्या यादीत 11 व्या तर आशियात पहिल्या क्रमांकावर विराजमान झाले. त्यांनी मुकेश अंबानी यांना मागे टाकले. अमेरिकन शॉर्टसेलर हिडनबर्गच्या आरोपांचे भूत उतरल्यानंतर ही मोठी कामगिरी ठरली आहे.

मुकेश अंबानी या क्रमांकावर

ब्लूमबर्ग बिलिनिअर्स निर्देशकांनुसार मुकेश अंबानी श्रीमंतांच्या यादीत 109 अब्ज डॉलरसह 12 व्या क्रमांकावर आहेत. ते आशियातील दुसरे श्रीमंत व्यक्ती ठरले. शुक्रवारी अदानी यांच्या संपत्तीत मोठी भर पडली. या वर्षात त्यांच्या संपत्तीत 26.8 अब्ज डॉलर म्हणजे 223613,17,00,000 रुपयांची तेजी आली. हिडनबर्ग रिसर्चच्या अहवालानंतर अदानी समूहाच्या शेअरमध्ये भूकंप आला होता. पण आता मोठी भरपाई झाली आहे.

हे सुद्धा वाचा

अदानी समूहातील शेअरची दमदार कामगिरी

अदानी समूहाच्या शेअर्सनी आठवड्याच्या अखेरच्या सत्रात दमदार कामगिरी केली. शुक्रवारी या शेअर्समध्ये मोठी उसळी दिसून आली. या व्यापारी सत्रात शेअरमध्ये 14 टक्क्यांची तेजी दिसली. अदान इंटरप्राईजेसमध्ये सात टक्क्यांची तेजी आली, हा शेअर 3416.75 रुपयांवर बंद झाला. अदानी पोर्टस शेअरमध्ये 4 टक्क्यांची वृद्धी आली. हा शेअर 1,440 रुपयांवर बंद झाला. अदानी पॉवर, व्यापारी सत्रात 14 टक्के तेजीत होता. हा शेअर 759.80 रुपयांवर बंद झाला. तर अदानी टोटल गॅसमध्ये 9 टक्क्यांची तेजी दिसली. हा शेअर 1,044.50 रुपयांवर बंद झाला. अदानी विल्मरमध्ये 3 टक्के, अदानी ग्रीन एनर्जीसह अदानी एनर्जी सोल्यूशन्स, अंबुजा सिमेंट, एसीसी या कंपन्यांत प्रत्येकी 2 टक्क्यांची तेजी आली. एनडीटीव्हीत 8 टक्के तेजीचे सत्र दिसले.

कोण-कोण टॉप 10 मध्ये

अमेरिकेच्या मायकल डेल यांच्या संपत्तीत शुक्रवारी सर्वाधिक घसरण झाली. डेल यांनी एका फटक्यात 11.7 अब्ज डॉलर गमावले. ते श्रीमंतांच्या यादीत 11 व्या क्रमांकावरुन 13 व्या क्रमांकावर फेकले गेले. फ्रान्सचे अब्जाधीश बर्नार्ड अरनॉल्ट हे श्रीमंतांच्या यादीत 207 अब्ज डॉलरसह पहिल्या क्रमांकावर आहेत. एलॉन मस्क (203 अब्ज डॉलर) दुसऱ्या तर जेफ बेजोस (199 अब्ज डॉलर) तिसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यानंतर मेटाचा सीईओ मार्क झुकरबर्ग चौथ्या क्रमांकावर, लॅरी पेज पाचव्या, बिल गेट्स सहाव्या, सर्गेई ब्रिन हे सातव्या, तर स्टीव बालमर आठव्या, वॉरेन बफे हे नवव्या आणि लॅरी एलिसन हे 10 व्या क्रमांकावर आहेत.

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.