Gautam Adani : श्रीमंतांच्या यादीत गौतम अदानी यांचा जलवा; जगातील दिग्गज अब्जाधीशांना टाकले मागे

Gautam Adani Networth : जगभरातील श्रीमंतांना मंगळवारी गौतम अदानी यांनी पिछाडीवर टाकले. कमाईत गौतम अदानी हे आघाडीवर होते. त्यांच्या संपत्तीत मंगळवारी 4.22 अब्ज डॉलरची भर पडली. आता जागतिक अब्जाधीशांच्या यादीत कोणते पटकावले स्थान?

Gautam Adani : श्रीमंतांच्या यादीत गौतम अदानी यांचा जलवा; जगातील दिग्गज अब्जाधीशांना टाकले मागे
गौतम अदानी यांची सर्वाधिक कमाई
Follow us
| Updated on: May 15, 2024 | 11:09 AM

अदान समूहाच्या शेअरमध्ये मंगळवारी जोरदार उसळी आली. गौतम अदानी यांची संपत्ती लागलीच वधारली. अदानींसह गुंतवणूकदारांचा चेहरा पण खुलला. या घडामोडींमुळे श्रीमंतांच्या यादीत अदानी यांनी मंगळवारी अनेक दिग्गजांना मागे टाकले. कमाईत गौतम अदानी यांनी आघाडी घेतली. त्यांच्या संपत्तीत 4.22 अब्ज डॉलरची भर पडली. भारतीय चलनात 35,23,56,496 रुपयांची भर पडली.

आता इतकी झाली संपत्ती

Bloomberg Billionaire Index ने याविषयीची ताजी अपडेट दिली आहे. आकडेवारीनुसार, गौतम अदानी यांची संपत्ती आता 99.1 अब्ज डॉलर इतकी झाली आहे. अदानी जगातील श्रीमंतांच्या यादीत 15 व्या स्थानावर आहेत. अर्थात या 35 कोटींच्या कमाईने अदानी यांच्या यादीतील क्रमांकावर कोणताच परिणा झाला नाही. कमाईत लॅरी एलिसन हे दुसऱ्या स्थानावर राहिले. त्यांच्या संपत्ती 4.05 अब्ज डॉलरची भर पडली. एलिसन या यादीत 10 व्या क्रमांकावर आहेत.

हे सुद्धा वाचा

इतर श्रीमंतांची कमाई कशी

एलॉन मस्क यांनी काल 4.05 अब्ज डॉलरची कमाई केली. ते यादीत तिसऱ्या स्थानावर आहेत. त्यांची एकूण संपत्ती 190 अब्ज डॉलर इतकी आहे. ते अब्जाधीशांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहेत. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बर्नार्ड अर्नाल्ट यांच्या संपत्तीत मंगळवारी 2.94 अब्ज डॉलरने वधारली. त्यांची संपत्ती एकूण 222 अब्ज डॉलर इतकी झाली आहे. यादीत 11 व्या क्रमांकावर मुकेश अंबानी आहेत. त्यांना 1.58 अब्ज डॉलरचा फायदा झाला. आता त्यांच्याकडे 109 अब्ज डॉलर इतकी संपत्ती आहे.

अदानी समूहाच्या शेअरची भरारी

  1. अदानी पॉवरचा शेअर 5.09 टक्क्यांनी उसळून 625.20 रुपयांवर पोहचला. अदानी एंटरप्राईजेजच्या शेअरमध्ये 5.40 टक्क्यांची उसळी येऊन तो 3025 रुपयांवर गेला. अदानी ग्रीन एनर्जीमध्ये 4.13 टक्क्यांची उसळी आली. हा शेअर काल 1786.05 रुपयांवर बंद झाला. अदानी पोर्ट्समध्ये जवळपास दोन टक्क्यांची वाढ होऊन तो 1332.35 रुपयांवर बंद झाला.
  2. अदानी टोटल गॅसमध्ये 5.70 टक्क्यांची तेजी दिसली. हा शेअर 911 रुपयांवर बंद झाला. अदानी एनर्जी सोल्यूशनमध्ये 3.72 टक्क्यांची तेजी दिसली. हा शेअर 1027.95 रुपयांवर पोहचला. एसीसीमध्ये 4 टक्क्यांची उसळी दिसली. हा शेअर 2462.50 रुपयांवर बंद झाला. एनडीटीव्ही, अंबुजा सिमेंट आणि अदानी विल्मरमध्ये तेजी दिसून आली. अंबुजा सिमेंटमध्ये 3.88 टक्के, अदानी विल्मरमध्ये 2.45 टक्के तर एनडीटीव्हीच्या शेअरमध्ये 2.15 टक्क्यांची तेजी दिसून आली.
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.