Gautam Adani : मुकेश अंबानी यांच्या पावलावर गौतम अदानी यांचे पाऊल; 10 वर्षांपूर्वीच केला होता हा खास ‘प्लॅन’
Gautam Adani Successor : भारतातील दुसरे सर्वात श्रीमंत उद्योजक गौतम अदानी आता 62 वर्षांचे झाले. त्यांनी आता निवृत्तीचे संकेत दिले आहेत. त्यामुळे त्यांच्या 200 अब्ज डॉलरच्या म्हणजे जवळपास 15 दशलक्ष रुपयांच्या संपत्तीचा वारसदार कोण असणार या चर्चांना रंग आला आहे.
धीरुभाई अंबानी यांच्या मृत्यूनंतर जगाने मुकेश अंबानी आणि अनिल अंबानी यांच्या हिस्सेदाराची वाद पाहिला होता. अनेक बड्या घराण्यांनी या घटनेतून मोठा धडा गिरवला. घरातील वादाचा व्यवसायावर मोठा परिणाम झाल्याचे उद्योग जगताने पाहिले. अनेक घराण्यांनी त्यापासून धडा घेतला. तेव्हापासून अनेक मोठ्या उद्योजकांनी मुलांमध्ये संपत्ती, कंपनीचे वाटेहिस्से करण्याचा एक खास प्लॅन तयार केला. मुकेश अंबानी यांनी ही जोखीम पत्करली आणि ती यशस्वी करुन दाखवली. आता गौतम अदानी पण त्याच मार्गावर आहेत.
संपत्तीचे शांततेत हस्तांतरण
रिलायन्स इंडस्ट्रीजमधील संपत्ती हस्तांतरणाचा एक पायंडा भारतीय उद्योग विश्वात पडत आहे. गेल्या काही महिन्यातील त्याची कसरत सर्वांनी पाहिली. किर्लोस्कर समूह असो वा गोदरेज समूह, या कुटुंबात अगदी शांततेत संपत्तीचे आणि कंपन्यांचे वाटप झाले. विशेष समूह एकच असल्याचा निर्णय पण जाहीर झाला. त्याला अपवाद रेमंड्सचा सिंघानिया कुटुंबातील वाद आहे तर मोदी समूहात पण आई-मुलाचा वाद दिसून आला.
गौतम अदानी यांचा निर्णय काय
गौतम अदानी यांची ओळख कडक आणि जोखीम घेणारे मालक अशी आहे. हिंडनबर्ग रिसर्चच्या आरोपात उभ्या उद्योग जगताने त्यांच्यातील या दोन्ही गुणांचा अनुभव घेतला. विशेष म्हणजे 2018 मध्येच गौतम अदानी यांनी कुटुंबात निवृत्तीचा विचार बोलून दाखवला, असे ब्लूमबर्गच्या एका वृत्तात म्हटले आहे. अर्थात त्यांनी वाटेहिश्शाचा निर्णय मुलांवर सोपवला आहे.
तेव्हा काय घडलं
ब्लूमबर्गच्या वृत्तानुसार, अहमदाबाद येथील कंपनीच्या मुख्य कार्यालयात गौतम अदानी यांनी मुलगा करण, जीत आणि पुतण्या प्रणव, सागर यांना बोलावले. ते हा उद्योगाचा पसारा कसे चालवणार याविषयी त्यांच्या मनात काय योजना आहे, याची माहिती या चौघांनी पुढील तीन महिन्यात द्यायची, असे त्यांनी स्पष्ट केले. तेव्हा या चौघांनी भविष्यात हा व्यवसाय, कुटुंबासारखाच चालवण्याची एक सूरात प्रतिक्रिया दिली.
अदानी समूहात नाही विभाजन
गौतम अदानी यांनी शुन्यातून हा समूह शिखरावर पोहचवला आहे. त्यांनी या कालावधीत अनेक उन्हाळे, पावसाळे पाहिले. आज हा समूह देशातील मोठं साम्राज्य आहे. गौतम अदानी यांच्या समूहात अजून वाटेहिस्सा झाला नाही. अदानी हे भावासोबत हा उद्योगाचा डोलारा चालवतात. त्यांचा पुतण्या प्रणव अदानी याने अदानी विल्मर, अदानी ॲग्री लॉजिस्टिक, अदानी ॲग्री फ्रेश आणि अदानी गॅस सारख्या उद्योग उभारणीत मोठा हातभार लावला.
तर मोठा मुलगा करण अदानी हा मुख्य कंपनी अदानी पोर्ट अँड सेज सांभाळतो. सागर अदानी हा ग्रीन एनर्जी उद्योग तर सर्वात लहान मुलगा जीत अदानी एअरपोर्ट आणि डिजीटल व्यवसायात आहे. एकप्राकारे रिलायन्स इंडस्ट्रीज प्रमाणेच गौतम अदानी यांनी मुलांना दहा वर्षांपासून त्यांच्या आवडत्या क्षेत्रात कामाची जबाबदारी दिली आहे.