तुमचं तंत्रज्ञान, आमचं यंग टॅलेंट, मोदींचं उद्योजकांना ‘Come to India’

इज ऑफ डुइंग बिझनेससाठी भारताने गेल्या काही वर्षात सातत्याने केलेली प्रगती, भारताचं यंग टॅलेंट, स्वायत्त न्यायसंस्था आणि स्थिर सरकार ही गुंतवणूकदारांसाठी चांगली संधी असल्याचं मोदींनी (Bloomberg Global Business Forum 2019) सांगितलं.

तुमचं तंत्रज्ञान, आमचं यंग टॅलेंट, मोदींचं उद्योजकांना 'Come to India'
Follow us
| Updated on: Sep 25, 2019 | 8:01 PM

न्यूयॉर्क : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी न्यूयॉर्कमध्ये ब्लूमबर्ग जागतिक उद्योग मंचावर (Bloomberg Global Business Forum 2019) भारतात गुंतवणूक करण्याचं उद्योजकांना आवाहन केलं. इज ऑफ डुइंग बिझनेससाठी भारताने गेल्या काही वर्षात सातत्याने केलेली प्रगती, भारताचं यंग टॅलेंट, स्वायत्त न्यायसंस्था आणि स्थिर सरकार ही गुंतवणूकदारांसाठी चांगली संधी असल्याचं मोदींनी (Bloomberg Global Business Forum 2019) सांगितलं.

“Restoring Global Stability” या विषयावर बोलताना मोदींनी सरकारच्या गेल्या काही दिवसांतील निर्णयाबाबतही माहिती दिली. भारताने नुकतीच कॉर्पोरेट करात कपात केली आहे, ज्याचा थेट फायदा उद्योगांना होईल, असं त्यांनी सांगितलं. आम्ही उद्योगस्नेही राष्ट्र असून येत्या काही दिवसात आवश्यक ते सर्व निर्णय घेऊ, असं ते म्हणाले. या मंचाने भारताच्या आशा-आकांक्षा, भविष्यातील वाटचाल, विकासाचं ध्येयधोरण मांडण्याची संधी दिली त्याबद्दल मोदींनी आभारही मानले.

मोदींनी यावेळी ‘Come to India’ ही नवी संकल्पना मांडली. स्टार्टअपमध्ये गुंतवणूक करा, भारतात या, असं आवाहन मोदींनी केलं. भारतात स्टार्टअपला मोठ्या प्रमाणात वाव असून यामध्ये चांगलं काही तरी करण्याची क्षमता असल्याचं मोदींनी जगभरातील उद्योजकांना सांगितलं.

येत्या काही वर्षात आम्ही आधुनिक पायाभूत सुविधांवर 1.3 ट्रिलियन डॉलर खर्च करत आहोत. तुम्हाला वाव असणाऱ्या एखाद्या बाजारपेठेत गुंतवणूक करायची असेल, तर भारतात या. सर्वात मोठ्या पायाभूत असलेल्या क्षेत्रात, शहरीकरणात तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर भारतात या, असंही मोदी म्हणाले.

