संजय दत्त याच्या या Whisky ब्रँडने केली कमाल; 7 महिन्यात मार्केट झिंगाट

Sanjay Dutt, Glenwalk Whiskey Brand : ग्लेनवॉकच्या स्कॉच व्हिस्की पारंपारिक ओक पिपांत तयार करण्यात येते. यामध्ये ताज्या दमाचे माल्ट आणि ग्रेन व्हिस्की योग्य प्रमाणात टाकण्यात येते. इतर प्रक्रियेतून गेल्यावर ही व्हिस्की तयार होते. तिचे अनेक चाहते आहेत. या ब्रँडने बाजारात धुमाकूळ घातला आहे.

संजय दत्त याच्या या Whisky ब्रँडने केली कमाल; 7 महिन्यात मार्केट झिंगाट
संजय दत्त व्हिस्की ब्रँड
Follow us
| Updated on: Dec 10, 2024 | 4:43 PM

बॉलिवूडचा किंग खान शाहरूख खान आणि संजय दत्त याने त्यांचा व्हिस्की ब्रँड Glenwalk लाँच केला आहे. जून 2023 मध्ये त्यांनी स्कॉच व्हिस्की ब्रँड, ‘द ग्लेनवॉक’ बाजारात आणला. त्यानंतर या ब्रँडने मागे वळून पाहिले नाही. हा ब्रँड बाजारात तुफान लोकप्रिय ठरला. बाजारात दाखल होताच अवघ्या 7 महिन्यात ‘द ग्लेनवॉक’ च्या विक्रीच्या आकड्यांनी इतर ब्रँडला आकडी आणली. किती आहे या ब्रँडची किंमत? सात महिन्यात व्यापारात या ब्रँड अशी घेतली झेप…

Glenwalk व्हिस्कीची किंमत किती?

ग्लेनवॉक या ब्रँडने मद्य बाजारात धुमाकूळ घातला आहे. केवळ सात महिन्यात या व्हिस्की ब्रँडच्या 6 लाख बॉटलची विक्री झाली आहे. 1,599 ते 1,600 रुपयांच्या दरम्यान ही स्कॉच व्हिस्की मिळते. एका किफायतशीर किंमतीमुळे प्रतिस्पर्धी ब्रँडला आव्हान उभं ठाकलं आहे. व्हिस्कीची गुणवत्ता, चव, प्रभावी विपणन, मार्केटिंग आणि मोठे नेटवर्क यासोबतच अभिनेत्यांचं वलय याचा फायदा या ब्रँडला झाल्याचे दिसून येते.

हे सुद्धा वाचा

Glenwalk व्हिस्कीचे वैशिष्ट्ये काय?

ग्लेनवॉकच्या स्कॉच व्हिस्की पारंपारिक ओक पिपांत तयार करण्यात येते. यामध्ये ताज्या दमाचे माल्ट आणि ग्रेन व्हिस्की योग्य प्रमाणात टाकण्यात येते. इतर प्रक्रियेतून गेल्यावर ही व्हिस्की तयार होते. तिचे अनेक चाहते आहेत. या ब्रँडने बाजारात धुमाकूळ घातला आहे. सध्या ग्लेनवॉक महाराष्ट्र, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशसह 10 राज्य आणि केंद्र शासित प्रदेशात उपलब्ध आहे.

संजय दत्तचे भागीदार कोण?

Glenwalk संजय दत्त याचा व्हिस्की ब्रँड आहे. त्यात मोक्ष सानी, जितिन मेरानी, ​​रोहन निहलानी, मनिष सानी आणि नीरज सिंह सारख्या या क्षेत्रातील अनुभवी लोकांची मोठी टीम आहे. या सर्वांनी मिळून हा ब्रँड बाजारात उतरवला आहे. कार्टेल ब्रदर्सच्या टीमने या व्हिस्कीची गुणवत्ता आणि चवीवर विशेष लक्ष दिले आहे. संजय दत्त हा या ब्रँडचा सहभागीदारच नाही तर ब्रँड पार्टनर सुद्धा आहे. त्याच्या लाखो फॅन्सने हा ब्रँड डोक्यावर घेतला आहे. त्याच्या प्रतिमा आणि प्रतिभेचा जोरदार वापर विपणन विभागाने करून घेतला आहे.

आता जागतिक मंच गाजवणार

ग्लेनवॉकने भारतात जोरदार मुसंडी मारली आहे. गुणवत्ता आणि चवीच्या जोरावर हा ब्रँड भारतात लोकप्रिय ठरला आहे. लवकरच हा ब्रँड जागतिक मंचावर दाखल होण्याची शक्यता आहे. सिल्व्हर स्क्रीन व्यतिरिक्त संजय दत्त याने या व्यवसायात पण स्वतःची वेगळी छाप सोडली आहे. इतर अनेक कलाकारांप्रमाणे त्याने अभिनयाशिवाय व्यवसायात पण यश मिळवले आहे.

sleep apnea साठी कराडला ICU मध्ये ठेवायची काय गरज - जितेंद्र आव्हाड
sleep apnea साठी कराडला ICU मध्ये ठेवायची काय गरज - जितेंद्र आव्हाड.
अक्षय प्रकरणात मला धस यांच्या प्रमाणपत्राची गरज नाही- जितेंद्र आव्हा
अक्षय प्रकरणात मला धस यांच्या प्रमाणपत्राची गरज नाही- जितेंद्र आव्हा.
शिंदे आभार कोणाचे मानणार ? EVM चे का ? संजय राऊत यांचा टोला
शिंदे आभार कोणाचे मानणार ? EVM चे का ? संजय राऊत यांचा टोला.
जरांगेंनी फडणवीस यांना बोल लावले, पण भाजपाला..., काय म्हणाले आंबेडकर
जरांगेंनी फडणवीस यांना बोल लावले, पण भाजपाला..., काय म्हणाले आंबेडकर.
'वाल्मीक कराडची जप्त संपत्ती फार लांब...,' काय म्हणाले सुरेश धस
'वाल्मीक कराडची जप्त संपत्ती फार लांब...,' काय म्हणाले सुरेश धस.
भगवे कपडे अन् रूद्राक्ष माळ्या... किन्नर आखाड्यात अभिनेत्री संन्यासी
भगवे कपडे अन् रूद्राक्ष माळ्या... किन्नर आखाड्यात अभिनेत्री संन्यासी.
मुंबईत हवालदाराच्या लेकानं वडिलांच्या बंदुकीतून झाडल्या स्वत:वर गोळ्या
मुंबईत हवालदाराच्या लेकानं वडिलांच्या बंदुकीतून झाडल्या स्वत:वर गोळ्या.
धसांनी घेतली कॉवत यांची भेट अन् त्या हत्याप्रकरणासंदर्भात केली मागणी
धसांनी घेतली कॉवत यांची भेट अन् त्या हत्याप्रकरणासंदर्भात केली मागणी.
'लालपरी'सह रिक्षा-टॅक्सीचा प्रवास महागणार, ‘इतके’ रुपये मोजावे लागणार
'लालपरी'सह रिक्षा-टॅक्सीचा प्रवास महागणार, ‘इतके’ रुपये मोजावे लागणार.
'ते म्हणाले तुला मारणार...', कराडचा उल्लेख अन् गित्तेकडून गंभीर आरोप
'ते म्हणाले तुला मारणार...', कराडचा उल्लेख अन् गित्तेकडून गंभीर आरोप.