कोरोना काळातही गौतम अदानींनी दिवसाला कमावले 456 कोटी रुपये, मुकेश अंबानी, बिल गेट्स यांनाही मागे टाकलं!
कोरोना आणि लॉकडाऊनच्या काळात गौतम अदानी यांच्या 4 कंपन्यांनी मोठी कमाई केली आहेत. त्यात अदानी गॅस, अदानी एंटरप्रायजेस , अदानी पोर्ट आणि अदानी पॉवर या कंपन्यांचा समावेश आहे. या कंपन्यांनी जानेवारीपासून आतापर्यंत जोरदार कमाई केली आहे.
मुंबई: कोरोना आणि लॉकडाऊनच्या काळात अनेक कंपन्या बुडाल्या. काहींनी कंपन्यांना कायमचं टाळं ठोकलं. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. मजुरांचं मोठ्या प्रमाणात स्थलांतर झालं. पण याच काळात काही कंपन्यांना मात्र अविश्वसनीय नफा झाल्याचं पाहायला मिळत आहे. लॉकडाऊनच्या काळात गौतम अदानी यांनी दिवसाला 456 कोटी रुपये कमावल्याचं पाहायला मिळत आहे. ब्लूमबर्ग बिलेनियर इंडेक्सनं दिलेल्या माहितीनुसार दिवसाला सर्वाधिक कमाईच्या बाबतीत टेस्लाचे सीईओ एलन मस्क हे आघाडीवर आहेत. त्यांनी दिवसाला 2.12 हजार कोटी रुपयांची कमाई केली आहे. (Gautam Adani’s fortune increased tremendously during the Corona period and lockdown)
अदानी यांना ‘या’ कंपन्यांमुळे मोठा नफा
कोरोना आणि लॉकडाऊनच्या काळात गौतम अदानी यांच्या 4 कंपन्यांनी मोठी कमाई केली आहेत. त्यात अदानी गॅस, अदानी एंटरप्रायजेस , अदानी पोर्ट आणि अदानी पॉवर या कंपन्यांचा समावेश आहे. या कंपन्यांनी जानेवारीपासून आतापर्यंत जोरदार कमाई केली आहे. या दरम्यान अदानी ग्रीचा शेअर 550 टक्क्यांनी वाढला आहे. फोर्ब्स नियतकालिकानं दिलेल्या माहितीनुसार अदानी ग्रुपच्या नेटवर्थचा मोठा हिस्सा हा संरक्षण, ऊर्जा निर्मिती आणि वितरण, एडीबल ऑईल आणि रिअल इस्टेटमधून येतो.
मुकेश अंबानींनाही मागे टाकलं
मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीची वाढ गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा सप्टेंबरच्या तिमाहीत घटली आहे. त्यामुळे कंपनीचा नफा 15 टक्क्यांनी कमी झाला आहे. ज्याचा परिणाम मुकेश अंबानी यांच्या नेटवर्थवर झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे मुकेश अंबानी जगातील टॉप 10 श्रीमंतांच्या यादीतूनही बाहेर गेले आहेत.
बिल गेट्स यांच्या संपत्तीवरही परिणाम
ब्लूमबर्ग बिलेनियर इंडेक्सने दिलेल्या माहितीनुसार मायक्रोसॉफ्टचे बिल गेट्स यांच्या संपत्तीतही वाढ झाली आहे. मुकेश अंबानी आणि बिल गेट्स यांचं नेटवर्थ 1 ते 1.07 लाख कोटी रुपयांनी वाढलं. तर गौतम अदानी यांचं नेटवर्थ 1.48 लाख कोटी रुपयांनी वाढल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे गौतम अदानी हे ब्लूमबर्ग बिलेनियर इंडेक्समध्ये 40व्या स्थानावर पोहोचले आहेत.
मुकेश अंबानी जगातील टॉप-10 श्रीमंतांच्या यादीतून बाहेर!
ब्लूमबर्ग बिलेनिअर्स इंडेक्सने (Bloomberg Billionaires Index) जाहीर केलेल्या माहितीनुसार मुकेश अंबाने हे 72.2 अब्ज डॉलरच्या संपत्तीसह जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत 11व्या स्थानावर आले आहेत. टॉप-10 श्रीमंतांच्या यादीत अॅमेझॉनच्या जेफ बेजोस हे 183 अब्ज डॉलरच्या संपत्तीसह पहिला क्रमांकावर आहेत. तर 10 व्या क्रमांकावर फ्रँक्वाइज बेट्टेकोर्ट मेयर्स आहेत.
जगातील टॉप 10 श्रीमंतांची यादी
- जेफ बेजोस – 183 अब्ज डॉलर
- बिल गेट्स – 128 अब्ज डॉलर
- अॅलेन मस्क – 121 अब्ज डॉलर
- बर्नार्ड अर्नाल्ट – 105 अब्ज डॉलर
- मार्क जुकरबर्ग – 102 अब्ज डॉलर
- वॉरेन बफे – 85.9 अब्ज डॉलर
- लॅरी पेज – 81.6 अब्ज डॉलर
- सर्गी ब्रिन – 79 अब्ज डॉलर
- स्टीव बाल्मर – 76.2 अब्ज डॉलर
- फ्रँक्वाइज बेट्टेकोर्ट मेयर्स – 73.7 अब्ज डॉलर
संबंधित बातम्या:
भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेले मुकेश अंबानी जगातील टॉप-10 श्रीमंतांच्या यादीतून बाहेर!
मुकेश अंबानी यांचा दिवाळी धमाका, देशातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय
अदानींची संपत्ती 230 टक्क्यांनी वाढली, तुमची किती वाढली?; राहुल गांधींचा सवाल
Gautam Adani’s fortune increased tremendously during the Corona period and lockdown