Gautam Adani : गौतम अदानी यांचा श्रीमंतांच्या टॉप-20 यादीतूनही पत्ता कट, शेअरमध्ये भूंकप

Gautam Adani : एक मुंगी पण तगड्या हत्तीला हैराण करु शकते, हे आज संपूर्ण भारतच नाही तर जग बघत आहे. अदानी यांच्या संपत्ती झपाट्याने कमी होत आहे. त्यांच्या शेअरची काय अवस्था आहे.

Gautam Adani : गौतम अदानी यांचा श्रीमंतांच्या टॉप-20 यादीतूनही पत्ता कट, शेअरमध्ये भूंकप
घसरण थांबेना
Follow us
| Updated on: Feb 03, 2023 | 6:32 PM

नवी दिल्ली : अमेरिकन संशोधन संस्था हिंडनबर्गच्या अहवालाने (Hindenburg Report) अदानी समूहातच नाही तर भारतात वादळ उठवलं आहे. 24 जानेवारी 2023 रोजी हा अहवाल सादर झाल्यापासून गौतम अदानी (Gautam Adani) यांच्या साम्राज्याला सुरुंग लागला आहे. अदानी यांच्या कंपन्या आणि शेअरमध्ये त्सुनामी आली आहे. पत्त्याच्या बंगल्यासारखे हे साम्राज्य कोसळायला लागेल आहे. तासागणिक अदानी यांची संपत्ती झपाट्याने कमी कमी होत आहे. त्यांच्या एकूण संपत्तीचे जे आकडे समोर आले आहेत, ते अदानी समूहासाठी भयकंप निर्माण करणारे आहेत. अवघ्या दहा दिवसांपूर्वी जगातील चौथे श्रीमंत असणारे गौतम अदानी आता श्रीमंतांच्या यादीत (Billionaires List) , टॉप-20 मध्ये पण स्थान राखू शकले नाहीत.

ब्लूमबर्ग बिलिनिअर्स इंडेक्सनुसार (Bloomberg Billionaires Index) गौतम अदानी यांची एकूण संपत्ती सातत्याने घसरत आहे. या घसरणीला अद्यापही ब्रेक लागला नाही. या आपटी बारमुळे अदानी श्रीमंतांच्या यादीत 21 व्या स्थानावर फेकले गेले.

आता गौतम अदानी यांची एकूण संपत्ती 61.3 अब्ज डॉलर इतकी राहिली आहे. गेल्या 24 तासांत त्यांची 10.7 अब्ज डॉलर संपत्ती घटली आहे. शेअरमध्ये सातत्याने घसरण होत असल्याने गौतम अदानी फेसबुकचे मार्क झुकरबर्ग यांच्यापेक्षा मागे पडले आहेत. झुकरबर्ग यांची एकूण संपत्ती 69.8 अब्ज डॉलर आहे. आता ते श्रीमंतांच्या यादीत 13 व्या स्थानावर फेकले गेले.

हे सुद्धा वाचा

गुरुवारी गौतम अदानी 64.7 अब्ज डॉलरसह जगातील श्रीमंतांच्या यादीत 16 व्या क्रमांकावर होते. परंतु, अवघ्या 24 तासांत त्यांना घसरणीचा सामना करावा लागला. आता त्यांचा क्रमांक 21 वा आहे. हे वर्ष अदानींसाठी लकी ठरलेले दिसत नाही. त्यांच्या ग्रूपवर झालेल्या आरोपानंतर गुंतवणूकदार ही अलर्ट झाले आहेत.

गेल्या वर्षी 2022 मध्ये जगात सर्वात वेगाने त्यांची संपत्ती वाढत होती. त्यांनी झपाट्याने सर्व पायऱ्या पार करत तिसरे स्थान पटकावले. तेव्हा जगातील श्रीमंतांच्या भुवया वर झाल्या होत्या. पण या अहवालाने त्यांच्या साम्राज्याला सुरुंग लावला. गेल्या 10 दिवसांत त्यांनी 52 अब्ज डॉलर गमावले.

दरम्यान गुरुवारी अदानी समूहाच्या अनेक शेअरमध्ये घसरणीचे सत्र सुरु झाले. अदानी समूहातील एकूण सर्व कंपन्यांचे भांडवल 100 अब्ज डॉलरने घसरले आहेत. गुरुवारी शेअर बाजार बंद झाला, तेव्हा अदानी इंटरप्राईजेसचा शेअर 21.61 टक्के घसरला. अदानी पॉवरमध्ये 4.98 टक्क्यांची घसरण झाली. अदानी विलमर 5 टक्क्यांनी घसरला.

अदानी समूहाताली अदानी ग्रीन एनर्जीमध्ये 10 टक्के, अदानी टोटल गॅसमध्ये 10 टक्के, अदानी ट्रान्समिशनमध्ये 10 टक्के आणि अदानी पोर्टसमध्ये 4 टक्क्यांची घसरण झाली. गुंतवणूकदारांनी शेअरकडे पाठ फिरवल्याचे दिसून येते.

Non Stop LIVE Update
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.