मोदींनी मांडलेले महत्त्वाचे मुद्दे

  • भारतातील जनतेने निवडणुकीत दिलेलं मताधिक्य हे देशातील नव्या संधींची नांदी आहे हे इथे बसलेले उद्योजक समजू शकतात. चांगल्या उद्योगासाठी आवश्यक असलेला प्रत्येक निर्णय सरकार घेऊ शकतं, कारण लोक सरकारसोबत आहेत.
  • उद्योजक अनेकदा बोलताना उद्योग भावनांविषयी बोलतात. या निवडणुकीत 130 कोटी भारतीयांनी फक्त भावना व्यक्तच केल्या नाहीत, तर त्यांचा निर्णयही दिलाय. विकास हीच भारतीयांची प्राथमिकता असल्याचा हा निर्णय आहे.
  • नवीन सरकार आल्यानंतर उद्योगांमध्ये अडथळा असणारे 50 पेक्षा जास्त कायदे रद्द केले. भारत एका अनोख्या स्थितीत आहे, जिथे आमची वेगवान वाढ आपल्याला विविध मागणीची पूर्तता करण्यास सक्षम करते.
  • सरकार येऊन फक्त तीन ते चार महिने झाले आहेत, ही फक्त सुरुवात आहे. अजून दीर्घ कालावधी जायचा आहे. या प्रवासात भारतासोबत भागीदारी करण्यासाठी जगभरातील उद्योग विश्वाला सुवर्ण संधी आहे.
  • आमचे मध्यम वर्गीय महत्वाकांक्षी लोक आहेत, ज्यांच्याकडे जागतिक दृष्टीकोन आहे. भारतीय वेगाने दारिद्र्यावर मात करत असून वाढत्या खरेदी सामर्थ्यासह आर्थिक शिडीवर जात आहेत. त्यामुळे, तुम्हाला वाव आहे अशा बाजारात गुंतवणूक करायची असेल तर भारतात या.
  • आमचे युवक अॅप अर्थव्यवस्थेचे सर्वात मोठे ग्राहक आहेत. अन्न ते वाहतूक आणि सिनेमा ते स्थानिक गोष्टींपर्यंत स्टार्टअप सर्व सेवा देत आहेत. तुम्हाला स्टार्टअपमध्ये गुंतवणूक करायची असेल, तर भारतीय बाजारात मोठा वाव आहे.
  • आम्ही आमच्या शहरांचं वेगाने आधुनिकीकरण करत आहोत, त्यांना अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि नागरिक अनुकूल पायाभूत सुविधांनी सुसज्ज करत आहोत. तुम्हाला शहरीकरण झालेल्या भागात गुंतवणूक करायची असेल, तरीही भारतात या.
  • भारताच्या विकासवाढीचे चार महत्त्वाचे घटक आहेत, जे जगात एकाच वेळी मिळणं कठीण आहे. हे चार घटक आहेत – लोकशाही, लोकसंख्या, मागणी आणि निर्णायकपणा
  • तुम्ही गरीब आणि मध्यमवर्गीयांसाठी लाखो घरं बांधत असाल, तर कदाचित जगातील हा सर्वात मोठा प्रकल्प असेल. आम्ही देशातील प्रत्येक गरीबाला घर देत आहोत. त्यामुळे रिअल इस्टेटमध्येही गुंतवणूक करायची असेल तर भारतात या.
  • पायाभूत सुविधांसाठी आम्ही खर्च करत असलेली रक्कम अभूतपूर्व आहे. येत्या काही वर्षात, आम्ही आधुनिक पायाभूत सुविधांसाठी 1.3 ट्रिलियन डॉलर खर्च करत आहोत.
  • कर सुधारणांसोबतच जगातील सर्वात मोठं वित्तीय समावेशनही भारतात अत्यंत कमी वेळात झालंय. जवळपास 37 कोटी लोक गेल्या चार ते पाच वर्षात बँकिंग क्षेत्राशी पहिल्यांदाच जोडले गेले.
  • भारताच्या विकासाचा गुणात्मक आणि परिणामात्मक आराखडा अगोदरच तयार झाला असून त्यावर अंमलबजावणी सुरु आहे. भारत सध्या पाच ट्रिलियनसाठी काम करत आहे.
  • भारतातील जवळपास प्रत्येक नागरिकाकडे युनिक आयडी आहे, मोबाईल आणि बँक अकाऊंट आहे. ज्यामुळे, Targeted Service Delivery मध्ये वेग प्राप्त झाला. दलाली बंद झाली आणि पारदर्शकपणा कित्येक पटीने वाढला.
  • गेल्या पाच वर्षात भारतात 286 बिलियनची परकीय गुंतवणूक आली. ही गुंतवणूक गेल्या 20 वर्षात आलेल्या गुंतवणुकीची निम्मी आहे. अमेरिकेनेही जेवढी परकीय गुंतवणूक भारतात केली, त्यापैकी निम्मी गुंतवणूक गेल्या चार वर्षात आली.
  • कित्येक दशकांनंतर भारताने हे राजकीय स्थैर्य अनुभवलं आहे. आमच्याकडे लोकशाही आहे, राजकीय स्थैर्य आहे, अंदाज धोरण आणि स्वतंत्र न्यायव्यवस्था आहे, त्यामुळे गुंतवणुकीच्या सुरक्षेची हमी आहे. भारतीय न्यायव्यवस्था इंग्रजीत असल्याने परकीय गुंतवणूकदाराला काही अडचण असेल, तर स्वतःच्या देशात बसून त्यावर लक्ष ठेवता येतं.
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.